पदविका प्रवेश अर्जासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालयाकडून (डी टी ई) दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (पॉलीटेकनिक) तसेच हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेकनॉलॉजी आशा डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून राबविण्यात आली होती.अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी उशीर  होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रकियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी आहेत.

दरम्यान तात्पुरती गुणवत्तायादी 7 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून  त्याबाबतचे आक्षेप 10 सप्टेंबरपर्यन्त नोंदवता येतील. त्यानंतर 12 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशी डीटीईचे  संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.

महाविद्यालयात कोट्यातील राखीव जागांसाठी अर्ज भरणे ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची प्रक्रिया ‘कट ऑफ डेट’ पर्यंत सुरु राहणार आहे. 4 सप्टेंबरनंतर पडताळणी होऊन हे अर्ज स्थलांतरावरील, तसेच प्रक्रियेव्यतिरिक्त जागांसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती डीटीईकडून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com