Army Success Story : कॉन्स्टेबल झाला लेफ्टनंट!! धाकट्या भावाच्या प्रेरणेने विमल कुमार बनले आर्मीत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी (Army Success Story) पूर्ण मेहनत घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकले तर तो एक ना एक दिवस नक्कीच ते ध्येय गाठतो. असंच काहीसं घडलं आहे. आग्राच्या छटे पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले 23 वर्षीय कॉन्स्टेबल विमल कुमार यांच्या बाबतीत. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील फुगाना भागातील करोडा गावातील रहिवासी असलेले कॉन्स्टेबल विमल कुमार यांनी CDSची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी अखिल भारतीय 65 वी रँक मुळवून लेफ्टनंट झाले आहेत.

वडिलांचं स्वप्न झालं पूर्ण

विमल कुमार यांनी सुरुवातीपासूनच सैन्यात जाऊन देशसेवा करणे हे आपले ध्येय बनवले होते. त्यांचे वडील धर्मेंद्र कुमार हे देखील भारतीय सैन्यात होते आणि ते नायक पदावर निवृत्त झाले आहेत. विमल कुमार वडिलांना पाहत मोठे झाले.  विमल यांनाही अंगावर लष्कराचा गणवेश घालायचा होता. याच ध्येयापोटी त्यांनी कठोर मेहनतही घेतली. आर्मी पब्लिक स्कूल, मेरठमधून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2020 मध्ये (Army Success Story) चौधरी चरणसिंग डिग्री कॉलेजमधून BA पूर्ण केले. या दरम्यान ते पोलीस भरती झाले आणि 2021 मध्ये त्यांची कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाली. कॉन्स्टेबल पदी काम करत असताना त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला. या दरम्यान त्यांना अनेकदा निराशाही आली, पण तिसर्‍या प्रयत्नात विमल कुमार यांनी CDS परीक्षा पास केली आणि लेफ्टनंट होवून त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

धाकट्या भावाने साथ दिली (Army Success Story)

विमल कुमार सांगतात की, जेव्हा ते निराश किंवा हताश व्हायचे तेव्हा त्यांचा लहान भाऊ त्यांना मदत करायचा. एके काळी तो परीक्षेत सतत नापास होत होता. त्याचे अपयश पाहून त्याच्या धाकट्या भावाने त्याला एक गोष्ट सांगितली जी त्याच्या मनाला भिडली. त्याचा धाकटा भाऊ म्हणाला की; “तुम्ही कृती सोडून विचार केलात तर वेळ उलटून तुम्हाला चावेल” म्हणून तुमच्या कृतीकडे लक्ष द्या. त्यानंतर त्यांनी कर्तव्यासह CDS परीक्षेची तयारी मनापासून केली आणि तिसर्‍यांदा CDS परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची आता लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे.

सहकाऱ्यांच्या मदतीमुळे अभ्यास करता आला

विमल कुमार सांगतात; “पोलिस विभागात काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे माझे स्वप्न होते. पोलिसांची (Army Success Story) नोकरीही एक कसोटी आहे. ही नोकरी करत असताना मी अभ्यासालाही वेळ देत असे. माझ्या यशात माझे सहकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे मला पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्यामुळे मला अभ्यास करता आला.”

युवकांसाठी संदेश (Army Success Story)

देशातील युवकांना संदेश देताना विमल कुमार म्हणतात; की तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर एकदम ठाम राहा. तुमची परिस्थिती कशीही असली तरी ध्येय साध्य (Army Success Story) करण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीकधी निराशा तुम्हाला घेरेल, पण अपयशानंतरच यश मिळते. म्हणूनच तुम्ही सतत प्रयत्न करत रहा, कधीही हार मानू नका.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com