Home Blog Page 358

Business Success Story : फॅशनच्या दुनियेतील चमकता तारा रितू कुमार; 50 हजारांच्या भांडवलातून करोडोंची कमाई

Business Success Story Ritu Kumar

करिअरनामा ऑनलाईन । महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत (Business Success Story) आहेत. एवढच नव्हे तर पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिला चमकदार कामगिरी करत आहेत. जर आपण फॅशन डिझायनिंगबद्दल बोललो, तर भारतात असे अनेक फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांच्या डिझायनिंगने देशातच नाही तर परदेशातही धूम केली आहे. भारतीय महिला फॅशन डिझायनर्स प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत उतरत आहेत; त्यापैकीच एक आहेत रितू कुमार…

रितू कुमार ही पहिली भारतीय महिला फॅशन डिझायनर आहे ज्यांनी भारतीय संस्कृतीला नव्या रूपात प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. त्या केवळ प्रसिद्ध लोकांसाठीच नाही तर मध्यमवर्गीयांनाही ध्यानात ठेवून कपडे डिझाइन करतात; जेणेकरून लोकांना त्यांनी बनवलेले कपडे सहज खरेदी करता येतील.

Success Story Ritu Kumar

50 हजारात सुरु केला व्यवसाय (Business Success Story)

रितू कुमार यांनी अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलावर आपला व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे. देशभरात तिची दुकाने आहेत. सुरवातीला कोलकात्याच्या एका छोट्याशा शहरात 4 हँड प्रिंटर आणि 2 ब्लॉक्सच्या मदतीने तीने आपले काम सुरू केले. त्यावेळी आपल्याला इतकं यश मिळेल याची कल्पनाही त्यांना  नव्हती.

Success Story Ritu Kumar

मोठ-मोठ्या अभिनेत्रींनी केला रितूसाठी रॅम्प वॉक

रितू कुमार यांच्या आउटफिट्स अनेक फॅशन शोमध्ये आकर्षण ठरल्या आहेत. इतकेच नाही तर अदिती राव हैदरी, निम्रत कौर, दिव्या खोसला, तापसी पन्नू, वाणी कपूर, क्रिती सेनॉन (Business Success Story) आणि दिशा पटानी यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्यासाठी रॅम्प वॉक केला आहे.

Success Story Ritu Kumar

अमृतसरची रहिवासी रितू (Business Success Story)

रितू कुमार यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे 11 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. त्यांनी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. दिल्लीच्या लेडी इर्विन कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या.

Success Story Ritu Kumar

कंपनीचा टर्न ओव्हर

रितू यांनी 1960 आणि 70 च्या दशकात लग्नातील वधूचा पोषाख आणि संध्याकाळची कपडे डिझाईन करायला सुरुवात केली. नंतरच्या दोन दशकांत त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यांच्या कंपनीने पॅरिस, लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही शाखा उघडल्या आहेत. लंडनची शाखा (Business Success Story) तीन वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये बंद झाली. त्यावेळी त्यांच्या  कंपनीची वार्षिक उलाढाल कोणत्याही भारतीय फॅशन आउटलेटपेक्षा सर्वाधिक म्हणजेच अंदाजे INR 10 अब्ज इतकी होती. नंतर 2002 मध्ये त्यांनी मुलगा अमरिशसोबत ‘लेबल’ ब्रॅंड लाँच केला जो चांगलाच नावारुपाला आला.

Success Story Ritu Kumar

रितू यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही

फॅशन इंडस्ट्रीतील कामगिरीसोबतच त्यांनी विविध पुरस्कारही जिंकले आहेत. त्यांना 2013 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. नंतर त्यांनी L’Oreal Paris Femina Women’s Awards पुरस्कार जिंकला. रितू यांनी त्यांच्या कलेतील ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यावर आधारित फॅशनचे साम्राज्य उभे केले. रितू सांगतात; ज्ञान इतर कोणत्याही प्रतिभेइतकेच महत्त्वाचे आहे. तुमची कौशल्ये (Business Success Story) योग्यरित्या तयार करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे. शिक्षण हे अत्यावश्यक नसले तरी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. तुमच्यातील क्षमता तुम्हाला एक व्यापक दृष्टिकोन देते ज्याद्वारे तुम्ही जग पाहू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News Update : MPSC मुलाखतीच्या तारखा बदलल्या; कधी आणि कुठे होणार मुलाखत; इथे मिळेल संपूर्ण माहिती

MPSC News Update

करिअरनामा ऑनलाईन। MPSC च्या मुलाखतींसाठी पात्र ठरलेल्या (MPSC News Update) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2021 सध्या पुण्यात सुरु आहेत. यापैकी दोन तारखांच्या मुलाखती या पुढे ढकलण्यात आल्या आहेत तसंच या मुलाखतीचं स्थळही बदलण्यात आलं आहे. MPSC नं ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.

बदललेली तारीख आणि ठिकाण – (MPSC News Update)

1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2021 च्या मुलाखतीचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे इथे सुरु आहे. मात्र या मुलाखतींच्या 23 व 24 फेब्रुवारी, 2023 च्या शेड्युलमधेबद्दल करण्यात आले आहेत. या दोन दिवसांच्या मुलाखतीच्या तारखा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या तारखांच्या मुलाखती या आता दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत. तसंच या मुलाखतीचं स्थळही बदलण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

2. MPSC नं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुलाखती क्रमांक 1193 त 1212 (1209 वगळून) या मुलाखती 23 फेब्रुवारीला होणार होत्या त्या आता 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत तसंच (MPSC News Update) या मुलाखती महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

3. तसंच मुलाखती क्रमांक 1269 ते 1280 या मुलाखतींची तारीख 24 फेब्रुवारी, 2023 होती. या मुलाखती आता दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत तसंच या मुलाखती (MPSC News Update) महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

संबंधित मुलाखत क्रमांक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी या सुधारित तारखांची नोंद घ्यावी असं आवाहन MPSC तर्फे करण्यात आलं आहे. तसंच सुधारित पत्त्यावर वेळेत उपस्थित (MPSC News Update) राहण्याचं आवाहन आयोगानं केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; काय आहे पात्रता?

PMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी (PMC Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. पुणे शहरातील पुणे मनपा कोर्ट, पुणे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालये, ग्राहक मंच व हरित लवाद तसेच महसुल खात्याकडील पुणे महानगरपालिका पक्षकार असलेल्या दाव्यांमध्ये तसेच महापालिकेच्या निरनिराळया खात्यांस अभिप्राय देणेकामी पुणे महानगरपालिकेचे वतीने वकील म्हणून कामकाज पाहण्यासाठी वकिलांच्या मान्य फी धोरणानुसार शर्ती अटींवर नेमणूक केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र वकिलांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.

संस्था – पुणे महानगर पालिका, पुणे

भरले जाणारे पद – वकील

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग खोली क्र. २१९ दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे-४११००५

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PMC Recruitment 2023)

1. मान्यताप्राप्त विदयापीठाची विधी शाखेची पदवी

2. किमान 10 वर्षे मे. न्यायालयात प्रत्यक्ष प्रॅक्टीसचा अनुभव / कन्व्हेयांसींग व कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज करण्याचा 10 वर्षाचा अनुभव

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (PMC Recruitment 2023)
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.
  5. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

महत्वाचे –

  1. सदरची नेमणूक अस्थायी स्वरुपाची 3 वर्षे कालावधी करीता मानधन व पॅनेल तत्वावर असल्याने या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.
  2. उमेदवारांनी अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आवश्यक मुळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती व अनुभवाच्या मूळ सत्यप्रतीचे दोन संच सादर करणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारास नियुक्ती देण्याबाबत सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकाराचा दावा सांगता येणार नाही. (PMC Recruitment 2023)
  4. निवड झालेल्या वकिलांना मुख्य विधी अधिकारी, विधी विभाग पुणे मनपा यांचे कार्यालयात दररोज वेळेवर उपस्थित राहून रोजचे रोज त्यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करावयाचे असून सदर कामाचे स्वरुप ठरविण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहतील.
  5. मुलाखातीस येणा-या उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  6. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीचा अनुभव असल्यास नमुद करावा.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्जाचा नमुना Download करा – Application 

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Saraswat Bank Recruitment : 10 वी पाससाठी खुशखबर!! सारस्वत बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु

Saraswat Bank Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सारस्वत को. ओपरेटीव्ह बँक लिमिटेड येथे (Saraswat Bank Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक – सारस्वत को. ओपरेटीव्ह बँक लिमिटेड

भरले जाणारे पद – डाटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या – 04 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Saraswat Bank Recruitment)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 6,000 – Rs. 20,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Saraswat Bank Recruitment)

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
  3. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा आणि अर्ज करण्यासाठी CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Study Tips : अशी करा परीक्षेची तयारी; ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर मिळेल हवं ते कॉलेज

Study Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं, अशी (Study Tips) अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी आवश्यक असणारी ग्रेड विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक असतं. ज्यावेळी त्यांना अशा ग्रेड मिळतात, त्यानंतर अर्ज करताना कोणतीही चुकी होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं असतं.

परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी चांगल्या अॅकेडमिक ग्रेडची आवश्यकता असते. पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही (Study Tips) टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकतं.

1. वेळेचं योग्य नियोजन

जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता, त्यावेळी वेळेचं नियोजन असणं खूप महत्वाचं असतं. वेळ फुकट जाणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली (Study Tips) पाहिजे. वेळेचं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि प्रत्येक विषयासाठी एक प्लॅन करा. जर एखादा विषय कठीण वाटत असेल, तर त्यासाठी जास्त वेळ द्या.

2. शॉर्ट नोट्स बनवा (Study Tips)

जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल,त्यावेळी छोट्या नोट्स तयार करा. याचा फायदा तुम्हाला एखाद्या विषयाचं रिवीजन करताना होईल. तुमचा वेळही वाचेल आणि कमी अभ्यासात जास्त काम होईल.

3. योग्य पुस्तके निवडा

परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न ज्या पुस्तकांमधून विचारले जातात, अशाच पुस्तकांचा अभ्यास करा. परीक्षेत ज्या विषयांचे प्रश्न विचारले जात नाहीत, असा पुस्तकातील (Study Tips) अभ्यास करु नका.

4. सिलॅबस समजून घ्या

परीक्षेची तयारी सुरु करण्याआधी सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती गोळा करा. परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांच्या सिलॅबसची सविस्तर माहिती वाचा. कोणत्याही (Study Tips) विषयाकडे किंवा चॅप्टरकडे दुर्लक्ष करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SECL Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी!! साउथ इस्टर्न कोलफिल्डमध्ये जॉबची बंपर ओपनिंग

SECL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. येथे विविध रिक्त पदे (SECL Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ आणि डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ पदाच्या एकूण 405 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.

पद संख्या – 405 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SECL Recruitment 2023)

  • माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ – 350 पदे
  1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र असावे.
  3. गॅस परिक्षण प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र असावे.
  • डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ – 55 पदे
  1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. सर्व्हे प्रमाणपत्र असावे.

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी Rs. 1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – छत्तीसगढ & मध्य प्रदेश (SECL Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

  1. माइनिंग सरदार – 31,852/- दरमहा
  2. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) – 31,852/- दरमहा

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा (MCQ)
  2. दस्तऐवज पडताळणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (SECL Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – secl-cil.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – http://secl-cil.in/career.php

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SCI Mumbai Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन, मुंबईमध्ये नवीन भरती सुरु; काय आहे पात्रता?

SCI Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे (SCI Mumbai Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्रेन ऑपरेटर पदाच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई

भरले जाणारे पद – क्रेन ऑपरेटर

पद संख्या – 04 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – शिपिंग हाऊस द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. 245, मादाम कामा रोड मुंबई-400021

मुलाखतीची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SCI Mumbai Recruitment)

1) Diploma in Mechanical Engineering from a recognized polytechnic or National Trade Certificate in the trade of Fitter/Marine Fitter or Diesel / Motor Mechanic or Machinist or Welder issued by National Council of Training in Vocational Trade, Ministry of Labour, Government of India (NCTVT) or by the Industrial Training Institute of State Government (ITI).

2) Minimum One Year of Rank experience as a Crane Operator.

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे. (SCI Mumbai Recruitment)
  2. मुलाखती दिवशी दिलेल्या वेळी सर्व अर्जदारांनी निवड हॉलमध्ये हजर रहायचे आहे.
  3. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि मुलाखतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाईल.
  4. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
  5. आवश्यकतेनुसार/रिक्त जागांनुसार वैद्यकीय आणि पोस्टिंगसाठी उमेदवारांना बोलावले जाईल.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! राज्याच्या ‘या’ ST आगारात भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर

भरले जाणारे पद – (MSRTC Recruitment 2023)

  1. मेकॅनिक डिझेल – 05 पदे
  2. पेंटर – 05 पदे
  3. वेल्डर – 05 पदे
  4. मोटार वाहन बॉडी बिल्डर – 20 पदे

पद संख्या – 35 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

  1. मेकॅनिक डिझेल – 10 वी उत्तीर्ण
  2. पेंटर – 08 वी उत्तीर्ण
  3. वेल्डर – 08 वी उत्तीर्ण
  4. मोटार वाहन बॉडी बिल्डर – 10 वी उत्तीर्ण

मिळणारे वेतन – 

  1. मेकॅनिक डिझेल Rs. 6,000.00 – 8,388.00/- दरमहा
  2. पेंटर Rs. 5,000.00 – 9,436.00/- दरमहा
  3. वेल्डर Rs. 5,000.00 – 9,436.00/- दरमहा (MSRTC Recruitment 2023)
  4. मोटार वाहन बॉडी बिल्डर Rs. 6,000.00 – 8,388.00/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. (MSRTC Recruitment 2023)
  3. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

मेकॅनिक डिझेल – APPLY

पेंटर – APPLY

वेल्डर – APPLY

मोटार वाहन बॉडी बिल्डर – APPLY

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता? गोंधळू नका.. उत्तरे वाचा

GK Updates 20 Feb

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते.

प्रश्न – मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता?
उत्तर- मानवानंतर डॉल्फिन मासा हा अतिशय बुद्धिमान मानला जातो.

प्रश्न – सफरचंद कापल्यानंतर काही तासांनंतर त्याचा रंग का बदलतो?

उत्तर- सफरचंदमध्ये कॅटेचिन, पॉलिफेनॉल आणि कॅफिन असते. सफरचंद कापल्यावर त्यात असलेले आम्ल हवेत मिसळते. त्यामुळे त्याचा रंग लाल होतो.

प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे जी पिसली जाते, वाटली जातात पण खाल्ली जात नाही?
उत्तर – पत्ते खेळताना पत्ते कापले जातात, जमिनीवर टाकले जातात आणि वाटलेही जातात.

प्रश्न – डोके आणि शेपटी आहे, परंतु इतर भाग नाही?
उत्तर- नाणे असं या प्रश्नाचं उत्तर आहे. नाण्याला हेड आणि टेल दोन्ही असते. पण दुसरे काहीही नसते.

प्रश्न – (GK Updates) अशी कोणती गोष्ट आहे, जी कापली गेल्यावर लोक आनंदोत्सव साजरा करतात?
उत्तर- केक कापला की लोक आनंद करतात.

प्रश्न – असे कोणते दुकान आहे, जिथे लोकांना वस्तू आणि पैसे दोन्ही द्यावे लागतात?
उत्तर- लोकांना न्हाव्याच्या दुकानात केसांसह पैसे द्यावे लागतात.

प्रश्न – स्त्रीचे कोणते रूप तिचा पती कधीही पाहू शकत नाही?
उत्तर- स्त्रीचे विधवा रूप तिचा पती कधीही पाहू शकत नाही.

प्रश्न – अर्धवट कापलेले सफरचंद कसे दिसते? (GK Updates)
उत्तर- अर्धवट कापलेल्या सफरचंदाप्रमाणेच दिसते.

प्रश्न – एक व्यक्ती 24 तासांत किती वेळा श्वास घेते?
उत्तर- एक व्यक्ती दिवसातून 17 ते 30 हजार वेळा श्वास घेते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Employment News : ‘मागेल त्याला अन् हवं ते काम मिळणार’!! 8 लाखापेक्षा जास्त तरुणांना होणार फायदा

Employment News

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या ग्रामीण (Employment News) रोजगार हमी योजनेत आता नोकरी मिळणार आहे. सरकारने या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मागेल त्याला काम देण्यासोबतच या योजनेत आता हवं ते काम मिळणार आहे. त्यामुळे गावातच किंवा गावाजवळील मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मजुरांची कामासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

सरकार देणार 100 दिवसाचा रोजगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत एकूण 262 सार्वजनिक व वैयक्तिक कामे करण्यात आली आहेत. संबंधित (Employment News) योजनेंतर्गत काम मागणाऱ्या अकुशल कामगारांना नोकरी देण्याची तरतूद आहे. मजुरांना 100 दिवसांपर्यंत रोजगार मिळत आहे. 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. योजनेचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन केले जाते आणि वेतनाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

रोजगार हमी योजनेतून ‘हवं ते काम’ मिळणार (Employment News)

रोजगार हमी योजनेत सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. या योजनेतून आता तुम्हाला हवी ती नोकरी मिळेल. त्यामुळे प्रत्येक मजुराला त्यांच्या पद्धतीने काम मिळेल. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मजुरांना दररोज 265 रुपये दिले जातात. यामध्ये स्त्री व पुरुष असा भेद केला जात नाही. वर्धा जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत 38 हजार 249 मजुरांना काम देण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यासाठी 8.56 लाख मजुरांचे उद्दिष्टय

वर्धा जिल्हा प्रशासनाला 8.56 लाख मजुरांची नोंदणी (Employment News) करून त्यांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. तर दहा महिन्यांत 38 हजारांहून अधिक मजुरांना काम देण्यात आले आहे.

मजुरीचे पैसे लगेच दिले जातात

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत 38 हजारांहून अधिक मजुरांनी काम केले आहे. त्यापैकी 95 टक्के कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळाला (Employment News) आहे. सर्वच मजुरांना त्यांच्या श्रमाचा मोबदला त्वरित मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com