मराठा आरक्षण: राज्य शासनाने उर्वरित 87 टक्के जागांवर तात्काळ भरती द्यावी; MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी

करिअरनामा  ऑनलाईन | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर, राज्य शासनापुढे एमपीएससी भरतीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एसईबीसी आरक्षणाच्या 13 टक्के जागा असतात. त्यामुळे, या तेरा टक्के जागांच्या निकालामुळे उर्वरित 87 टक्के जागावरील भरतीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे, संपूर्ण स्पष्ट निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने उर्वरित 87 टक्के जागांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून द्यावी. अशी … Read more

मराठा आरक्षण: भरती प्रक्रिया पडणार लांबणीवर; लाखो उमेदवारांवर न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

Maratha arakshan

करिअरनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबत निर्णय काही दिवसापूर्वी आला. मराठा आरक्षण रद्द केल्याने आता प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती (एमपीएससी) अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर याचे पडसाद उमटणार आहेत. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यास पुन्हा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट होऊन भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत … Read more

Police Bharti 2021 । पहिल्या टप्प्यात 5,300 पदे भरणार – अनिल देशमुख

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. Police Bharti 2021 पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा … Read more

UPSC परीक्षा जानेवारीदरम्यान तर, MPSC ची परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । ‘युपीएससी’ ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, ‘एमपीएससी’ ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. MPSC UPSC Exam Date 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाची … Read more

Breaking News : पोलिस भरतीबाबत शासनाचा जीआर जारी; SEBC चे आरक्षण न ठेवण्याचा गृहविभागाचा निर्णय

Police Bharti 2021

मुंबई । राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय … Read more

“एमपीएससी’ परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर! मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर प्रस्ताव

करिअरनामा ऑनलाईन ।मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित बाराशे पदांची भरती थांबविण्याचा निर्णय घेतला. आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी, असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. आता तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसिमितीपुढे ठेवण्यात आला आहे. तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत “एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना … Read more

मोठा निर्णय! मराठा आरक्षणाशिवाय राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया हाेणार सुरू

करिअरनामा । ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, आयटीआय (ITI) आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा रखडलेला मार्ग मोकळा झाला असून या प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय (Maratha Reservation) पार पाडल्या जाव्यात, असा निर्णय सरकारने घेतला असून तशा सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी मराठा आरक्षण वर्गातून म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) वर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले, … Read more

अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई । मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलायची का याबाबत सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक होणार होती. त्यानुसार MPSC परीक्षेबाबत गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. उद्या रविवारी … Read more

‘MPSC परीक्षा पुढे ढकला, नाहीतर उद्रेक होईल!’ उदयनराजेंचा गंभीर इशारा

सातारा । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठी क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ … Read more

MPSC परीक्षा होणारच पण आरक्षणाच्या निर्णयानंतर निकाल

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अन्य राजकीय नेतेमंडळींसह विद्यार्थी संघटनांनी केली आहे. मात्र, परीक्षा ठरल्याप्रमाणे 11 ऑक्‍टोबरलाच होणार असून राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, आयोगाने 16 सप्टेंबरला परीक्षेबाबत सरकारला विचारणा केल्यानंतर सरकारच्या निर्णयानंतरच परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले … Read more