पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता विद्यार्थ्यांच्या … Read more

ATKT विद्यार्थ्यांना लाॅटरी! सरासरी गुणांद्वारा पास करणार – उदय सामंत

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

मोठी बातमी! विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

मोठी बातमी! विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाची परवानगी; विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे

मुंबई | व्यवसायिक, अव्यवसायिक पदवीच्या ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागावे लागणार आहे. कारण विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. UGC च्या गाईडलाईन नुसार विद्यापीठांना आता परिक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिक्षा घेताना मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले तर सदर विद्यार्थ्यांना कोरोना बँच म्हणुन … Read more

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (३ जुलै) JEE आणि NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता CAच्या मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काल (३ जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन ही माहिती दिली. याआधी सीए … Read more

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय? IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात … Read more

मोठी बातमी! CET च्या सर्व प्रवेश परीक्षा अनिश्च्छित काळासाठी स्थगित; ठाकरे सरकारची घोषणा

मुंबई । राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यसरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय; राज्यमंत्री तनपुरे यांचा ATKT विद्यार्थ्यांनाही दिलासा

मुंबई | महाविकास आघाडीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांच्या परिक्षा घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!अंतिम वर्ष परीक्षांबाबत … Read more

दहावी, बारावीचा निकाल जुलै महिण्यात ‘या’ तारखेपर्यंत लागणार – वर्षा गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही … Read more