अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

MPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

पदविका प्रवेश अर्जासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

नेट परीक्षेच्या अर्जासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए ) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. या उमेदारानाही संधी मिळण्यासाठी सीएसआयआर – युजीसी … Read more

शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करा – आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

सध्याच्या स्थितीत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा , व्यावसायिक अभ्यासक्रमाची नीट , JEE ,CET सारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरु होणारे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करावे , अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी

शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या 31 ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

NDA प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने  प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल केला आहे.