राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे … Read more

NEET Result 2020 | इथे पहा परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. NEET Result 2020 NEET Result 2020 | महाराष्ट्रात आशिष जांते अव्वल … Read more

मोठी बातमी! 15 ऑक्टोबर पासून देशात सर्वत्र शाळा होणार सुरु; महाराष्ट्राचं काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचे संकट पाहता अद्याप राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही आहेत. नुकतेच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा १ नोव्हेंबर पासून सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनीही देशात १५ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटपार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला … Read more

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबर पासून महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनीही आता दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात … Read more

राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते … Read more

21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा; ‘या’ नियमांचे पालन करणे अनिवार्य

नवी दिल्ली | देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

जिद्दीची कहाणी !! ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर

राजस्थान मधील एका १३ वर्षाच्या मुलाची कहाणी क्रिकेटर सेहवाग यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट वरून शेअर केली आहे. हरीश बाड़मेर असे या मुलाचे नाव आहे. तो राजस्थान मधील पचपदरा येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकत आहे. तो यावर्षी सातवी मध्ये आहे. लॉक डाउन सुरु झाल्यापासून तो त्याच्या गावी आलेला आहे. पण शासनाच्या निर्णयानंतर त्याची हि … Read more

बोर्डाच्या परीक्षेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, नवीन शिक्षण धोरणात काय बदलले ते जाणून घ्या

करिअरनामा । नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे (नवीन शैक्षणिक धोरण 2020). याची औपचारिक घोषणा झाली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाला आता इथून पुढे शिक्षण मंत्रालय असे म्हटले जाईल. या नवीन धोरणांतर्गत सर्व नवीन गोष्टी लागू केल्या जातील.   हे नवीन शिक्षण धोरण अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे … Read more

मोठी बातमी! जातपडताळणी बाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले महत्वाचे आदेश; विद्यार्थ्यांना दिलासा

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more