Interview Questions : HR तुम्हाला ‘हे’ प्रश्न विचारतीलच; मुलाखतीला जाताना या प्रश्नांची आधीच करा तयारी

करिअरनामा ऑनलाईन। नोकरी मिळवताना तुम्हाला अनेक आव्हाने आणि (Interview Questions) संघर्षांना सामोरे जावे लागते. मग ते मुलाखतीशी किंवा कामाशी संबंधित आव्हान असू शकते. मुलाखतीदरम्यान कोणते प्रश्न विचारले जातील? आणि त्याची तयारी कशी करावी? इत्यादींचा आपण अनेकदा विचार करत असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या या लेखाद्वारे देत आहोत. हे प्रश्न HR (Human Resource) कडून फ्रेशर्सना  विचारले जातात. या प्रश्नांच्या मदतीने, फ्रेशर्स मुलाखतीदरम्यान सहज आपले पहिले इंम्प्रेशन उत्तमप्रकारे पाडू शकतो.

1. स्वतःबद्दल सांगा

‘स्वतःबद्दल सांगा’ हा एक असा प्रश्न आहे जो नेहमी विचारला जातो. समोरची व्यक्ती नवीन आहे की अनुभवी आहे, हे या प्रश्नाचे उत्तर देण्यावरुन कळते. हा प्रश्न उमेदवार आणि मुलाखतकार यांच्यातील संभाषणाला सुरुवात करून देतो. जेव्हा एचआर तुम्हाला असे प्रश्न विचारतो याचा अर्थ असा (Interview Questions) होतो की, त्याला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तसेच ज्या गोष्टींचा CV मध्ये उल्लेख नसेल अशा गोष्टी HR ला जाणून घेण्यात उत्सुकता असते.

2. हे करिअर निवडण्याचे कारण काय?

‘तुम्ही हे करिअर का निवडले?’ हा प्रश्न सर्वात महत्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. उमेदवाराला या क्षेत्रात खरोखर रस आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो.

3. तुमचा ड्रीम जॉब कोणता? (Interview Questions)

तुमचा ड्रीम जॉब कोणता आहे? हा HR ने विचारलेल्या सर्वात लोकप्रिय मुलाखतीच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी या प्रश्नाची तयारी करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रश्नातूनच उपप्रश्न तयार होणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर द्यावे लागेल.

4. तणाव आणि दबाव कसे हाताळता?

ताणतणाव आणि दडपण हा आयुष्यातील एक भाग आहे. इथले स्ट्रेस आणि प्रेशर हे महाविद्यालयीन जिवनातील तणावापेक्षा खूप वेगळे आहेत. फ्रेशर्ससाठी HR मुलाखतीत विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तणाव आणि दडपणाखाली कसे काम करता, हे या प्रश्नाच्या (Interview Questions) माध्यमातून तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

5. तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?

हा सर्वात लोकप्रिय प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. जो तुम्हाला प्रत्येक नोकरीच्या मुलाखतीत विचारला जाईल. पण या प्रश्नाचे उत्तर अतिशय काळजीपूर्वकआणि विचारपूर्वक (Interview Questions) दिले पाहिजे. आपला आधीचा पगार, आधीच्या नोकरीत मिळणारी संभाव्य पगारवाढ, मेडिक्लेम, पीएफ असे मिळणारे भत्ते, या सर्वांचा विचार करुन ठेवा. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे पडेल.

6. तुम्हाला आणखी काही प्रश्न आहेत का?

या प्रश्नांची तयारी फ्रेशर्सनी आधीच केली पाहिजे. HR नेहमी हा (Interview Questions) प्रश्न विचारतात. या प्रश्नामुळे फ्रेशर्सच्या मनातील सर्व शंका दूर होऊ शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com