मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर अकाउंटवर आलेल्या मेसेजला गंमतीदार वाटणारी गंभीर प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली आहे. स्पर्धा परीक्षेतील लांबलेलं यश आणि लग्नाचा मुद्दा याची सांगड घालत या तरुणाने आपली व्यथा मांडल्याचं दिसत आहे.

काय आहे ही प्रतिक्रिया – “मी यंदा परीक्षा पास होऊन, तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..आता तिचं लग्न होईल..विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका..परीक्षा झाल्याचं पाहिजे..

अर्थात ही प्रक्रिया खरोखर असल्याचं कुठेही समोर आलं नाही. ही प्रतिक्रिया कोणत्या अकाउंटवरुन आलेली नाही, तो केवळ रिप्लाय असल्याचं व्हायरल इमेजमधून स्पष्ट होत आहे. तरीही काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पाठिंबा तर काहींनी विरोध दर्शवल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com