Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. 02 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पण त्या आधी या चाचणीसाठीचं हॉल तिकीट नक्की कसं डाउनलोड करावं तसंच कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.

शारीरिक चाचणी (Police Bharti 2023)

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण (Police Bharti 2023) 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

काही महत्वाच्या सूचना –

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक (Police Bharti 2023) चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

असं डाउनलोड करा हॉल तिकीट –

  1. सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. ‘महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022’ शोधा.
  3. प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  4. लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  5. ते सेव्ह करा आणि PDF मध्ये डाउनलोड करा.
  6. प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  7. तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे – (Police Bharti 2023)

सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे.

उमेदवारांकडे पुढील कागदपत्रे असणं आवश्यक आहे.

शैक्षणिक कागदपत्रे –

  1. आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र
  2. चारित्र्य पडताळणी अहवाल
  3. आधारकार्ड
  4. पॅनकार्ड (Police Bharti 2023)
  5. एलएमव्ही लायसन
  6. अर्जाची छायांकित प्रत (Xerox)
  7. कॉल लेटर

काही महत्वाच्या सूचना –

  • उमेदवारांनी मैदानावर वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक तो गणवेश घालूनच उपस्थित राहायचं आहे. (Police Bharti 2023)
  • सर्व उमेदवारांनी शारीरिक परीक्षा देताना आपल्या जीवाची काळजी घेऊनच परीक्षा देणं महत्त्वाचं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com