Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी; असे आहेत नवे नियम

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्रातील NDA सरकारने तिन्ही (Agniveer Recruitment) सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट उमेदवार अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग घेऊ शकतील. ITI- पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेत अर्ज करू शकतील. यामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळेल. एवढेच नाही तर प्रशिक्षणाचा वेळही कमी होईल. या मोठ्या बदलानंतर आता आणखी तरुण उमेदवारांना या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

15 मार्च पर्यंत करू शकता अर्ज (Agniveer Recruitment)

16 फेब्रुवारीपासून अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अग्निवीर भरती वर्ष 2023-24 साठी अविवाहित पुरुष उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे तर निवड चाचणी 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार, अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर कीपर, ट्रेड्समन ही पदे भरली जातील. अग्निवीर निवड प्रक्रियेत नुकत्याच झालेल्या बदलांनंतर (Agniveer Recruitment) आता उमेदवारांना आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. 17 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट तरुण करू शकतात अर्ज

16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान 60 टक्के (Agniveer Recruitment) गुणांसह 12वी पास अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट झालेले तरुणही नव्या बदलासाठी अर्ज करू शकतील. या प्रशिक्षित तरुणांना लष्कराच्या तांत्रिक शाखेत अर्ज करावा लागणार आहे. त्यांचे प्रशिक्षणही कमी वेळेचे असेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com