सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; ठाकरे सरकारचा मराठी बाणा

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने … Read more

शाळा कधी सुरु होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

दहावीच्या निकालाबाबत SSC बोर्डानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । दहावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसएससी बोर्डाकडून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. आता या विषयाचे गुण कसे दिले जाणार ते बोर्डाने जाहीर केले आहे. बोर्डाने या संदर्भात एक परिपत्रक जरी … Read more

शाळा, कॉलेज कधी पासून सुरु होणार? गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more

इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीपासून वाचवण्यासाठी पुणे विद्यापीठेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । देशात जागतिक औद्योगिक क्रांतीचे वारे वाहते आहे. अभियांत्रिकी क्षेत्राला अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी आणि काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही कोर्सची जोड देण्यात येणार आहे. आणि यासाठी अधिक क्रेडिट गुणही दिले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज हा निर्णय झाला आहे. विद्यापीठात अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज शुक्रवारी ८ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी या परीक्षांच्या वेळापत्रबाबत माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं  CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची घोषणा करणारा डॉ. … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द – उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आज पहिली बस सुटणार

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. पुण्यात सुमारे … Read more

हुश्श! एकदाचं ठरलं; विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये

नवी दिल्ली | विद्यापीठांना सोयीनुसार जुलैमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेता येतील. त्यासाठी कोविड १९ च्या आगामी काळातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेचा कालावधी २ तासापर्यंत कमी करता येईल, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीनं केली आहे. पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे केले जाऊ शकते किंवा मागील सत्रातील त्यांच्या … Read more