Medical Education : डॉक्टर होणाऱ्यांनो….सर्वात स्वस्त मेडिकल एज्यूकेशन कुठे मिळेल? इथे घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं हे प्रत्येक (Medical Education) पालकांचं स्वप्न असतं. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, यासाठी पालक मुलांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करत असतात. पण मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेट किती आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. मेडिकल एज्यूकेशनसाठी खूप जास्त फी भरावी लागते. हे शिक्षण खूप महागडं असल्याने सामान्य माणसांना फी भरताना आयुष्याची जमा पुंजी ओतावी लागते. अनेकवेळा असं पहायला मिळालं आहे, की मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चामुळं काही कुटुंबावर आर्थिक संकटही ओढावलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमी तुम्हाला मेडिकल एज्यूकेशन स्वस्तात कसं घेता येईल याविषयी सांगणार आहोत.

परवडणारी फी (Medical Education)

स्वस्तात मेडिकल एज्यूकेशन घेऊन डॉक्टर व्हायचं, याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला खोटी डिग्री मिळेल. तसंच तुम्हाला एखाद्या छोट्या संस्थेमधून शिक्षण घ्यावं लागेल, असंही नाही. भारतात मेडिकल एज्यूकेशन खूप महाग आहे. पण आम्ही तुम्हाला कमी फी असणाऱ्या मेडिकल एज्यूकेशनबाबत माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जिथे तुमच्या शिक्षणाचा तसेच खाण्या पिण्याचा खर्चही कमी होईल. मेडिकल एज्यूकेशन घेवू इच्छिणारे विद्यार्थी किर्गिस्तान, कजाकिस्तान किंवा (Medical Education) रशियात अॅडमिशन घेऊ शकतात. रशियाच्या सरकारी विद्यापीठात विद्यार्थ्यांना NRI कोट्यातूनही अॅडमिशन दिलं जातं. याची फी सुध्दा खूप कमी आहे. याशिवाय कजाकिस्तान मध्ये विद्यार्थी 25 लाखांच्या खर्चात शिक्षण आणि हॉस्टेलची फी भरु शकतात.

विदेशातील विद्यापीठात अॅडमिशन घेण्यासाठी उमेदवारांना योग्य विद्यापीठातून एखाद्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. काही विद्यापीठांच्या वेबसाईट्सवर त्यांच्या (Medical Education) अर्जाची लिंक उपलब्ध असते. तर अनेक विद्यापीठात E-Mail च्या माध्यमातूनही अर्ज स्विकारले जातात. कोणत्याही विदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज करण्याआधी तेथील खर्च, विद्यापीठाची मान्यता, इ. तपासून पाहा. कारण एखाद्या ठिकाणी विद्यापीठाच्या फी पेक्षा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च जास्त असता कामा नये.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com