सीईटीला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी

करिअरनामा ऑनलाईन ।ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी )बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर )घेण्यात येणार आहे.

ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.कोरोना बाधित विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे प्रवेश नियमन प्राधिकरणाने जाहीर केले होते.त्यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते.त्यासाठी राज्यातील साधारण ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी होणार आहे.

सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र,जीवशास्त्र (पीसीबी )या विषय गटाची परीक्षा होणार आहे.परीक्षेबाबतची अधिक माहिती आणि प्रवेशपत्र प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com