दहावी, बारावीचा निकाल जुलै महिण्यात ‘या’ तारखेपर्यंत लागणार – वर्षा गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सप्टेंबर पासून ११ वी चे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जुलै महिण्यात दहावीचा निकाल लागणार असून यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे. 

दरम्यान, कोरोमामुळे विद्यार्थ्यामा मोठा फटका बसला आहे. आॅनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करुन अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही तिथे विद्यार्थ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com