सीईटीला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी

करिअरनामा ऑनलाईन ।ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी )बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर )घेण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.कोरोना बाधित विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा … Read more

नीट पीजी 2021 परीक्षा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप … Read more

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे … Read more

अकरावीचे ऑनलाइन वर्ग आजपासून सुरू

करिअरनामा ऑनलाईन ।मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. मात्र, या कालावधीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी प्रवेश नसला, तरी दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू होणार आहे. करोनाकाळात शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामध्ये बालवर्ग ते दहावीपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण … Read more

पुण्यात बोगस लष्कर भरती रॅकेटचा पर्दाफाश; सैन्यात नोकरीच्या नावावर तरुणांकडूना लाखो रुपयांचा गंडा

करिअरनामा । पुण्यामध्ये लष्कर भरतीतील रॅकेटचा लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करत पर्दाफाश केला आहे. वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे. अटक … Read more

एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० ऑक्टोबरऐवजी ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी १३ जून रोजी होणार आहे. … Read more

दूरशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी ३० नोंव्हेबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या परीक्षांचे निकाल नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील.या विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेश प्रक्रियेला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला असून, दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला आता ३० नोंव्हेबरपर्यंत प्रवेश घेता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालांतर्गत दूरशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात … Read more

[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती

करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.   ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते. माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे.  … Read more

ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकॉउंटन्टस ऑफ इंडियातर्फे आयसीडब्लूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाऊंडेशन,इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील. कोरोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर मध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाऊन … Read more

खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्‍त

करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. … Read more