NEET Result 2020 | इथे पहा परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. NEET Result 2020

NEET Result 2020 | महाराष्ट्रात आशिष जांते अव्वल तर शोएब पैकीच्या पैकी गुण मिळवून देशात प्रथम

नीटचा निकाल आज  सायंकाळी ४ वाजता लागण्याची शक्यता आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. मात्र, कोविड-१९ संसर्गामुळे किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. NEET Result 2020

असा पाहा निकाल –

1) सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
2) यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3) आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
4) NEET Result 2020 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5) आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.

अधिकृत वेबसाईट – ntaneet.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com