Career News : नोकरी शोधणाऱ्यांसाठी अच्छे दिन!! कंपन्या करणार मोठी नोकर भरती; ‘या’ 5 कंपन्या कोणत्या?

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदिचे संकट दिवसेंदिवस (Career News) गडद होत आहे. सध्या जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे आता शिकलेल्या तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण सध्या या तरुणांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऐन नोकरकपातीच्या काळात काही कंपन्यांकडून नोकर भरती केली जात आहे. यामध्ये IT कंपन्या आघाडीवर आहेत. कोणत्या आहेत या कंपन्या आणि किती जागांवर भरती होणार याबद्दल आपण संविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Naukri.com च्या अहवालानुसार, भारतातील नोकरीच्या परिस्थितीत जानेवारी 2023 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे मागील (Career News) काही महिन्यांत रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये घसरण झाल्यानंतर आयटी क्षेत्राने सकारात्मक पुनरागमनाचे संकेत दिले असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

या कंपन्यांमध्ये मिळेल नोकरीची संधी –

1. प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (Price Water House Coopers) –

आपल्या कामकाजाचा विस्तार भारतात वाढवण्यासाठी अकाऊंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म प्राइस वॉटर हाऊस कूपर्स इंडियाने पुढील 5 वर्षांमध्ये 30 हजार लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील कामगारांची संख्या 80 हजारांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

2. एअर इंडिया (Air India) – (Career News)

एअर इंडिया यावर्षी 900 हून अधिक नवीन पायलट आणि 4 हजारांहून अधिक केबिन क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. कंपनी आणखी जागांवर देखभाल अभियंते आणि पायलट नियुक्त करण्याची शक्यता आहे.

3. इन्फोसिस (Infosys) –

इन्फोसिसमध्ये 4,263 जागांवर भरती केली जाणार असल्याची माहिती लिंक्डइनने दिली आहे. त्यानुसार या कंपनीत इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.

4. विप्रो (Wipro) –

विप्रोकडे भारतात 3,292 कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहीती LinkedIn ने दिली आहे. त्यानुसार, कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या विवध पदांवर (Career News) भरती करण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, IT आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येणार आहे.

5. TCS – (Career News)

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनी काही हजार लोकांना नोकरी देणार असल्याची माहिती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com