MPSC News Update : MPSC मुलाखतीच्या तारखा बदलल्या; कधी आणि कुठे होणार मुलाखत; इथे मिळेल संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन। MPSC च्या मुलाखतींसाठी पात्र ठरलेल्या (MPSC News Update) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2021 सध्या पुण्यात सुरु आहेत. यापैकी दोन तारखांच्या मुलाखती या पुढे ढकलण्यात आल्या आहेत तसंच या मुलाखतीचं स्थळही बदलण्यात आलं आहे. MPSC नं ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.

बदललेली तारीख आणि ठिकाण – (MPSC News Update)

1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2021 च्या मुलाखतीचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे इथे सुरु आहे. मात्र या मुलाखतींच्या 23 व 24 फेब्रुवारी, 2023 च्या शेड्युलमधेबद्दल करण्यात आले आहेत. या दोन दिवसांच्या मुलाखतीच्या तारखा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या तारखांच्या मुलाखती या आता दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत. तसंच या मुलाखतीचं स्थळही बदलण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

2. MPSC नं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुलाखती क्रमांक 1193 त 1212 (1209 वगळून) या मुलाखती 23 फेब्रुवारीला होणार होत्या त्या आता 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत तसंच (MPSC News Update) या मुलाखती महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

3. तसंच मुलाखती क्रमांक 1269 ते 1280 या मुलाखतींची तारीख 24 फेब्रुवारी, 2023 होती. या मुलाखती आता दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ला होणार आहेत तसंच या मुलाखती (MPSC News Update) महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई इथे होणार आहेत.

संबंधित मुलाखत क्रमांक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी या सुधारित तारखांची नोंद घ्यावी असं आवाहन MPSC तर्फे करण्यात आलं आहे. तसंच सुधारित पत्त्यावर वेळेत उपस्थित (MPSC News Update) राहण्याचं आवाहन आयोगानं केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com