मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
बारावीची परीक्षा हि १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी परीक्षा आटोपल्या होत्या. परंतु लॉक डाउन मुळे उत्तरपत्रिका तपासणे आणि त्याचे संकलन करणे या साऱ्या गोष्टी लांबणीवर पडल्या गेल्या. त्यामुळे निकाल उशिरा लागण्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी २८ मे लाच निकाल जाहीर झाला होता पण यावर्षी लॉक डाउन मुळे उशीर झाला.
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी साधरणतः एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पूर्ण राज्यातील जवळपास ३०३६ परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे ५ लाख ८५ हजार ७३६ कला शाखेचे ४ लाख ७५ हजार १३४, तर वाणिज्य शाखेचे ३ लाख८६ हजार ७८४ विद्यार्थी आहेत. आता या परिक्षेचा निकाल कधी लागतो याची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १० वी १२ वी च्या निकालांच्या तारखा सोशल मिडियावर पसरल्या होत्या . त्या सर्व अफवा असून १५ ते २० जुलै दरम्यान निकाल जाहीर होतील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या .
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com