Home Blog Page 352

Job Notification : राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.

संस्था – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

भरली जाणारी पदे –

  1. प्राचार्य – 01 पद
  2. सहायक प्राध्यापक – 11 पदे
  3. ग्रंथपाल – 01 पद (Job Notification)
  4. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक – 01 पद

पद संख्या – 14 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, हिवरखेड, जि. अकोला

असा करा अर्ज – (Job Notification)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2023 आहे.
  3. तसेच अर्जाचा नमुना www.sgbau.ac.in या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (Job Notification)
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Job Notification

अधिकृत वेबसाईट – www.sgbau.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2023 : बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडूनच झाल्या चुका, विद्यार्थ्यांना वाढवून मिळणार ‘इतके’ गुण

HSC Exam 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (HSC Exam 2023) महत्वाची बातमी आहे. बारावी परिक्षेत इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या ही बाब बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे.

बोर्डाकडून चुका मान्य

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी 6 गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.

तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

बोर्डाकडून निर्णय देदेताना असं सांगण्यात आलं आहे; की बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी (HSC Exam 2023) पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डाने मान्य केलं आहे.

चुकीच्या प्रश्नासाठी 6 गुण मिळणार (HSC Exam 2023)

बोर्डाने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपरमधील चुकीचे तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत.

‘या’ परिस्थितीमध्येच विद्यार्थ्यांना गुण मिळणार

1. उत्तरपत्रिकेमध्ये Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास

2. विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर

3. त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास

वरील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे विद्यार्थ्यांनी (HSC Exam 2023) उत्तरपत्रिकेत लिहिले असल्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे विद्यार्थ्याला एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agnipath Yojana :अग्निवीर भरतीत ‘हे’ मोठे बदल; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Agnipath Yojana (7)

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर सैन्यदल भरतीच्या नियमांमध्ये काही (Agnipath Yojana) बदल करण्यात आले आहेत. पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले.

अग्निवीर भरतीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर. जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होते.

अग्निवीर भरती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नाव नोंदणीसाठी 15 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर परीक्षा 17 एप्रिल ते 4 मे आणि निकाल 20 मे 2023 रोजी घोषित होणार (Agnipath Yojana) आहेत. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

या पदभरतीच्या माध्यमातून अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (क्लर्क / स्टोअर किपर टेक्निकल), अग्निवीर ट्रेडसमन दहावी उत्तीर्ण, अग्निवीर ट्रेडसमन आठवी उत्तीर्ण ही पदे भरली जाणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांना औरंगाबाद येथील भरतीमध्ये सहभागी होणार आहे. 5 ते 1 जुलै दरम्यान रॅलीचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. सैन्यदलाच्या माध्यमातून देशातील (Agnipath Yojana) तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अधिकाधिक तरुणांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : नोकरी शोधणाऱ्यांसाठी अच्छे दिन!! कंपन्या करणार मोठी नोकर भरती; ‘या’ 5 कंपन्या कोणत्या?

Career News (10)

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदिचे संकट दिवसेंदिवस (Career News) गडद होत आहे. सध्या जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे आता शिकलेल्या तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण सध्या या तरुणांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऐन नोकरकपातीच्या काळात काही कंपन्यांकडून नोकर भरती केली जात आहे. यामध्ये IT कंपन्या आघाडीवर आहेत. कोणत्या आहेत या कंपन्या आणि किती जागांवर भरती होणार याबद्दल आपण संविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Naukri.com च्या अहवालानुसार, भारतातील नोकरीच्या परिस्थितीत जानेवारी 2023 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे मागील (Career News) काही महिन्यांत रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये घसरण झाल्यानंतर आयटी क्षेत्राने सकारात्मक पुनरागमनाचे संकेत दिले असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

या कंपन्यांमध्ये मिळेल नोकरीची संधी –

1. प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (Price Water House Coopers) –

आपल्या कामकाजाचा विस्तार भारतात वाढवण्यासाठी अकाऊंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म प्राइस वॉटर हाऊस कूपर्स इंडियाने पुढील 5 वर्षांमध्ये 30 हजार लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील कामगारांची संख्या 80 हजारांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

2. एअर इंडिया (Air India) – (Career News)

एअर इंडिया यावर्षी 900 हून अधिक नवीन पायलट आणि 4 हजारांहून अधिक केबिन क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. कंपनी आणखी जागांवर देखभाल अभियंते आणि पायलट नियुक्त करण्याची शक्यता आहे.

3. इन्फोसिस (Infosys) –

इन्फोसिसमध्ये 4,263 जागांवर भरती केली जाणार असल्याची माहिती लिंक्डइनने दिली आहे. त्यानुसार या कंपनीत इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.

4. विप्रो (Wipro) –

विप्रोकडे भारतात 3,292 कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहीती LinkedIn ने दिली आहे. त्यानुसार, कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या विवध पदांवर (Career News) भरती करण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, IT आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येणार आहे.

5. TCS – (Career News)

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनी काही हजार लोकांना नोकरी देणार असल्याची माहिती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; इथे करा अर्ज

AIC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC Recruitment 2023) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

संस्था – अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया

भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 40 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान पदवी आणि GATE पात्र उमेदवार.

मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा

वय मर्यादा – (AIC Recruitment 2023)

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – Rs. 500/-

SC/ST – Rs. 100/-

PWD/ Female – Rs. 100/-

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (AIC Recruitment 2023)
  3. किंवा अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट www.aicofindia.com ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ मार्च २०२३ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPR Bharti 2023 : डिप्लोमा/ इंजिनियर्ससाठी प्लाझ्मा संशोधन संस्थेत ‘ही’ पदे रिक्त; लगेच करा Apply

IPR Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्लाझ्मा संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या (IPR Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – प्लाझ्मा संशोधन संस्था

भरले जाणारे पद – वैज्ञानिक सहाय्यक

पद संख्या – 51 पदे

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – Rs. 200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IPR Bharti 2023)

वैज्ञानिक सहाय्यक Diploma in Engineering in relevant field (3 years after SSC) with minimum 60% marks.

मिळणारे वेतन –

वैज्ञानिक सहाय्यक – Rs. 35,400/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. उमेदवारांनी अर्ज खालील लिंक वरून सादर करावे. (IPR Bharti 2023)
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  2. वयाचा पुरावा (IPR Bharti 2023)
  3. पेमेंट पावतीची प्रत
  4. शैक्षणिक गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/पदवी
  5. अनुभव प्रमाणपत्र
  6. इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 

अधिकृत वेबसाईट – www.ipr.res.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2023 : शिक्षकांचा मोठा निर्णय!! 12 वी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे; विद्यार्थ्यांची काळजी मिटली

HSC Exam 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला (HSC Exam 2023) बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागे घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे विविध विभागातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होते. यावेळी झालेल्या बैठकीत 13 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. पहिल्या (HSC Exam 2023) दिवसापासून नियामकांच्या बैठकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नपत्रिका, नमूना उत्तरपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे ढिग शिक्षण मंडळ, परिरक्षक केंद्रात लागले आहेत.

उत्तरपत्रिका तपासणी रखडल्यामुळे विधीमंडळात हा प्रश्न चर्चेला गेला. त्यानंतर गुरुवारी शिक्षणमंत्री यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सरकारने प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी दोन वेळा प्राथमिक स्तरावर बैठकी झाल्या होत्या. परंतु हा प्रश्न निकाली निघाला नव्हता.

गुरुवारी (आज) शिक्षणमंत्री यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा (HSC Exam 2023) झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारपासून नियामकांच्या बैठका व शुक्रवारपासून उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारने ‘हे’ दिले आश्वासन (HSC Exam 2023)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत. यामध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत शासनाने ठरविलेल्या धोरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल, आश्वासित योजनेबाबत सुधारित प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.वाढीव पदांना रुजू दिनांकापासून (HSC Exam 2023) मंजुरी, आयटी विषय अनुदानित करणे याबाबत बैठक आयोजित करणे, अनुदानाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.

शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा झाली. महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी (HSC Exam 2023) महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघाने बहिष्कार आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : वन विभागाने ‘या’ पदावर जाहीर केली सरळसेवा भरती; इथे आहे अर्जाची लिंक

Government Jobs (19)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागाने रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखापाल (गट क) पदांच्या एकूण 127 जागा भरल्या जाणार आहेत. सरळ सेवा भरती प्रक्रियेतून ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

संस्था – वन विभाग

भरले जाणारे पद – लेखापाल (गट क)

पद संख्या – 127 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज फी – (Government Jobs)

अमागास प्रवर्ग – रु. 1000/-

मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

2. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. (Government Jobs)

मिळणारे वेतन –

लेखापाल रु. 29,000 – 92,300/- दरमहा

वय मर्यादा –

Lekhapal Bharti 2023

असा करा अर्ज –

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतील.
  3. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Government Jobs)
  5. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

निवड प्रक्रिया –

  1. ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
  3. लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील. (Government Jobs)
  4. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  5. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल.
  6. उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agnipath Yojana : महिलांनी ‘ही’ कसोटी पार केली की तुम्ही अग्निवीर भरती झालाच म्हणून समजा; असे आहेत पात्रतेचे निकष

Agnipath Yojana (6)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) मुलांबरोबर मुलीही भरती होवू शकतात.  भारतीय सैन्याने महिला अग्निवीर भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. महिला अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया देखील 1 मार्चपासून सुरु झाली आहे. लष्करात अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे. पण भरती होण्यापूर्वी लष्कराने कोणते निकष लागू केले आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत पात्रतेचे निकष –

1. वय मर्यादा – (Agnipath Yojana)

  1. महिला अग्निवीर होण्यासाठी वय किमान 17.5 वर्षे आणि कमाल 21 वर्षे असावे.
  2. संरक्षण कर्मचार्‍यांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. किमान 45% गुणांसह महिला अग्निवीर जनरल ड्युटी (लष्करी पोलीस) साठी 10वी पास असणे आवश्यक आहे.
  2. यासोबतच, जर तुमच्याकडे हलक्या मोटार वाहनासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर तुम्हाला ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य मिळेल.

शारीरिक निकष –

  1. ऊंची – 162 से. मी. (भारतीय गोरखा उमेदवारांना 4 सें.मी.ची सूट मिळेल.)
  2. वजन – सैन्याच्या वैद्यकीय मानकांनुसार (Agnipath Yojana)
  3. छाती – छातीचा विस्तार किमान पाच सें.मी.

मैदानी चचणीचे निकष –

  1. धावणे – 7 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी धावावे लागेल.
  2. 10 फूट लांब उडी आणि 3 फूट उंच उडी मारावी लागेल.

पुरुषांप्रमाणेच महिला अग्निवीरांचीही चार वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), तांत्रिक (एव्हिएशन / अॅम्युनिशन एक्झामिनर), लिपिक/स्टोअर कीपर (Agnipath Yojana) टेक्निकल, ट्रेडसमन 10वी पास आणि 8वी पास या पदांसाठी महिलांची सैन्यात भरती केली जाऊ शकते. भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ravindra Dhangekar : भाजपचा बालेकिल्ला काबीज करणारे आमदार रवींद्र धंगेकर किती आणि कुठे शिकले? एकदा वाचाच

Ravindra Dhangekar

करिअरनामा ऑनलाईन । कसबा मतदारसंघातून कॉंग्रेसचे (Ravindra Dhangekar) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा निर्विवाद विजय झाला आहे. येथे 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लागल्याने  या निकालास जास्त महत्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मत मोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. आज आपण रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाविषयी माहिती करून घेणार आहोत…

Ravindra Dhangekar

पुण्यात घेतलं शिक्षण

रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दौंड तालुत्यातील नाथाची वाडी येथील मतोबा विद्यालयातून शिक्षण घेतले. रवींद्र धंगेकर हे आठवी (Ravindra Dhangekar) पास आहेत. 1985 दरम्यान त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. रवींद्र धंगेकर हे शेती आणि सोन्याचा व्यवसाय करतात.

Ravindra Dhangekar

अशी आहे राजकीय कारकीर्द (Ravindra Dhangekar)

शिवसेनेतून रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली होती. पण नंतर ते राज ठाकरे यांच्या मनसेत रुळले. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. इथूनच धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावत गेला. मात्र नंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदल करत काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. धंगेकर हे तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याकाळात आपण कसब्यामध्ये बरीच विकासकामं केल्याचा दावा ते करतात.

Ravindra Dhangekar

ज्येष्ठ नेते गिरीश बापटांचा प्रभाव

सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला ताकद देण्याची भाजप नेते खासदार गिरीश बापट यांची स्टाईल धंगेकर यांनी अंगिकारली आणि यामुळेच कसब्यात धंगेकरांची ‘आपला माणूस’ अशी ओळख झाली. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत (Ravindra Dhangekar) सगळंच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागलं. लोकांच्या या छोट्या-छोट्या गरजा ओळखून रवींद्र धंगेकर यांनी काम सुरू ठेवलं. कोणाला दवाखान्यात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण…रवींद्र धंगेकर यांचा फोन 24 तास चालू असायचा. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा ‘आपला माणूस’ म्हणून धंगेकर यांनी लोकांच्या मनाचा ताबा घेतला.

Ravindra Dhangekar

लोकप्रिय नेता

प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईनपासून पाण्याच्या समस्येवर रविंद्र धंगेकरांनी समाधानकारक काम केल्याचं येथील नागरिक सांगतात. याच विकासकामांच्या जोरावर ते प्रभागात (Ravindra Dhangekar) लोकप्रिय झाले. त्यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या 7 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com