Home Blog Page 360

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये नवीन भरती सुरू!! पदवीधारकांना मिळणार मोठी संधी

BOB Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रमुख – एचआर अॅनालिटिक्स, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा

भरले जाणारे पद –

  1. प्रमुख – एचआर अॅनालिटिक्स
  2. वरिष्ठ व्यवस्थापक

पद संख्या – 2 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – (BOB Recruitment 2023)

  1. प्रमुख (एचआर अॅनालिटिक्स) – 29 ते 45 वर्षे
  2. वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर अॅनालिटिक्स) – 27 ते 40 वर्षे

अर्ज फी –

सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600/-
SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

प्रमुख – (एचआर अॅनालिटिक्स) –

1. Graduation in any discipline from AICTE/UGC/Govt approved University and Advanced Degree (master’s or above) in a quantitative subject such as Engineering, Mathematics, Operations Research, Statistics, Data Mining, Econometrics. (BOB Recruitment 2023)
2. Minimum 7 years experience in Analytics, out of which 3 years in HR Analytics in large organizations preferably in the BFSI sector.

वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर अॅनालिटिक्स) –

1. Graduation in any discipline from AICTE/UGC/Govt approved University and Advanced Degree (master’s or above) in a quantitative subject such as Engineering, Mathematics, Operations Research, Statistics, Data Mining, Econometrics.
2. Minimum 5 years experience in Analytics, out of which 2 years in HR
Analytics in large organizations preferably in BFSI sector.

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm ला भेट द्यायची आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा. (BOB Recruitment 2023)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया – मुलाखत

  1. निवड लहान सूची आणि त्यानंतरच्या वैयक्तिक मुलाखतीच्या फेरीवर आणि/किंवा इतर कोणत्याही निवड पद्धतीवर आधारित असेल.
  2. बँकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि मुलाखतीसाठी एकूण योग्यतेच्या आधारावर निवडले जाईल.
  3. मुलाखत/निवड प्रक्रियेतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. (BOB Recruitment 2023)
  4. उमेदवाराने निवडीच्या सर्व प्रक्रियांमध्ये पात्रता प्राप्त केली पाहिजे, म्हणजे PI आणि/किंवा इतर निवड पद्धती (जसे असेल तसे) आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी योग्यतेमध्ये पुरेसे उच्च असावे.
  5. जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट ऑफ गुण (कट ऑफ पॉइंटवर सामान्य चिन्ह) मिळवले तर अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 10वी पास उमेदवारांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; पहा कुठे मिळेल नोकरी?

Government Jobs (16)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी शोधणाऱ्या 10 वी पास तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्रायव्हर पदाच्या 276 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.

संस्था – हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन

भरले जाणारे पद – ड्रायव्हर

पद संख्या – 276 पदे

मिळणारे वेतन – 15,360/- दरमहा

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2023

(अनुसूचित क्षेत्रांसाठी 14 मार्च 2023 पर्यंत त्यांचे अर्ज पाठवू शकतात.)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

  1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराकडे HTV साठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि किमान अनुभव असावा.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट hrtchp.com वर जा.
  2. यानंतर ताज्या बातम्यांच्या विभागात जा.
  3. येथे तुम्हाला ‘HRTC मध्ये कंत्राटी आधारावर चालकांची भरती’ साठी लिंक मिळेल, या लिंकवर क्लिक करा.
  4. आता तुमच्या समोर एक PDF फाईल उघडेल. (Government Jobs)
  5. ही PDF डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

वय मर्यादा –

1 जानेवारी 2023 रोजी

किमान 18 वर्षे

कमाल 45 वर्षे (Government Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – hrtchp.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2023 : Indian Oil मध्ये जॉबसाठी बंपर ओपनिंग!! जाणून घ्या पात्रता

IOCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदाच्या एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2023 पासून सुरु होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

भरली जाणारी पदे –

  1. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – 484 पदे
  2. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक – 29 पदे
  3. कनिष्ठ साहित्य सहाय्यक – 04 पदे
  4. कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – 01 पद

पद संख्या – 518 पदे

अर्ज फी – रु. 150/-

वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 मार्च 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IOCL Recruitment 2023)

1. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक –

3 years Diploma in relevant field from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions.

2. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक –

B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry & Mathematics with minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions. (IOCL Recruitment 2023)

3. कनिष्ठ साहित्य सहाय्यक –

3 years Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. from
recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PwBD candidates against reserved/identified for PwBD positions

4. कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक –

4 years B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing & Midwifery or Gynaecology & Obstetrics from a recognized Institute/University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions. (IOCL Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

  1. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- दरमहा
  2. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक Rs. 25,000 – 1,05,000/- दरमहा
  3. कनिष्ठ साहित्य सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- दरमहा
  4. कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक Rs. 25,000 – 1,05,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. (IOCL Recruitment 2023)
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  6. अर्ज  प्रक्रिया 01 मार्च 2023 पासून सुरु होतील.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2023 : पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

Police Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांसाठी भरती होत आहे. या प्रक्रियेतील उमेदवरांची मैदानी चचणी पूर्ण झाली आहे. मात्र तृतीपंथी उमेदवारांच्या मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता

मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथीयांची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या (Police Bharti 2023) उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. याबाबत निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते; अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

असं असेल परीक्षेचे स्वरूप (Police Bharti 2023)

  1. लेखी परिक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील जे 90 मिनिटांत सोडवावे लागतील.
  2. PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  3. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.
  4. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.
  5. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.
  6. परीक्षा मराठीतूनच होणार आहे.
  7. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

गुण विभागणी –

1. गणित – 25 प्रश्न, 25 गुण (Police Bharti 2023)

2. बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न,  25 गुण

3. मराठी व्याकरण – 25 प्रश्न,  25 गुण

4. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 25 प्रश्न,  25 गुण

  • एकूण 100 प्रश्नासाठी 100 गुण
  • एकूण वेळ – 90 मिनिटे

गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांसाठी महत्वाचे –

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच (Police Bharti 2023) गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी भारती विद्यापीठात ‘या’ पदावर नोकरीची संधी; असा करा अर्ज

Job Notification (28)

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे येथे रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे

भरली जाणारी पदे – (Job Notification)

  1. वित्त अधिकारी
  2. परीक्षा नियंत्रक
  3. प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवाराकडे  किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bvuniversity.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ‘या’ पदावर नोकरीची संधी!! थेट मुलाखतीने होणार निवड

Job Notification (27)

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी – गट अ पदाच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी  इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत 22 फेब्रुवारी 2023 या दिवशी होणार आहे.

संस्था – सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग

पद संख्या – 56 पदे

भरले जाणारे पद –

वैद्यकीय अधिकारी – गट-अ (Medical Officer – Grade-A)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /किंवा ऑलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका परीक्षा उत्तीर्ण.
  2. पदवी / पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे.
  3. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैद्य कालावधी असलेले आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 75,000/- ते 85,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Notification)

मुलाखतीची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता. कुडाळ जि. सिधुदुर्ग पिन कोड- 416812.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : ‘या’ कंपनीत शिफ्टची वेळ संपली की कंप्युटर होतो आपोआप बंद; कर्मचारी आहेत बेहद खुश!!

Career News (9)

करिअरनामा ऑनलाईन । काही कंपन्यांमध्ये नियम इतके कडक असतात (Career News) की प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काम करत असताना शिफ्ट संपेपर्यंत जागेवरून उठता सुद्धा येत नाही. ऑफिसमध्ये बॉसचे दडपण इतके असते की एखादा महत्वाचा फोन आल्यास त्या कर्मचाऱ्याला फोन घेताना दडपण येते. पण काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मध्य प्रदेशातील एका IT कंपनीने असाच प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिथले कर्मचारी अत्यंत सुखी आहेत.

या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने स्क्रीनशॉट शेअर केला. त्यावर लिहिले आहे, “तुमची शिफ्ट टाइम संपली आहे. 10 मिनिटांत कार्यालयीन (Career News) यंत्रणा बंद होईल. प्लीज घरी जा.”

याशिवाय या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास संपल्यानंतर त्यांना कोणतेही फोन कॉल किंवा ईमेल येणार नाहीत; याची काळजी कंपनीकडून घेतली जाते. आपल्या कर्मचाऱ्यांना (Career News) आनंदी वाटावे आणि त्यांच्याकडे उत्तम कार्यक्षमता असावी; अशी कंपनीची इच्छा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Weired Jobs : दम मारो दम!! गांजा ओढणाऱ्यांना वर्षाकाठी मिळणार 88 लाखाचं पॅकेज

Weired Jobs

करिअरनामा ऑनलाईन। ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका (Weired Jobs) कंपनीला ‘प्रोफेशनल स्मोकर्स’ची गरज आहे. या आगळ्या वेगळ्या नोकरीसाठी चांगला पगारही दिला जात आहे. नोकरीच्या जाहिरातीनुसार, प्रोफेशनल स्मोकर्सला गांजा फुकायचा आहे आणि गांज्याची गुणवत्ता तपासायची आहे. या बदल्यात त्या व्यक्तीला 88 लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे.

‘द सन’ माध्यम समूहाने याबाबत वृत्त दिले आहे. गांजा मारणे हा भारतात अपराध आहे. हा अपराध रोखण्यासाठी भारतात मोहिमा राबविल्या जातात. यात पकडलं तर शिक्षा होते आणि गुन्हेगाराला तुरुंगात जावे लागते. परंतु इतर देशांमध्ये गांजा मारणे हा गुन्हा नसून ते (Weired Jobs) कायदेशीररित्या वैध मानले जाते.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एक कंपनी गांजा मारण्याची नोकरी देणार आहे. यात गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी वार्षिक 88 लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. जर्मनीच्या कॅनामेडिकल कंपनीने ‘Cannabis Sommelier’ म्हणजेच गांजा तपासण्याची भरती सुरु केली आहे.

नोकरीसाठी अट – (Weired Jobs)

गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी कंपनी गांजा (Weired Jobs) मारण्यात माहिर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. ही कंपनी औषधासाठी गांजा विकते. यामुळेच कंपनी गांजाची विक्री करणारा, त्याची गुणवत्ता तपासणारा आणि धूम्रपान करणारा आणि त्याची गुणवत्ता तपासणारा कर्मचारी शोधत आहे.

अर्जदार हा ‘कैनबिस पेशंट’ म्हणेजच ‘गांजाचा पेशंट असावा, अशी अटही (Weired Jobs) या नोकरीत आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे जर्मनीत कायदेशीररित्या गांजा मारण्याचा परवानाही असावा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Megabharati : राज्याच्या विविध महापालिकांमधील रखडलेली भरती लवकरच मार्गी लागणार; 22,381 जणांना मिळणार नोकरीची संधी

Megabharati (1)

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच (Megabharati) बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते.

त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारीला नवा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार सन 2023 मध्ये करायच्या भरतीसाठी 35 टक्क्यांची ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तरीही महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून हा खर्च 35 टक्क्यांपर्यंत (Megabharati) मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे तरूणांचा फायदा होईल. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

28 महानगर पालिकेत 22381 पदे या शासन निर्णयानुसार राज्यातील 28 महानगरपालिकांत एकूण 22381 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 8490 पदे बृहन्मुंबई महापालिकेत (Megabharati) असून त्याखालोखाल 1578 रिक्त पदे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. सर्वात कमी 81 रिक्त पदे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे या वर्षात भरण्यात येतील.

महानगरपालिकेतील रिक्त पदे पुढील प्रमाणे – (Megabharati)

औरंगाबाद – १२३ पदे

सोलापूर – ३४० पदे

परभणी – ५८ पदे

मालेगाव – ६१४ पदे

अहमदनगर – १८४ पदे

अकोला – २४९ पदे

अमरावती – ४८५ पदे (Megabharati)

नांदेड वाघाळा – २०० पदे

जळगाव – ४५० पदे

धुळे – १२६ पदे

नाशिक – ६७१ पदे

पनवेल – ४१२ पदे

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nari Shakti : ज्युटपासून पिशव्या बनवून झाली मालामाल; करते लाखोंमध्ये कमाई

Nari Shakti

करिअरनामा ऑनलाईन । झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी असलेल्या (Nari Shakti) आशा सिन्हा एकेकाळी महिन्याला पाच हजार रुपये पगाराची नोकरी करायच्या. या तुटपुंज्या पगारात गरजा भागत नव्हत्या. कमाईचं दुसरं साधन शोधणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी आपल्याला वेगळं काही करता येऊ शकतं का यासाठी शोध मोहीम सुरु केली. सरतेशेवटी त्यांनी ज्यूट (ताग) व्यवसायामध्ये प्रवेश केला. या व्यवसायाच्या माध्यमातून सध्या त्या लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.

‘संकटांचा धिराने सामना केला’ (Nari Shakti)

आशा सिन्हा सांगतात; की “एक काळ असा होता ज्यावेळी आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. नोकरीतून मिळणाऱ्या पगारात घर खर्च भागत नव्हता. वेगळं काहीतरी करण्याची गरज होती. यासाठी ज्यूट व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. आता 12 वर्षे झाली मी हा व्यवसाय करत आहे. यादरम्यान अनेक आव्हानं आली. पण, त्यांचा धीरानं सामना केला. त्याचाच परिणाम म्हणून आज मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे.”

मार्केटचा अभ्यास करून काम सुरु केलं

मार्केटमधील मागणीचा अभ्यास करून ज्यूटपासून अनेक प्रकारच्या पिशव्या बनवायला सुरुवात केल्याचं आशा सांगतात. “या व्यवसायातील मर्यादा आणि ताकद चांगल्या प्रकारे समजून घेतली. आमच्या लक्षात आलं की, रांचीमध्ये विकण्यासाठी ज्यूटच्या पिशव्या कोलकात्याहून घाऊक दरानं विकत घ्याव्या लागतात. लहान विक्रेत्यांसाठी कोलकात्याहून 20 ते 25 पिशव्या आणणं कठीण होतं. (Nari Shakti) त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ज्यूटच्या पिशव्या बनवायला सुरुवात केली. जे व्यापारी कोलकात्यातून ज्यूटच्या पिशव्या आणायचे ते व्यापारी आता आमच्याकडून त्याच दर्जाच्या पिशव्या खरेदी करत आहेत”; असं आशा सांगतात.

300 महिला करतात काम

आशा म्हणाल्या, हे काम मी एकटीनं सुरू केलं होतं. हळूहळू कामाचा व्याप वाढू लागला तसं यामध्ये आणखी महिला सहभागी झाल्या. सध्या एकूण 300 महिला एकत्र काम करत आहेत. आम्ही एक हजारपेक्षा जास्त प्रकारची ज्यूट उत्पादनं तयार करतो. आमच्याकडे (Nari Shakti) कॉन्फरन्स बॅग, पहाडिया बॅग, सेमिनार बॅग, स्कूल बॅग, वुमन पर्स, वुमन साईड बॅग, छोटी पर्स, भाजी बॅग अशा विविध प्रकारच्या बॅग तयार होतात.

या शहरांमध्ये जातो माल

आशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तयार केलेली उत्पादनं झारखंड व्यतिरिक्त दिल्ली, बेंगळुरू, सुरत, बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कुरिअरद्वारे पाठवली जातात. दर महिन्याला सुमारे दोन हजार ज्यूट उत्पादनं इतर शहरांमध्ये कुरिअरद्वारे वितरित केली जातात. या (Nari Shakti) व्यतिरिक्त ही उत्पादने झारक्राफ्ट आणि कुसुम, पलाश लोकल मार्केट, रांचीतील घाऊक मार्केट आणि जत्रेतही विकली जातात.

तुम्हालाही आशा सिन्हा यांच्याकडील सुंदर ज्यूटच्या पिशव्या घ्यायच्या असतील तर 8340117920 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com