शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करा – आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या स्थितीत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा , व्यावसायिक अभ्यासक्रमाची नीट , JEE ,CET सारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरु होणारे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करावे , अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशभरात ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षेसाठी सुरु असलेली प्रक्रिया तसेच विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. नवे शैक्षणिक वर्ष जून 2020 पासून सुरु होऊन दोन महिने उलटले असले तरी कोरोनामुळे सुरु करता आली नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनामुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरु झालेल्या नसताना परीक्षा , प्रवेश परीक्षांचा घाट घालने योग्य नाही . ज्या ज्या ठिकाणी शाळा – महाविद्यालये सुरु झाली तिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसून येते त्यामुळे याबाबत योग्य निर्णय घेतल्यास कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा धोका टळेल.असेही या पत्रात नमूद केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com