Home Blog Page 356

Menstrual Leave : महिलांना मासिक पाळीची मिळणार पगारी सुट्टी? वाचा काय आहे कोर्टाचं म्हणणं

Menstrual Leave

करिअरनामा ऑनलाईन । महिलांना मासिक पाळी दरम्यान शाळा आणि कामाच्या (Menstrual Leave) ठिकाणी सुट्टी मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती . शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी महिलांच्या नाजूक दिवसांबाबत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने मासिक पाळीतील रजेबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. मासिक पाळीमुळे विद्यार्थिनी आणि कामाच्या ठिकाणी काम करणार्‍या महिलांना त्या दिवशी सुट्टी देण्याचे नियम बनवावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. हा मुद्दा सरकारच्या धोरणाच्या कक्षेत येतो. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाला निवेदन पाठवले जाऊ शकते, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.

याचिकाकर्ते यांचं म्हणणं काय आहे (Menstrual Leave)

शैलेंद्र त्रिपाठी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘मी माझ्या आईला लहानपणी या वेदना सहन करताना पाहिले आहे. एकदा ट्रेनच्या प्रवासादरम्यान, एक सहप्रवासी महिला मासिक पाळीच्या वेदनामुळे खूप अस्वस्थ होती. ती अस्वस्थ होती पण काहीच बोलू शकत नव्हती. मी तिला पेनकिलर दिली. नंतर मी या विषयावर वाचले आणि मासिक पाळीच्या वेदनांची तुलना हृदयविकाराच्या झटक्याशी होते, हे मला समजले. त्यानंतर मी या मुद्द्यावर जनहित याचिका दाखल केल्याचे त्रिपाठी म्हणाले.

याचिकाकर्त्याने युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या अभ्यासाचा हवाला दिला आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना खूप वेदना होतात असं म्हटलं जातं. अभ्यासात असेही म्हटले गेले आहे की वेदनांची स्थिती अशी असते की ती एखाद्या पुरुषाच्या हृदयविकाराच्या झटक्याइतकी असते. याचा (Menstrual Leave) परिणाम नोकरदार महिलांच्या कार्यक्षमतेवर होतो. अनेक कंपन्या पेड पीरियड रजा देतात असेही याचिकाकर्त्याने सांगितले आहे. महिला विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या काळात सुटी देण्यात यावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

2018 मध्ये शशी थरूर यांनी महिला लैंगिक पुनरुत्पादन आणि मासिक पाळी हक्क विधेयक सादर केले होते. यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाने महिलांना सॅनिटरी पॅड आदी मोफत पुरवावे, असे सांगण्यात आले. कालावधीच्या वेळी रजेचा कोणताही कायदा नसल्याचे याचिकाकर्त्याने यावेळी सांगितले.

बिहारमध्ये महिलांसाठी असते वेदना रजा

मासिक पाळी दरम्यान विद्यार्थीनी, कर्मचारी महिला यांना बाहेर प्रवास करण्यास त्रास होतो, या काळात त्यांना वेदना होतात. अनेक महिलांना सक्त आरामाचीही गरज (Menstrual Leave) असते. त्यामुळे बिहार येथे महिलांना मासिक वेदना रजा दिली जाते.  विधिमंडळ आणि इतर भागधारकांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं आहे; असं याचिकेत नमुद करण्यात आलं होतं.

.. तर महाराष्ट्रात मिळू शकते वेदना रजा

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयालाचा पर्याय सुचवला आहे. त्यामुळे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयात धाव घेणे (Menstrual Leave) गरजेचे आहे. यासाठी योग्य मुद्दे समोर आणल्यास महाराष्ट्रात देखील महिलांना मासीक पाळी दरम्यान वेदना रजा मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

केरळमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनींना मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांंनी तशी घोषणा केली आहे. केरळ सरकारच्या या निर्णयाचे महिलांनी मोठं स्वागत केलं आहे. महाराष्ट्रात देखील हा निर्णय घेण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 7 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! पुण्याच्या कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये मिळवा महिन्याचा पावणे 2 लाख पगार

Government Jobs (18)

करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे विविध रिक्त पदे (Government Jobs) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 168 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे

पद संख्या – 168 पदे

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

1) संगणक प्रोग्रामर / Computer Programmer – 01 पद
संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संगणक शास्त्रात पदवी / पदव्युत्तर पदवी
2) वर्क शॉप अधीक्षक / Work Shop Superintendent 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन अभियांत्रिकीमध्ये बी.ई. /बी. टेक उत्तीर्ण
3) फायर ब्रिगेड अधीक्षक / Fire Brigade Superintendent 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि NFSC कडून सब ऑफिसर कोर्समध्ये प्रमाणपत्र
4) सहाय्यक बाजार अधीक्षक / Astt Market Supdt 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र
5) जंतुनाशक / Disinfector 01 पद (Government Jobs)
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त शाळेतून 7 वी परीक्षा उत्तीर्ण
6) ड्रेसर / Dresser 01 पद
10वी पास सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय ड्रेसिंगमधील प्रमाणपत्र (सीएमडी)
7) ड्रायव्हर / Driver 07 पदे
10वी पास आणि राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून वैध अवजड मोटार वाहन चालविण्याचा परवाना आणि हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
8) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 14 पदे
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र.
9) आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी उत्तीर्ण आणि बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचार्‍यांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा
10) प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assistant 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा.
11) लॅब परिचर (रुग्णालय) / Lab attendant (Hospital) 01 पद
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10वी परीक्षा उत्तीर्ण
12) लेजर लिपिक / Ledger Clerk 01 पद (Government Jobs)
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र.
13) नर्सिंग ऑर्डरली / Nursing Orderly 01 पद
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10वी परीक्षा उत्तीर्ण
14) शिपाई / Peon 02 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10वी परीक्षा उत्तीर्ण
15) स्टोअर कुली / Store Coolie 02 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 7 वी परीक्षा उत्तीर्ण
16) चौकीदार / Watchman 07 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10वी परीक्षा उत्तीर्ण
17) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / Assistant Medical officer 05 पदे
एमबीबीएस पदवी
18) आय्या / Ayah 02 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 7 वी परीक्षा उत्तीर्ण
19) हायस्कूल शिक्षक (बी.एड.) / High School Teacher (B.Ed.) 07 पदे
पदवी सह संबंधित विषयात बी.एड.
20) फिटर / Fitter 01 पद
10वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर ट्रेड मध्ये आय.टी.आय
21) आरोग्य निरीक्षक / Health Inspector 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी
22) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी. टेक उत्तीर्ण
23) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 03 पदे
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी. टेक उत्तीर्ण (Government Jobs)
24) लॅब टेक्निशियन / Lab Technician 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा
25) मालिस / Malies 05 पदे
10वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून गार्डनरचा प्रमाणित अभ्यासक्रम
26) मजदूर / Mazdoor 10 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 7 वी परीक्षा उत्तीर्ण
27) सफालकर्मचारी / Safalkarmachari 69 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 7 वी परीक्षा उत्तीर्ण
28) स्टाफ नर्स / Staff Nurse 03 पदे
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी कोर्स (GNM) मध्ये बी.एस्सी उत्तीर्ण आणि नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया/राज्यात नोंदणी
29) ऑटो-मेकॅनिक / Auto-mechanic 01 पद
10वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक ट्रेड मध्ये आय.टी.आय
30) डी.एड शिक्षक / D.Ed Teacher 09 पदे
संबंधित विषयात पदवीधर, कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून डी.एड. आणि TET / CTE मध्ये पात्र असणे आवश्यक
31) फायर ब्रिगेड लस्कर / Fire Brigade Lascar 03 पदे
कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) फायर फायटिंग कोर्स
32) हिंदी टायपिस्ट / Hindi Typist 01 पद
कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण
33) मेसन / Mason 01 पद (Government Jobs)
10वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून दगडी बांधकाम ट्रेड मध्ये आय.टी.आय
34) पंप अटेंडंट / Pump Attendant 01 पद
10वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून पंप मेकॅनिक ट्रेड मध्ये आय.टी.आय

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

परीक्षा फी – (Government Jobs)

600/- रुपये [इतर उमेदवार – 400/- रुपये]

मिळणारे वेतन – 15,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Office of the Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune 411001.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – pune.cantt.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Bank Recruitment : इंडियन बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

Indian Bank Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Bank Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदांच्या 203 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंडियन बँक

भरली जाणारी पदे –

विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक)

पद संख्या – 203 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Indian Bank Recruitment)

  • विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA Or MBA (Finance) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

SC/ ST/ PWBD उमेदवारांसाठी – 175/- रुपये

इतर उमेदवारांसाठी – 850 /- रुपये (Indian Bank Recruitment)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Indian Bank Recruitment)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://indianbank.in/#!

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; 500 पदांसाठी आजच करा APPLY

BOB Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. यामुळे पदवी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन अधिकारी (Acquisition Officers) पदाच्या एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा

भरले जाणारे पद –

संपादन अधिकारी (Acquisition Officers)

पद संख्या – 500 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2023)

  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराकडे 1 वर्ष अनुभव असावा.

वय मर्यादा – 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया –

  1. ऑनलाइन परीक्षा
  2. गट चर्चा
  3. मुलाखत

आरक्षण –

UR -203 पदे
SC -75 पदे
ST -37 पदे (BOB Recruitment 2023)
OBC -135 पदे
EWS- 50 पदे

मिळणारे वेतन –

  1. मेट्रो शहरे – रु. 5 लाख प्रतिवर्षी
  2. नॉन मेट्रो शहरे – रु. 4 लाख प्रतिवर्षी

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune University Recruitment : शिक्षण फक्त 5 वी ते 10 वी अन् पुण्याच्या विद्यापीठात तुमची नोकरी फिक्स; ही आहे अर्जाची लिंक

Pune University Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात रिक्त पदांच्या (Pune University Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले विद्यापिठ, पुणे

भरले जाणारे पद –

  1. जनरल हाउसकीपर – 02 पदे
  2. कार्यालयीन सहाय्यक – 06 पदे
  3. ग्रंथालय सहाय्यक – 08 पदे

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Pune University Recruitment)

  1. जनरल हाउसकीपर – उमेदवार 5 वी पास असणे आवश्यक
  2. कार्यालयीन सहाय्यक – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक
  3. ग्रंथालय सहाय्यक – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक

मिळणारे वेतन –

  1. जनरल हाउसकीपर Rs. 5,000.00/- 12,000.00/- दरमहा
  2. कार्यालयीन सहाय्यक Rs. 6,000.00/- 20,000.00/- दरमहा (Pune University Recruitment)
  3. ग्रंथालय सहाय्यक Rs. 6,000.00/- 20,000.00/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर Register यावर क्लिक करा. (Pune University Recruitment)
  3. तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
  4. त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  5. Apply for this Opportunity वर क्लिक करा.
  6. अर्ज सबमिट करा.

काही महत्वाच्या लिंक्स – (Pune University Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

  1. जनरल हाउसकीपर – APPLY
  2. कार्यालयीन सहाय्यक I – APPLY
  3. कार्यालयीन सहाय्यक II – APPLY
  4. ग्रंथालय सहाय्यक – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIESL Recruitment 2023 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत मेगाभरती; 10 वी पास ते इंजिनियर्स करू शकतात अर्ज

AIESL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत (AIESL Recruitment 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 371 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि., मुंबई

पद संख्या – 371 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

भरली जाणारी पदे – (AIESL Recruitment 2023)

1. एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
एव्हिओनिक्स

2. स्किल्ड टेक्निशियन – 75 पदे

  • फिटर & शीट मेटल
  • पेंटर
  • टेलर/अपहोल्स्ट्री
  • वेल्डर
  • ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
  • इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
  • कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
  • MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

आरक्षण –

1. Aircraft Technicians : (SC- 29), (ST- 26), (OBC- 79), (EWS- 30) & (UR- 132) Total – 296 पदे

2. Skilled Tradesmen : (SC- 7), (ST- 5), (OBC- 18), (EWS- 7)&(UR- 37) Total – 74 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – (AIESL Recruitment 2023)

60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

2. स्किल्ड टेक्निशियन –

10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI, 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव

वय मर्यादा –

01 मार्च 2023 रोजी

18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]

मिळणारे वेतन – Rs.25,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया –

  1. लेखी चाचणी
  2. वैयक्तिक मुलाखत (AIESL Recruitment 2023)
  3. वैद्यकीय चाचणी

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.aiesl.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

  1. Aircraft Technicians – APPLY
  2. Skilled Tradesmen – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pilots Recruitment : Air India देतंय कोटीत कमवण्याची संधी; ‘या’ पोस्टवर होणार बंपर भरती 

Pilots Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट (Pilots Recruitment) कटींग केले जात असताना एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही पदांसाठी तब्बल 2 कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. एअर इंडिया B777 विमानासाठी पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी वार्षिक 2 कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. यामुळे अनुभवी पायलटेसाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.

असं असेल भरगच्च पॅकेज

अनुभवी पायलटला 17 लाखांपेक्षा जास्त पगार एअर इंडिया देणार आहे. 17 लाख 39 हजार 118 रुपये वेतन दर महिन्याला पायलटला दिले जाणार आहे. हवाई क्षेत्रात चांगल्या (Pilots Recruitment) पायलट्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. यामुळे चांगले पॅकेज देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी पाच हजार ते सात हजार तास विमान उड्डाण करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. एअर इंडियात केबिन क्रू आणि ग्राऊंड स्टाफ, सिक्योरिटी आणि अन्य तांत्रिक पोस्टसाठीही भरती केली जाणार आहे.

विमान खरेदीची मोठी ऑर्डर (Pilots Recruitment)

एअर इंडियाने नुकतीच विमान खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनुसार आता येत्या दशकात एअरबस आणि बोइंगकडून 470 विमान खरेदी करण्यात येतील. तसेच यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे.

टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले. त्यानंतर (Pilots Recruitment) एअर इंडियाच्या विस्ताराची मोठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 840 विमानांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे. आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. सध्या एअर इंडियाकडे 113 विमान आहेत. सध्या कंपनीकडे 1,600 पायलट आहेत.

विविध विमाने आणि पायलट्सची गरज

एअर इंडियाला प्रति विमान अंदाजे 30 पायलट्सची आवश्यकता भासेल. ए350 या विमानासाठी 1,200 पायलटची गरज आहे तर बोइंग 777 साठी 26 पायलट लागतील. अशा 10 विमानांचा (Pilots Recruitment) समावेश केल्यास 260 पायलट लागतील. 20 बोइंग 787 विमानांसाठी 400 पायलटची गरज आहे. अजून इतर विमानांचा विचार करता कमीत कमी 4,800 पायलटची गरज भासेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Success Story : कॉन्स्टेबल झाला लेफ्टनंट!! धाकट्या भावाच्या प्रेरणेने विमल कुमार बनले आर्मीत अधिकारी

Army Success Story Vimal Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी (Army Success Story) पूर्ण मेहनत घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकले तर तो एक ना एक दिवस नक्कीच ते ध्येय गाठतो. असंच काहीसं घडलं आहे. आग्राच्या छटे पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले 23 वर्षीय कॉन्स्टेबल विमल कुमार यांच्या बाबतीत. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील फुगाना भागातील करोडा गावातील रहिवासी असलेले कॉन्स्टेबल विमल कुमार यांनी CDSची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी अखिल भारतीय 65 वी रँक मुळवून लेफ्टनंट झाले आहेत.

वडिलांचं स्वप्न झालं पूर्ण

विमल कुमार यांनी सुरुवातीपासूनच सैन्यात जाऊन देशसेवा करणे हे आपले ध्येय बनवले होते. त्यांचे वडील धर्मेंद्र कुमार हे देखील भारतीय सैन्यात होते आणि ते नायक पदावर निवृत्त झाले आहेत. विमल कुमार वडिलांना पाहत मोठे झाले.  विमल यांनाही अंगावर लष्कराचा गणवेश घालायचा होता. याच ध्येयापोटी त्यांनी कठोर मेहनतही घेतली. आर्मी पब्लिक स्कूल, मेरठमधून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2020 मध्ये (Army Success Story) चौधरी चरणसिंग डिग्री कॉलेजमधून BA पूर्ण केले. या दरम्यान ते पोलीस भरती झाले आणि 2021 मध्ये त्यांची कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाली. कॉन्स्टेबल पदी काम करत असताना त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला. या दरम्यान त्यांना अनेकदा निराशाही आली, पण तिसर्‍या प्रयत्नात विमल कुमार यांनी CDS परीक्षा पास केली आणि लेफ्टनंट होवून त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

धाकट्या भावाने साथ दिली (Army Success Story)

विमल कुमार सांगतात की, जेव्हा ते निराश किंवा हताश व्हायचे तेव्हा त्यांचा लहान भाऊ त्यांना मदत करायचा. एके काळी तो परीक्षेत सतत नापास होत होता. त्याचे अपयश पाहून त्याच्या धाकट्या भावाने त्याला एक गोष्ट सांगितली जी त्याच्या मनाला भिडली. त्याचा धाकटा भाऊ म्हणाला की; “तुम्ही कृती सोडून विचार केलात तर वेळ उलटून तुम्हाला चावेल” म्हणून तुमच्या कृतीकडे लक्ष द्या. त्यानंतर त्यांनी कर्तव्यासह CDS परीक्षेची तयारी मनापासून केली आणि तिसर्‍यांदा CDS परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची आता लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे.

सहकाऱ्यांच्या मदतीमुळे अभ्यास करता आला

विमल कुमार सांगतात; “पोलिस विभागात काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे माझे स्वप्न होते. पोलिसांची (Army Success Story) नोकरीही एक कसोटी आहे. ही नोकरी करत असताना मी अभ्यासालाही वेळ देत असे. माझ्या यशात माझे सहकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे मला पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्यामुळे मला अभ्यास करता आला.”

युवकांसाठी संदेश (Army Success Story)

देशातील युवकांना संदेश देताना विमल कुमार म्हणतात; की तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर एकदम ठाम राहा. तुमची परिस्थिती कशीही असली तरी ध्येय साध्य (Army Success Story) करण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीकधी निराशा तुम्हाला घेरेल, पण अपयशानंतरच यश मिळते. म्हणूनच तुम्ही सतत प्रयत्न करत रहा, कधीही हार मानू नका.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : MPSC/UPSC च्या मुलाखतीत गोंधळ निर्माण करणारे 7 प्रश्न

GK Updates 23 Feb

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते.

1) कुठल्याही आरोपीला फासावर चढवून झाल्यानंतर मृत्युनंतर त्याच्या मृतदेहाचे काय केले जाते?

उत्तर – (GK Updates) कुठल्याही गुन्हेगाराला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली जात असते. तेव्हा त्याला फासावर लटकवल्यानंतर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तासांसाठी फासावर लटकवण्यात येत असते. तब्बल दोन तास गुन्हेगाराला फासावर लटकवून झाल्यानंतर डाँक्टरांना तसेच वैद्यकीय चिकित्सकांना बोलवले जाते. जेव्हा डॉक्टर तसेच वैद्यकीय चिकित्सकांनी त्या गुन्हेगाराला पुर्णपणे मृत घोषित केल्यावर त्याचा मृतदेह अखेरीस पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येतो.

2) जर आपण एखादा लाल दगड निळया समुद्रात टाकला तर काय होईल? (GK Updates)

उत्तर – जर आपण एखादा लाल दगड निळया समुद्रात टाकला तर तो पाण्यात पडल्यामुळे ओला होईल आणि दगड समुद्राच्या तळाशी जाईल.

(इथे आपण हे लक्षात घ्यायला हवे की कुठल्याही समुद्राचा रंग नैसर्गिक निळाच असतो. त्यात जर आपण दगड टाकला तर तो दगड ओला होईल तसेच तो दगड समुद्राच्या तळाशी जाईल)

3) एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?

उत्तर – एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता आरामशीर राहु शकते यात कुठलीच अडचण नाही कारण मुळातच आपण नेहमी रात्री झोपत असतो.

(हा प्रश्न आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी विचारला गेला आहे. एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?आणि निसर्गत प्रत्येक व्यक्ती ही शरीराला विश्रांती (GK Updates) देण्याकरीता रात्रीच झोपत असते आणि दिवसा आपण आपली जीवनावश्यक कामे करत असतो.)

4) मी जर तुमच्या बहिणीला माझ्यासोबत पळवून घेऊन गेलो तर अशावेळी तुम्ही काय कराल?

उत्तर – तुमच्यासारखा मोठा अधिकारी जर माझ्या बहिणीला लाईफ पार्टनर म्हणून प्राप्त होत असेल तर मला खुप आनंद होईल.

(इथे मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीला आपल्या तार्कीक क्षमता, बौध्दिक चातुर्याची, वैचारीक क्षमतेची आणि संयमाची परीक्षा घ्यायची असते की अशा परिस्थितीत आपण एक जबाबदार अधिकारी म्हणुन काय प्रतिक्रिया देऊ शकतो.)

5) अशी कुठली गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्ट्यामध्ये खाऊ शकत नाही?

उत्तर – जेवण ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्टामध्ये खाऊ शकत नाही.

(दुपारी बारा नंतर करतो त्याला जेवण म्हणतात (GK Updates) त्याला नाष्टा म्हटले जात नाही. कारण आपण सकाळी सकाळी करतो त्याला नाश्ता म्हणजेच breakfast म्हणतात आणि जेवणाच्या वेळेला जे आपण अन्न प्राशन करतो त्याला जेवणच म्हटले जाते.)

6) कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रिटच्या जमिनीवर अंडे कसे आपटु शकतो?

उत्तर – पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्नच चुकीचा विचारण्यात आला आहे की कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रिटच्या जमिनीवर अंडे कसे आपटावे? कारण काँक्रेटची जमीन इतकी देखील कमजोर नसते की तिच्यावर जर अंडे आपटले तर तिला तडा पडेल.

(आपल्याला विचारलेल्या प्रश्नाला आपण किती गांभीर्याने ऐकतो तसेच समजून घेतो हे बघण्यासाठी याचे परीक्षण करण्यासाठी मुलाखतीत असे प्रश्न विचारले जात असतात.)

7) असा कुठला पक्षी (GK Updates) आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो?

उत्तर – फुलपाखरू हा एक असा पक्षी आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 10 वी पाससाठी बंपर जॉब ओपनिंग; यंत्र इंडिया अंतर्गत ‘या’ पदांवर होणार भरती

Government Jobs (17)

करिअरनामा ऑनलाईन । यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या तब्बल 5454 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 1 मार्च 2023 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर

पद संख्या – 5450 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 1 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

1. आयटीआय / Non- ITI – 1936 पदे

उमेदवार 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

2. आयटीआय / Ex- ITI – 3514 पदे

उमेदवार NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य) असणे आवश्यक.

वय मर्यादा – 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही (Government Jobs)

निवड प्रक्रिया –

या भरतीसाठी निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – yantraindia.co.in/home.php

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com