BMC Recruitment 2023 : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेत लिपिकांच्या 1100 जागांसाठी लवकरच होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या महिन्यात जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका व्यवस्थापनाने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या भरती (BMC Recruitment 2023) प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात या भरती प्रक्रियेसाठी केंद्र उपलब्ध करून देता येईल का? याबाबतची चाचपणी सध्या महानगरपालिका स्तरावर सुरू आहे.

कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी (BMC Recruitment 2023) त्रयस्थ संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेसोबत महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे. IBPS आणि TCS या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत सुमारे 40 टक्के पदे रिक्त आहेत. यासाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com