State Government Megabharti : राज्यातील तरुणांसाठी ‘या’ 5 विभागांमध्ये होणार मेगाभरती; एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारकडून राज्यातील विविध विभागांमध्ये (State Government Megabharti) मेगाभरतीच्या घोषणा करण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत तब्बल 18,000 जागांसाठी भरतीची घोषणा झाल्यानंतर तलाठी भरतीचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्याच्या वन विभागातही शेकडो नोकऱ्या आहेत. एकूणच काय तर राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी चुकवू नका. एका क्लिकवर तुम्हाला राज्यभरातील संपूर्ण मेगाभरतीबद्दल माहिती मिळणार आहे. या भरतीविषयी सविस्तरपणे जाणून घेवूया…

1. MPSC अंतर्गत 1037 जागांवर भरती – (State Government Megabharti)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क, लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://mpsconline.gov.in/candidate 

2. महाराष्ट्र पोलीस भरती –

राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तरुण तरुणींना पोलीस होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात (State Government Megabharti) आली आहे. 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दि. 2 जानेवारीपासून या भरतीच्या शारीरिक चाचणीची सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवसात लेखी परीक्षा होणार आहे.

3. महाराष्ट्र तलाठी भरती – (State Government Megabharti)

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठीपदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो (State Government Megabharti) जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/

4. बँक ऑफ महाराष्ट्र येथे मोठी भरती –

बँक ऑफ महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी (State Government Megabharti) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

5. महाराष्ट्र वन विभाग भरती

महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र (State Government Megabharti) उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com