Home Blog Page 357

Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी; असे आहेत नवे नियम

Agniveer Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्रातील NDA सरकारने तिन्ही (Agniveer Recruitment) सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट उमेदवार अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग घेऊ शकतील. ITI- पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेत अर्ज करू शकतील. यामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळेल. एवढेच नाही तर प्रशिक्षणाचा वेळही कमी होईल. या मोठ्या बदलानंतर आता आणखी तरुण उमेदवारांना या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

15 मार्च पर्यंत करू शकता अर्ज (Agniveer Recruitment)

16 फेब्रुवारीपासून अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अग्निवीर भरती वर्ष 2023-24 साठी अविवाहित पुरुष उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे तर निवड चाचणी 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार, अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर कीपर, ट्रेड्समन ही पदे भरली जातील. अग्निवीर निवड प्रक्रियेत नुकत्याच झालेल्या बदलांनंतर (Agniveer Recruitment) आता उमेदवारांना आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. 17 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट तरुण करू शकतात अर्ज

16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान 60 टक्के (Agniveer Recruitment) गुणांसह 12वी पास अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट झालेले तरुणही नव्या बदलासाठी अर्ज करू शकतील. या प्रशिक्षित तरुणांना लष्कराच्या तांत्रिक शाखेत अर्ज करावा लागणार आहे. त्यांचे प्रशिक्षणही कमी वेळेचे असेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Medical Education : डॉक्टर होणाऱ्यांनो….सर्वात स्वस्त मेडिकल एज्यूकेशन कुठे मिळेल? इथे घ्या संपूर्ण माहिती

Medical Education (1)

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं हे प्रत्येक (Medical Education) पालकांचं स्वप्न असतं. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, यासाठी पालक मुलांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करत असतात. पण मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेट किती आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. मेडिकल एज्यूकेशनसाठी खूप जास्त फी भरावी लागते. हे शिक्षण खूप महागडं असल्याने सामान्य माणसांना फी भरताना आयुष्याची जमा पुंजी ओतावी लागते. अनेकवेळा असं पहायला मिळालं आहे, की मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चामुळं काही कुटुंबावर आर्थिक संकटही ओढावलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमी तुम्हाला मेडिकल एज्यूकेशन स्वस्तात कसं घेता येईल याविषयी सांगणार आहोत.

परवडणारी फी (Medical Education)

स्वस्तात मेडिकल एज्यूकेशन घेऊन डॉक्टर व्हायचं, याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला खोटी डिग्री मिळेल. तसंच तुम्हाला एखाद्या छोट्या संस्थेमधून शिक्षण घ्यावं लागेल, असंही नाही. भारतात मेडिकल एज्यूकेशन खूप महाग आहे. पण आम्ही तुम्हाला कमी फी असणाऱ्या मेडिकल एज्यूकेशनबाबत माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जिथे तुमच्या शिक्षणाचा तसेच खाण्या पिण्याचा खर्चही कमी होईल. मेडिकल एज्यूकेशन घेवू इच्छिणारे विद्यार्थी किर्गिस्तान, कजाकिस्तान किंवा (Medical Education) रशियात अॅडमिशन घेऊ शकतात. रशियाच्या सरकारी विद्यापीठात विद्यार्थ्यांना NRI कोट्यातूनही अॅडमिशन दिलं जातं. याची फी सुध्दा खूप कमी आहे. याशिवाय कजाकिस्तान मध्ये विद्यार्थी 25 लाखांच्या खर्चात शिक्षण आणि हॉस्टेलची फी भरु शकतात.

विदेशातील विद्यापीठात अॅडमिशन घेण्यासाठी उमेदवारांना योग्य विद्यापीठातून एखाद्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. काही विद्यापीठांच्या वेबसाईट्सवर त्यांच्या (Medical Education) अर्जाची लिंक उपलब्ध असते. तर अनेक विद्यापीठात E-Mail च्या माध्यमातूनही अर्ज स्विकारले जातात. कोणत्याही विदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज करण्याआधी तेथील खर्च, विद्यापीठाची मान्यता, इ. तपासून पाहा. कारण एखाद्या ठिकाणी विद्यापीठाच्या फी पेक्षा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च जास्त असता कामा नये.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : आधी कोचिंग घेतलं, फेल झाली, सेल्फ स्टडीवर भर दिला अन् बनली IAS

UPSC Success Story Diksha Joshi IAS

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे केंद्रीय (UPSC Success Story) लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा. दरवर्षी लाखो उमेदवारांमधून ठरावीक उमेदवार या परिक्षेत पास होतात. यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. आज आपण अशाच एका आदर्श अधिकारी दीक्षा जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने निराश न होता अभ्यासावरील लक्ष हटू दिले नाही आणि यूपीएससी देणाऱ्या तरुणांसाठी आदर्श ठरली.

दीक्षाने AIR 19 पटकावली

दीक्षा ही मूळची पिथौरागढ, उत्तराखंडची आहे. दिक्षा जोशी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळाला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण योग्य रणनीती आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

पहिल्या दोन प्रयत्नात आलं अपयश (UPSC Success Story)

दीक्षाने मल्लिकार्जुन कॉलेजमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने जॉलीग्रांट येथील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून MBBS पूर्ण केले. मात्र, लहानपणापासून नागरी सेवांमध्ये नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते. यामुळेच इंटर्नशिपनंतर तिने UPSC ची नागरी सेवा परीक्षा दिली. जिद्दीने प्रयत्न करूनही पहिल्या दोन प्रयत्नात तिची निवड झाली नाही. मात्र तिसर्‍या प्रयत्नात तिला यश आले आणि तिने यावेळी संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळवला.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

सेल्फ स्टडीवर दिला भर

दीक्षाला पहिल्या 2 प्रयत्नात यश मिळाले नाही तेव्हा तिने कोचिंग क्लास सोडण्याचा निर्णय घेतला. कारण कोचिंग क्लासमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे तिला अभ्यास करता (UPSC Success Story) आला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहिला. यामुळेच तिनी सेल्फ स्टडीवर भर दिला. दीक्षा दररोज 7 ते 8 तास अभ्यास करायची. यावेळी तीने अभ्यासक्रमाची विभागणी केली आणि त्यानुसार परीक्षेची तयारी केली.

‘स्वत:वर विश्वास ठेवा’

दीक्षाच्या मते, जर उमेदवारांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची असेल, तर सर्वप्रथम त्यांना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण अनेक वेळा आत्मविश्वास ढासळल्याने (UPSC Success Story) परीक्षा देताना गडबड होते. दीक्षाच्या मते, उमेदवारांनी स्वत:ची ताकद आणि कमकुवतपणा देखील ओळखला पाहिजे. जेणेकरून आपल्याला कोणत्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, हे कळू शकेल. तसेच उमेदवारांनी स्वतःची इतरांशी तुलना करू नये. कारण यामुळे गोंधळ होवून परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

आठवड्याला उजळणी करणं आवश्यक (UPSC Success Story)

दिक्षाच्या मते, उमेदवारांनी तयारीदरम्यान उजळणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण तुम्ही भूतकाळात अभ्यासलेल्या गोष्टी विसरत नाहीत. यासोबतच प्रत्येक विषयही स्पष्ट होतो. असे केल्यास उमेदवारांसाठी परीक्षा सोपी होऊन जाते. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार दर आठवड्याला सुधारणा करणे आवश्यक आहे. 2021 च्या परीक्षेत दीक्षाला तिसऱ्या प्रयत्नात 1020 गुण मिळाले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती; महिन्याचा 30,000 पगार; पहा कोण करू शकतं अर्ज

Job Notification (30)

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – नागपूर महानगरपालिका, नागपूर

पद संख्या – 30 पदे

भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

1. एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक

2. अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – 65 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Notification)

मुलाखतीचा दिवस – महिन्याच्या दर मंगळवारी (मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास मुलाखत घेतली जाणार आहे.)

मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर. (Job Notification)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2023 : पुण्यात जॉब हवाय?? भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांवर भरतीसाठी लगेच अर्ज करा 

BEL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे

भरले जाणारे पद –

  1. प्रकल्प अभियंता – 14 पदे
  2. प्रशिक्षणार्थी अभियंता – 16 पदे

पद संख्या – 30 पदे (BEL Recruitment 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (BEL Recruitment 2023)

प्रकल्प अभियंता – 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी अभियंता – 28 वर्षे

अर्ज फी –

प्रकल्प अभियंता – रु. 472/-

प्रशिक्षणार्थी अभियंता – रु. 177/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (BEL Recruitment 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. प्रकल्प अभियंता – BE/ B. Tech/ B.Sc. Engineering (4 years course) from a recognized University / Institution in the relevant disciplines.

2. प्रशिक्षणार्थी अभियंता – BE/ B. Tech/ B.Sc. Engineering (4 years course) from a recognized University / Institution in the relevant disciplines. (BEL Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

  1. प्रकल्प अभियंता Rs. 40,000 – 55,000/- दरमहा
  2. प्रशिक्षणार्थी अभियंता Rs. 30,000 – 40,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करावे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (BEL Recruitment 2023)
  4. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया –

  1. पुणे येथे लेखी चाचणी व मुलाखतीद्वारे निवड होईल.
  2. ज्या उमेदवारांनी ‘गुगल फॉर्म’ द्वारे नोंदणी केली आहे त्यांनाच निवड प्रक्रियेतून जाण्याची परवानगी दिली जाईल.
  3. लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीची तारीख आणि स्थानः निवडलेल्या उमेदवारांना केवळ त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडीद्वारे सूचित केले जाईल. (BEL Recruitment 2023)
  4. लेखी परीक्षेसाठी मूल्यांकन वेटेज 85% आणि मुलाखतीसाठी 15% असेल.
  5. अंतिम निवडीचे निकाल BEL च्या वेबसाइट.www.bel-india.in वर प्रदर्शित केले जातील.

पदभरतीचा तपशील – 

BEL Pune Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (Project Engineer) – APPLY

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (Trainee Engineer) – APPLY

अधिकृत वेबसाईट – bel-india.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुण्याच्या ‘या’ बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स!! 12 वी पास असाल तर आजच अर्ज करा

Job Alert (17)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. येथे रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) पदाच्या एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

बँक – पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि.

भरले जाणारे पद – ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) / Office Operation Executive (Back Office)

पद संख्या – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही (Job Alert)

मिळणारे वेतन – 7,000/- रुपये ते 20,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहिर होईल

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.punepeoplesbank.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC EPFO Recruitment 2023 : पदवीधरांसाठी UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी आजच करा APPLY

UPSC EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (UPSC EPFO Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदाच्या एकूण 577 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

संस्था – कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना

भरले जाणारे पद –

  1. एनफोर्समेंट ऑफिसर – 418
  2. सहाय्यक आयुक्त- 150

पद संख्या – 577 पदे

अर्ज फी – (UPSC EPFO Recruitment 2023)

ओबीसी/ईडब्ल्यूएस – 25 रुपये

एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.

वय मर्यादा –

EO/AO साठी – 18 ते 30 वर्षे

APFC पदांसाठी – 18 ते 35 वर्षे

उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. (UPSC EPFO Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा
  2. मुलाखत
  3. दस्तऐवज सत्यापन
  4. वैद्यकीय चाचणी

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो (UPSC EPFO Recruitment 2023)

सूचना –

पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये (UPSC EPFO Recruitment 2023) देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2023 : 12वी परिक्षेत गोंधळ; प्रश्नाऐवजी चक्क उत्तर आलं छापून; विद्यार्थ्यांना ‘ते’ गुण वाढवून मिळणार?

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या (HSC Exam 2023) परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

अशा आहेत चुका (HSC Exam 2023)

12वी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले आहे. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या आहेत. आता याचे नेमके काय उत्तर लिहावे? हे विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता. त्यांनी निरिक्षकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर ही मोठी चूक असल्याचे स्पष्ट झाले.

इंग्रजी पेपर मधील पान नंबर 10 मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. येथे प्रश्न क्रमांक A ३ इंग्रजी कवितेववर आधारित असणे अपेक्षित होते पण याजागी तपासणाऱ्याला (HSC Exam 2023) सूचना छापून आली होती.

A 4 ला कवितेवर आधारित प्रश्न येणे अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे.

A 5 हा प्रश्न देखील २ गुणांचा होता. आणि येथे देखील प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना छापण्यात आल्या आहेत.

या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांच्या (HSC Exam 2023) ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांचाही चांगलाच गोंधळ उडाला.

HSC Exam 2023

बोर्डाची प्रतिक्रिया

यावर बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी बाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा (HSC Exam 2023) आयोजित करण्यात येईल. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSTC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी!! MSTC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; लगेच करा APPLY

MSTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । MSTC (Metal Scrap Trade Corporation Limited) अंतर्गत (MSTC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कर्तव्य अधिकारी पदाच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.

संस्था – Metal Scrap Trade Corporation Limited

भरले जाणारे पद – विशेष कर्तव्य अधिकारी (OSD)

पद संख्या – 62 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर

वय मर्यादा – 21 ते 62 वर्षे

अर्ज फी – Rs 590/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSTC Recruitment 2023)

  1. विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) Graduate from a recognized institute/ University with a minimum of 60% marks in graduation.
  2. Applicants with Professional qualifications like MBA/Two years-Post Graduation Diploma will be preferred.

मिळणारे वेतन – Rs. 40,000 -1,20,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. (MSTC Recruitment 2023)
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

  1. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. (MSTC Recruitment 2023)
  2. मुलाखतीची तारीख ईमेल/वेबसाईट जाहिरातीद्वारे कळवली जाईल.
  3. जर उमेदवाराला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले असेल, तर त्याने ऑनलाइन अर्जात नमूद केल्यानुसार त्याचे मूळ प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – www.mstcindia.co.in

अधिकृत वेबसाईट – www.mstcindia.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Interview Questions : HR तुम्हाला ‘हे’ प्रश्न विचारतीलच; मुलाखतीला जाताना या प्रश्नांची आधीच करा तयारी

Interview Questions

करिअरनामा ऑनलाईन। नोकरी मिळवताना तुम्हाला अनेक आव्हाने आणि (Interview Questions) संघर्षांना सामोरे जावे लागते. मग ते मुलाखतीशी किंवा कामाशी संबंधित आव्हान असू शकते. मुलाखतीदरम्यान कोणते प्रश्न विचारले जातील? आणि त्याची तयारी कशी करावी? इत्यादींचा आपण अनेकदा विचार करत असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या या लेखाद्वारे देत आहोत. हे प्रश्न HR (Human Resource) कडून फ्रेशर्सना  विचारले जातात. या प्रश्नांच्या मदतीने, फ्रेशर्स मुलाखतीदरम्यान सहज आपले पहिले इंम्प्रेशन उत्तमप्रकारे पाडू शकतो.

1. स्वतःबद्दल सांगा

‘स्वतःबद्दल सांगा’ हा एक असा प्रश्न आहे जो नेहमी विचारला जातो. समोरची व्यक्ती नवीन आहे की अनुभवी आहे, हे या प्रश्नाचे उत्तर देण्यावरुन कळते. हा प्रश्न उमेदवार आणि मुलाखतकार यांच्यातील संभाषणाला सुरुवात करून देतो. जेव्हा एचआर तुम्हाला असे प्रश्न विचारतो याचा अर्थ असा (Interview Questions) होतो की, त्याला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तसेच ज्या गोष्टींचा CV मध्ये उल्लेख नसेल अशा गोष्टी HR ला जाणून घेण्यात उत्सुकता असते.

2. हे करिअर निवडण्याचे कारण काय?

‘तुम्ही हे करिअर का निवडले?’ हा प्रश्न सर्वात महत्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. उमेदवाराला या क्षेत्रात खरोखर रस आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो.

3. तुमचा ड्रीम जॉब कोणता? (Interview Questions)

तुमचा ड्रीम जॉब कोणता आहे? हा HR ने विचारलेल्या सर्वात लोकप्रिय मुलाखतीच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी या प्रश्नाची तयारी करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रश्नातूनच उपप्रश्न तयार होणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर द्यावे लागेल.

4. तणाव आणि दबाव कसे हाताळता?

ताणतणाव आणि दडपण हा आयुष्यातील एक भाग आहे. इथले स्ट्रेस आणि प्रेशर हे महाविद्यालयीन जिवनातील तणावापेक्षा खूप वेगळे आहेत. फ्रेशर्ससाठी HR मुलाखतीत विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तणाव आणि दडपणाखाली कसे काम करता, हे या प्रश्नाच्या (Interview Questions) माध्यमातून तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

5. तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?

हा सर्वात लोकप्रिय प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. जो तुम्हाला प्रत्येक नोकरीच्या मुलाखतीत विचारला जाईल. पण या प्रश्नाचे उत्तर अतिशय काळजीपूर्वकआणि विचारपूर्वक (Interview Questions) दिले पाहिजे. आपला आधीचा पगार, आधीच्या नोकरीत मिळणारी संभाव्य पगारवाढ, मेडिक्लेम, पीएफ असे मिळणारे भत्ते, या सर्वांचा विचार करुन ठेवा. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे पडेल.

6. तुम्हाला आणखी काही प्रश्न आहेत का?

या प्रश्नांची तयारी फ्रेशर्सनी आधीच केली पाहिजे. HR नेहमी हा (Interview Questions) प्रश्न विचारतात. या प्रश्नामुळे फ्रेशर्सच्या मनातील सर्व शंका दूर होऊ शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com