GK Updates : MPSC/UPSC च्या मुलाखतीत गोंधळ निर्माण करणारे 7 प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते.

1) कुठल्याही आरोपीला फासावर चढवून झाल्यानंतर मृत्युनंतर त्याच्या मृतदेहाचे काय केले जाते?

उत्तर – (GK Updates) कुठल्याही गुन्हेगाराला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली जात असते. तेव्हा त्याला फासावर लटकवल्यानंतर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तासांसाठी फासावर लटकवण्यात येत असते. तब्बल दोन तास गुन्हेगाराला फासावर लटकवून झाल्यानंतर डाँक्टरांना तसेच वैद्यकीय चिकित्सकांना बोलवले जाते. जेव्हा डॉक्टर तसेच वैद्यकीय चिकित्सकांनी त्या गुन्हेगाराला पुर्णपणे मृत घोषित केल्यावर त्याचा मृतदेह अखेरीस पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येतो.

2) जर आपण एखादा लाल दगड निळया समुद्रात टाकला तर काय होईल? (GK Updates)

उत्तर – जर आपण एखादा लाल दगड निळया समुद्रात टाकला तर तो पाण्यात पडल्यामुळे ओला होईल आणि दगड समुद्राच्या तळाशी जाईल.

(इथे आपण हे लक्षात घ्यायला हवे की कुठल्याही समुद्राचा रंग नैसर्गिक निळाच असतो. त्यात जर आपण दगड टाकला तर तो दगड ओला होईल तसेच तो दगड समुद्राच्या तळाशी जाईल)

3) एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?

उत्तर – एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता आरामशीर राहु शकते यात कुठलीच अडचण नाही कारण मुळातच आपण नेहमी रात्री झोपत असतो.

(हा प्रश्न आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी विचारला गेला आहे. एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?आणि निसर्गत प्रत्येक व्यक्ती ही शरीराला विश्रांती (GK Updates) देण्याकरीता रात्रीच झोपत असते आणि दिवसा आपण आपली जीवनावश्यक कामे करत असतो.)

4) मी जर तुमच्या बहिणीला माझ्यासोबत पळवून घेऊन गेलो तर अशावेळी तुम्ही काय कराल?

उत्तर – तुमच्यासारखा मोठा अधिकारी जर माझ्या बहिणीला लाईफ पार्टनर म्हणून प्राप्त होत असेल तर मला खुप आनंद होईल.

(इथे मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीला आपल्या तार्कीक क्षमता, बौध्दिक चातुर्याची, वैचारीक क्षमतेची आणि संयमाची परीक्षा घ्यायची असते की अशा परिस्थितीत आपण एक जबाबदार अधिकारी म्हणुन काय प्रतिक्रिया देऊ शकतो.)

5) अशी कुठली गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्ट्यामध्ये खाऊ शकत नाही?

उत्तर – जेवण ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्टामध्ये खाऊ शकत नाही.

(दुपारी बारा नंतर करतो त्याला जेवण म्हणतात (GK Updates) त्याला नाष्टा म्हटले जात नाही. कारण आपण सकाळी सकाळी करतो त्याला नाश्ता म्हणजेच breakfast म्हणतात आणि जेवणाच्या वेळेला जे आपण अन्न प्राशन करतो त्याला जेवणच म्हटले जाते.)

6) कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रिटच्या जमिनीवर अंडे कसे आपटु शकतो?

उत्तर – पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्नच चुकीचा विचारण्यात आला आहे की कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रिटच्या जमिनीवर अंडे कसे आपटावे? कारण काँक्रेटची जमीन इतकी देखील कमजोर नसते की तिच्यावर जर अंडे आपटले तर तिला तडा पडेल.

(आपल्याला विचारलेल्या प्रश्नाला आपण किती गांभीर्याने ऐकतो तसेच समजून घेतो हे बघण्यासाठी याचे परीक्षण करण्यासाठी मुलाखतीत असे प्रश्न विचारले जात असतात.)

7) असा कुठला पक्षी (GK Updates) आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो?

उत्तर – फुलपाखरू हा एक असा पक्षी आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com