राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

करिअरनामा आॅनलाईन | लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये काही नियम शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला आहे. युद्धपातळीवर काम सुरू झाले असून दहावीच्या 40-45 टक्के आणि बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. दहावीचा निकाल 20 ते 30 जुलै पर्यंत आणि 12 वीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या शाळांविषयी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी – शिक्षणमंत्री

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात पालकवर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने पालकांवर नवीन शैक्षणिक वर्ष किंवा मागील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या आधी यासबंधी परिपत्रक काढण्यात आले असले तरीही काही शाळा विद्यार्थी व पालकांवर फी भरण्यासाठी … Read more

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द; ९ वी, ११ वी चे दुसरे सेमिस्टरही रद्द – वर्षा गायकवाड

मुंबई | कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले अहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही आता १८०० च्या वर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढले आहे. यापार्श्वभुमीवर आता १० वी चा शेवटचा राहिलेला भुगालाचा पेपरही रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आम्ही इयत्ता 9 वी आणि 11 … Read more

Breaking News | १० वी चा उर्वरित एक पेपर लांबणीवर, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे समजत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ६३ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ३१ मार्च पर्यंत सर्व खाजगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. … Read more

कोरोनाची दहशत आहे, पण परीक्षांच्या वेळापत्रकात सध्यातरी बदल नाहीच – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाची दहशत सगळीकडे पसरली आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ८ रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.