Home Blog Page 359

HSC Exam 2023 : उद्यापासून12 वी चे पेपर सुरु; प्रश्न पत्रिकांचे GPS Tracking होणार; काय आहे नवी नियमावली?

HSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Exam 2023) मंडळातर्फे बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कोरोना काळानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून 2 लाख 60 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रे म्हणून 654 उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये निश्चित करण्यात आली आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून (HSC Exam 2023) परिरक्षक कार्यालयात (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती. निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. सकाळी 10:30 व दुपारी 02:30 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसणे अशा काही बदलांसह विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

करोनानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. ऑनलाइन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला. हे लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर सराव परीक्षांवर अधिक भर देण्यात आला.

प्रश्न  होणार जीपीएस ट्रॅकिंग (HSC Exam 2023)

परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळणार 10 मिनिटांचा अधिक वेळ

यावर्षीपासून 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय (HSC Exam 2023) घेतला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे अगोदर दिल्या जात होते. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास 10 मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.

हे आहेत महत्त्वाचे बदल (HSC Exam 2023)

1. प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत म्हणजेच सकाळी 11 व दुपारी 3 वाजता

2. निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे अधिक कालावधी.

3. सकाळी 10:30 व दुपारी 2:30 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाही

4. परीक्षक परीक्षा कक्षात उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून दाखवणार.

5. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार.

6. परीक्षा केंद्राच्या 50  मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही

7. परीक्षा केंद्रावर कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश

8. शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या वेळी झडती घेणार. (HSC Exam 2023)

9. परीक्षा केंद्रांवर बैठे पथके असणार.

10. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा, तर महसूल विभागाची 10 पथके

11. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, ग्रामविकास विभागाची पथके

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Unique Career Options : ‘हे’ जॉब्स करा आणि जगभर फिरा; मिळेल रग्गड पैसा

Unique Career Options (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना असं वाटतं मला जगभर फिरून (Unique Career Options) नोकरी करता आली असती तर किती छान झालं असतं. पण हे फक्त स्वप्न किंवा मनात आलेला विचार नव्हे तर खरंच तुम्ही असे काही जॉब्स करु शकता ज्यामधून तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोअर करु शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जगभर फिरू शकता. तुम्ही पात्र असल्यास हे काही जॉब्स ऑप्शन करियर म्हणूनही निवडू शकता.

स्त्रियांसाठी Air Hostess चा पर्याय अगदी उत्तम (Unique Career Options)

हवाई सुंदरीला एरोप्लेनच्या माध्यमातून जगभर फिरायला मिळू शकतं. तेव्हा ज्यांना जगभर फिरून त्यांचं करियर एक्स्पोअर करायचं असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन अगदी उत्तम ठरेल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जगभर फिरू शकता. तुम्ही पात्र असल्यास हे काही जॉब्स ऑप्शन करियर म्हणूनही निवडू शकता.

पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी ‘हे’ पर्याय ठरतील उत्तम

1. पायलट

2. Row agent (गुप्त हेर)

3. पंतप्रधान

4. राजदूत (Unique Career Options)

5. Travel XP चॅनल मधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा / री.

6. डिस्कवरी चांलमधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा /री.

7. प्रसिद्ध नट / नटी यांचा सेक्रेटरी

8. मर्चंड नेव्हीमधील फिरते कर्मचारी

9. शास्त्रज्ञ

10. ट्रॅव्हल कंपनी मधील गाईड (Unique Career Options)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : आपल्याला दोन डोळे आहेत, मग आपल्याला एका वेळी एकच गोष्ट का दिसते?

GK Updates 19 Feb

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न – आपल्याला दोन डोळे आहेत, मग आपल्याला एका वेळी एकच गोष्ट का दिसते?

उत्तर – आपण गोष्टी डोळ्यांनी पाहत नाही तर मनाने पाहतो. प्रथम दोन्ही डोळे एकाच गोष्टीला लक्ष्य करतात, त्यानंतर त्या वस्तूचे अस्पष्ट चित्र तयार होते, त्यानंतर मेंदू ती वस्तू योग्य स्वरूपात दाखवतो.

प्रश्न – (GK Updates) काही गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत पण इतर वापरतात?

उत्तर – व्यक्तीचे नाव, कोणत्याही व्यक्तीचे नाव बहुतेकदा इतर लोक जास्त वापरतात.

प्रश्न – जगात किती धर्म आहेत?

उत्तर – हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत परंतु जगात 300 पेक्षा जास्त धर्म  आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत.

प्रश्न – 01 वर्षात किती तास असतात?

उत्तर – 8760 तास (GK Updates)

प्रश्न – 01 महिन्यात किती तास असतात?

उत्तर – 730.01 तास

प्रश्न – हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो?

उत्तर – 5 लिटर.

प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?

उत्तर – तारीख. (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत योग शिक्षकांची भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert (15)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून योग शिक्षक पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे

भरले जाणारे पद – योग शिक्षक / Yoga Teacher

पद संख्या – 27 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1) कैवल्यधामा, लोणावळा, पुणे

2) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव – 425001.

3) राममणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था, पुणे (Job Alert)

4) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – 444602.

उमेदवाराने वरील विद्यापिठामधून किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून योगप्रशिक्षणाची पदवी धारण केलेली असावी.

परीक्षा फी – फी नाही (Job Alert)

मिळणारे वेतन – 250/- रुपये (प्रति योग सत्र)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे- 400602.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : डॉक्टर तरुणीनं IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण; दोन वेळा नापास होवून तिसऱ्यांदा मारली बाजी

IAS Success Story Anshu Priya

करिअरनामा ऑनलाईन। अंशूने सांगितले की, तिच्या बरोबरची प्रत्येक (IAS Success Story) मुलगी विवाहित आहे, परंतु घरच्यांनी तिच्यावर कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही. कुटुंबीयांनी तिला जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळे केले आणि तिला भक्कम पाठिंबा दिला. याचा परिणाम असा झाला की तिला आयुष्यात हवे ते मिळवता आले. ही कहाणी आहे बिहारच्या अंशू प्रिया या तरुणीची.

तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला होतो हे खरं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट, जमालपूर येथील अंशु प्रियाने संपूर्ण भारतातून 16 वा क्रमांक मिळवत IAS पदापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे ती पेशाने डॉक्टर आहे.

 

Success Story Anshu Priya

तिसऱ्या प्रयत्नात मारली बाजी (IAS Success Story)

अंशु प्रिया 2019 मध्ये पहिल्यांदा परीक्षेला बसली होती. परंतु ती पूर्व परीक्षा देखील उत्तीर्ण होवू शकली नाही. दुसऱ्या प्रयत्नातही त्याला अपयश आलं. अखेर 2021 मध्ये तीने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि AIR 16 मिळवली.

कोण आहे IAS अंशू प्रिया?

अंशू MBBS पदवीधर असून बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील शिक्षक आहेत. ती शिक्षकांच्या कुटुंबातील आहे आणि तिचे दोन्ही आजी आजोबाही शिक्षण (IAS Success Story) देण्याचे काम करत होते. अंशू प्रियाने तिचे शालेय शिक्षण नोट्रे डेम अकादमी मुंगेर येथे पूर्ण केले आणि नंतर MBBS करण्यासाठी ती एम्स पटना येथे गेली. त्यानंतर पटना एम्समध्ये तीने निवासी डॉक्टर म्हणून काम केले. UPSC ची परीक्षा देताना तीने कठोर परिश्रम घेतले. वैद्यकीय विज्ञान हा तिचा ऐच्छिक विषय होता.

Success Story Anshu Priya

डॉक्टर झाल्यानंतर घेतला UPSC चा निर्णय (IAS Success Story)

MBBS पदवी मिळाल्यानंतर अंशुने काही रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्ये प्रॅक्टिसही केली. डॉक्टर होवूनही अंशू समाधानी नव्हती. कारण तीने IAS होण्याचं ध्येय उराशी (IAS Success Story) बाळगलं होतं. निवासी डॉक्टर म्हणून नोकरी करत असताना तीने UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि तिसर्‍याच प्रयत्नात ती या परिक्षेत उत्तीर्ण झाली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MGNREGA Bharti 2023 : मुंबईमध्ये नोकरी अन् पगार 70,000; मनरेगा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

MGNREGA Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA Bharti 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

भरले जाणारे पद – संचालक / Director

पद संख्या – 1 पद

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MGNREGA Bharti 2023)

सामाजिक अंकेक्षण क्षेत्रातील किमान 02 वर्षाच्या अनुभवासह समाजसेवा शाखेतील पदव्युत्तर पदवी

वय मर्यादा – कमाल 62 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 70,000/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (MGNREGA Bharti 2023)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नियोजन (रोहयो) विभाग क्रमांक: मग्रारो 2021 /प्र.क्र.06 /रोहयो – 6 अ नवीन प्रशासन भवन, 16 वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई – 32.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nrega.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेत लिपिकांच्या 1100 जागांसाठी लवकरच होणार भरती

BMC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या महिन्यात जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका व्यवस्थापनाने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या भरती (BMC Recruitment 2023) प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात या भरती प्रक्रियेसाठी केंद्र उपलब्ध करून देता येईल का? याबाबतची चाचपणी सध्या महानगरपालिका स्तरावर सुरू आहे.

कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी (BMC Recruitment 2023) त्रयस्थ संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेसोबत महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे. IBPS आणि TCS या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत सुमारे 40 टक्के पदे रिक्त आहेत. यासाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPPB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती सुरु; ‘ही’ पदे आहेत रिक्त

IPPB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे रिक्त पदांच्या (IPPB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक

पद संख्या – 41 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. ज्युनियर असोसिएट (IT) – 15 पदे

बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 03 वर्षांचा अनुभव

2. सहाय्यक व्यवस्थापक (IT) – 10 पदे

बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 05 वर्षांचा अनुभव

3. व्यवस्थापक (IT) – 9 पदे

बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 07 वर्षांचा अनुभव

4. वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 5 पदे (IPPB Recruitment 2023)

बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 09 वर्षांचा अनुभव

5. मुख्य व्यवस्थापक (IT) – 2 पदे

बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 11 वर्षांचा अनुभव

वय मर्यादा – (IPPB Recruitment 2023)

कमाल 55 वर्षे

वयात सवलत – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट

परीक्षा फी – Rs.750/-

निवड प्रक्रिया –

  1. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  2. मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – चेन्नई/ दिल्ली/ मुंबई (IPPB Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education Scholarship : अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनो… तुम्हाला नामांकित संस्थांमध्ये मिळणार उच्च शिक्षणाची संधी

Education Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून (Education Scholarship) अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता उपलब्ध असलेल्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केलेली आहे.

राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य, ज्ञान उपलब्ध व्हावे, त्यांची विविध क्षेत्रात होणाऱ्या स्पर्धात्मक युगासाठी जडण-घडण व्हावी, याकरिता देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे. या प्रवर्गातील (Education Scholarship) विद्यार्थ्यांकडून प्राप्त अर्जांची छाननी करताना समाजकल्याण विभागाचे आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. समिती सदस्यांची बैठक गेल्यावर्षी 13 डिसेंबरला झाली होती. या बैठकीत निवड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

असे मिळणार फायदे – (Education Scholarship)

1. शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने ठरविलेले पूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क समाज कल्याण आयुक्तालयामार्फत संस्थेला देण्यात येईल.

2. विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेकडून वसतीगृह, भोजन शुल्क त्यांच्या आकारणीप्रमाणे पूर्ण खर्च दिला जाईल. या खर्चाची रक्कम वर्षभरात एकदाच दिली जाणार आहे.

3. अभ्यासक्रमासाठीची पुस्तके, शैक्षणिक साहित्य, इतर शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रुपये प्रत्येक वर्षी दिले जातील.

4. अभ्यासक्रमाच्या खर्चासाठी 2022-23 या वर्षाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व वसतीगृह भाडे, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय खर्चाबाबत संबंधित विद्यापीठाकडून, संस्थेकडून (Education Scholarship) माहिती मागवून आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती व उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन संबंधित महाविद्यालय, संस्थेस रक्कम अदा केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?

GK Updates (20)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (GK Updates) यांच्याविषयी काही प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत.

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४

२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ……. हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन

५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ (GK Updates)

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट

९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४० (GK Updates)

१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा

१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३

२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ (GK Updates)

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई (GK Updates)

३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी (GK Updates) महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव (GK Updates)

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी (GK Updates) महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com