UPSC Success Story : आधी कोचिंग घेतलं, फेल झाली, सेल्फ स्टडीवर भर दिला अन् बनली IAS

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे केंद्रीय (UPSC Success Story) लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा. दरवर्षी लाखो उमेदवारांमधून ठरावीक उमेदवार या परिक्षेत पास होतात. यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. आज आपण अशाच एका आदर्श अधिकारी दीक्षा जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने निराश न होता अभ्यासावरील लक्ष हटू दिले नाही आणि यूपीएससी देणाऱ्या तरुणांसाठी आदर्श ठरली.

दीक्षाने AIR 19 पटकावली

दीक्षा ही मूळची पिथौरागढ, उत्तराखंडची आहे. दिक्षा जोशी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळाला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण योग्य रणनीती आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

पहिल्या दोन प्रयत्नात आलं अपयश (UPSC Success Story)

दीक्षाने मल्लिकार्जुन कॉलेजमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने जॉलीग्रांट येथील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून MBBS पूर्ण केले. मात्र, लहानपणापासून नागरी सेवांमध्ये नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते. यामुळेच इंटर्नशिपनंतर तिने UPSC ची नागरी सेवा परीक्षा दिली. जिद्दीने प्रयत्न करूनही पहिल्या दोन प्रयत्नात तिची निवड झाली नाही. मात्र तिसर्‍या प्रयत्नात तिला यश आले आणि तिने यावेळी संपूर्ण भारतातून 19 वा क्रमांक मिळवला.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

सेल्फ स्टडीवर दिला भर

दीक्षाला पहिल्या 2 प्रयत्नात यश मिळाले नाही तेव्हा तिने कोचिंग क्लास सोडण्याचा निर्णय घेतला. कारण कोचिंग क्लासमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे तिला अभ्यास करता (UPSC Success Story) आला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहिला. यामुळेच तिनी सेल्फ स्टडीवर भर दिला. दीक्षा दररोज 7 ते 8 तास अभ्यास करायची. यावेळी तीने अभ्यासक्रमाची विभागणी केली आणि त्यानुसार परीक्षेची तयारी केली.

‘स्वत:वर विश्वास ठेवा’

दीक्षाच्या मते, जर उमेदवारांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची असेल, तर सर्वप्रथम त्यांना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण अनेक वेळा आत्मविश्वास ढासळल्याने (UPSC Success Story) परीक्षा देताना गडबड होते. दीक्षाच्या मते, उमेदवारांनी स्वत:ची ताकद आणि कमकुवतपणा देखील ओळखला पाहिजे. जेणेकरून आपल्याला कोणत्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, हे कळू शकेल. तसेच उमेदवारांनी स्वतःची इतरांशी तुलना करू नये. कारण यामुळे गोंधळ होवून परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

UPSC Success Story Diksha Joshi IAS

आठवड्याला उजळणी करणं आवश्यक (UPSC Success Story)

दिक्षाच्या मते, उमेदवारांनी तयारीदरम्यान उजळणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण तुम्ही भूतकाळात अभ्यासलेल्या गोष्टी विसरत नाहीत. यासोबतच प्रत्येक विषयही स्पष्ट होतो. असे केल्यास उमेदवारांसाठी परीक्षा सोपी होऊन जाते. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार दर आठवड्याला सुधारणा करणे आवश्यक आहे. 2021 च्या परीक्षेत दीक्षाला तिसऱ्या प्रयत्नात 1020 गुण मिळाले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com