इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीपासून वाचवण्यासाठी पुणे विद्यापीठेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । देशात जागतिक औद्योगिक क्रांतीचे वारे वाहते आहे. अभियांत्रिकी क्षेत्राला अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी आणि काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही कोर्सची जोड देण्यात येणार आहे. आणि यासाठी अधिक क्रेडिट गुणही दिले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज हा निर्णय झाला आहे. विद्यापीठात अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बदलत्या गोष्टींचे शिक्षण दिले जात येईल यासाठी विद्यापीठाने काही ऑनर्स कोर्स सुरु करण्याचा विचार केला आहे.

नियमित अभ्यासक्रमासहित डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स-मशीन लर्निग, सायबर सिक्युरिटी, व्हर्च्युअल रियालिटी हे चार ऑनर्स कोर्स विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. आपल्या नेहमीच्या पाठयपुस्तकातील अभ्यासासहित वेळ मिळेल तसा त्यांना हे कोर्स करता येणार असून त्यासाठी त्यांना १६ ते १८ क्रेडिट गुणही मिळणार आहेत. अभियांत्रिकी शाखेत विद्यापीठाने मागच्या वर्षी प्रथम वर्षाला क्रेडिट सिस्टीम सुरु केली होती, यंदा दुसऱ्या वर्षालाही सुरु केली आहे. पण बदलत्या औद्योगिक गरजेनुसार हे अधिक कोर्स निर्माण करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

अभ्यासक्रमातील शिक्षणासोबत या इतर कोर्समुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्याचबरोबर हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करत असतात, त्यामुळे अभ्यासक्रमात त्यादृष्टीने सुधारणा केल्या आहेत. असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ मनोहर चासकर यांनी सांगितले. विज्ञान शाखेत वनस्पतीशास्त्र विषयात फ्लोरिकल्चर, भौतिकशास्त्रात फ्रिज, टीव्ही, गिझर, एसी सहित इलेक्ट्रॉनिक वस्तूची माहिती दिली जाणार आहे. रसायनशास्त्र विषयात शॉर्ट ऍक्टिव्हिटी आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग शिकवले जाणार आहे. तर भूगोल मध्ये रिमोट सेन्सिंग, जीआयएस मॅपिंग, याचा समावेश असणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत हे बदल करण्यात आले आहेत.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com