Police Bharti 2023 : पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांसाठी भरती होत आहे. या प्रक्रियेतील उमेदवरांची मैदानी चचणी पूर्ण झाली आहे. मात्र तृतीपंथी उमेदवारांच्या मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता

मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथीयांची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या (Police Bharti 2023) उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. याबाबत निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते; अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

असं असेल परीक्षेचे स्वरूप (Police Bharti 2023)

  1. लेखी परिक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील जे 90 मिनिटांत सोडवावे लागतील.
  2. PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  3. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.
  4. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.
  5. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.
  6. परीक्षा मराठीतूनच होणार आहे.
  7. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

गुण विभागणी –

1. गणित – 25 प्रश्न, 25 गुण (Police Bharti 2023)

2. बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न,  25 गुण

3. मराठी व्याकरण – 25 प्रश्न,  25 गुण

4. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 25 प्रश्न,  25 गुण

  • एकूण 100 प्रश्नासाठी 100 गुण
  • एकूण वेळ – 90 मिनिटे

गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांसाठी महत्वाचे –

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच (Police Bharti 2023) गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com