[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती

करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.   ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते.

माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे.  उदय माहूरकर यांनी इंडिया टुडे ग्रुपमध्ये डेप्युटी एडिटर म्हणून काम केले आणि ते संघ परिवाराच्या जवळचे मानले जातात.  उदय माहूरकर यांनी पंतप्रधान मोदींवर “Merging with a Billion” आणि “Center Stage: Inside Narendra Modi” या नावाचे पुस्तक लिहिले आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे

केंद्रीय माहिती आयोग स्थापनाः 12 ऑक्टोबर 2005.

केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली.

——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-