नेट परीक्षेच्या अर्जासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए ) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. या उमेदारानाही संधी मिळण्यासाठी सीएसआयआर – युजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदत दिली आहे.

राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु असेल. तसेच 10 सप्टेंबरला रात्री 11.50 वाजेपर्यंत शुल्क स्वीकारले जाईल. 11 ते 17 दरम्यान अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. अधिक माहिती एनटीएच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com