Home Blog Page 353

Banking Jobs : कोल्हापूरच्या ‘या’ बँकेत मिळेल नोकरी; ग्रॅज्युएट असाल तर आजच Apply करा

Banking Jobs (9)

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा नागरी (Banking Jobs) सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. (Banking Jobs)

भरले जाणारे पद – लिपिक/ Clerk

पद संख्या – 17 पदे (Banking Jobs)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)

  1. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
  2. MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) केल्यास प्राधान्य तसेच JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
  3. उमेदवाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – जास्तीत जास्त 35 वर्षे

परीक्षा फी – 590/- रुपये (Banking Jobs)

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.

काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2023 : दुष्काळात तेरावा महिना; बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकच नाहीत; निकाल लांबणार?

HSC Exam 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच (HSC Exam 2023) राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे बारावीच्या 50० लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास बारावीच्या निकालास उशीर होण्याची शक्यता आहे.

उत्तरपत्रिका स्वीकारण्यास शिक्षकांचा नकार (HSC Exam 2023)

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांच्या या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीचे इतिवृत्त न मिळाल्याने शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. सद्यस्थितीत बारावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांसह वाणिज्य संघटन आणि भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा पार पडली आहे. गेल्या सात दिवसांत या विषयांच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका महाविद्यालय आणि कस्टडी स्तरावर तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मात्र मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत उत्तरपत्रिका स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे.

‘शिक्षकांच्या बहिष्कारामुळे मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य (HSC Exam 2023) मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना दिले. तसेच अन्य विषयांच्या नियामकांनीही बहिष्काराची निवेदने मंडळाकडे दिली आहेत’, अशी माहिती महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली.

काय आहेत मागण्या?

राज्यात सन 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांची 10, 20 आणि 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना (HSC Exam 2023) त्वरित लागू करावी, निवड श्रेणीसाठी 20 टक्क्यांची अट रद्द करावी आदी मागण्या शिक्षकांनी लावून धरल्या आहेत. तसेच वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी, अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विना अनुदानितकडून अनुदानितमधील बदलीला दिलेली स्थगिती रद्द करावी, अशा मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : मजूर आईच्या मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप; बीडच्या तरुणानं हे कसं शक्य केलं

Success Story (8)

करिअरनामा ऑनलाईन । बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे (Success Story) तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते. महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून महेश पुढील  2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या आजारासंदर्भात संशोधन करणार आहेत. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत महेश यांनी ही फेलोशिप कशी मिळवली याबद्दल…

पतीच्या निधनानंतर आईनं मुलांना वाढवलं

महेश 11 महिन्यांचे असताना त्यांच्या शेतकरी वडिलांचं निधन झालं. त्यानंतर महेश आणि त्यांच्या मोठ्या भावाची जबाबदारी त्यांची आई गयाबाई नागरगोजे यांच्याकडे आली. गयाबाई यांनी त्यांच्याकडील शेतीत कष्ट करून प्रसंगी मजुरी करून मुलांना शिकवायचं (Success Story) ठरवलं. गयाबाई गेल्या 15 वर्षांपासून जास्त काळ गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारात भात शिजवायचं काम करत आहेत. महेशसुद्धा त्यांच्या यशाचे सर्व श्रेय आई गयाबाई यांना देतात. गयाबाई यांचा मोठा मुलगा बीड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे आणि महेश यांना फेलोशिप मिळाली आहे.

गयाबाई सांगतात, “मालक वारले तेव्हा मुलं लहान होते. ते शाळेतही नव्हते जात तेव्हापासून मी शेळ्या पाळणं, मजुरी करणं, याशिवाय शाळेत भात शिजवणं ही काम केली. 16 वर्षांपासून मी हे काम करत आहे.”

कुठे घेतलं शिक्षण (Success Story)

महेश यांचं गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. पुढे 11वी आणि 12 वीचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच पाटोदा इथं झालं. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर आयआयटी गुवाहाटीमधून पीएचडी पूर्ण केली.

त्यावेळी त्यांच्या शोधनिबंधाचा विषय ‘Modelling of blood flow in human body’ हा होता. त्रिवेंद्रम इथल्या श्रीचित्रा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं न्यूरोसर्जरी विभागात रिसर्च असोसिएट म्हणून त्यांनी एक वर्षं नोकरी केली.

‘डॉ. मेरी क्युरी’ जगातील प्रतिष्ठित फेलोशिप

डॉ. मेरी क्युरी ही जगातील प्रतिष्ठित फेलोशिपपैकी एक आहे. महेश यांना पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी ही फेलोशिप जाहीर झाली आहे. त्यांना 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे

इथे मिळाली माहिती

या फेलोशिपविषयी माहिती कुठून मिळाली, याविषयी (Success Story) महेश सांगतात, “आयआयटी गुवाहाटीतील माझ्या काही सीनिरयर्सना ही फेलोशिप मिळाली होती. ही फेलोशिप प्रतिष्ठित असल्यामुळे आपणही मिळवायची हे मी ठरवलं होतं. दुसरं कारण म्हणजे ही फेलोशिप खूप जास्त सॅलरी देते हे माहित होतं. मला 1 कोटी 70 लाखांचं फंडिंग पुढच्या दोन वर्षांकरता दिलं आहे.”

‘…यासाठी मी काम करणार आहे.’

महेश पुढे सांगतात, “माझ्या संशोधनाचा विषय हा ब्रेन स्ट्रोकबद्दल आहे. ब्रेन स्ट्रोक हा आजार आजकाल खूप कॉमन होत चालला आहे. या स्ट्रोकमध्ये तुमच्या ब्रेनच्या आर्टरीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आणि यामुळे अनेक समस्या (Success Story) निर्माण होतात. कुणाला पॅरालिसिस जडतो तर कुणाचा मृत्यूही होतो. जे यातून वाचतात त्यांना ही पूर्ण आयुष्यभर पॅरालिसिस सोबत घेऊन जगावं लागतं. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतरही लोकांना समस्या जाणवत आहेत, हे एक कटू सत्य आहे. या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी मी काम करणार आहे.”

फेलोशिपसाठी असा करा अर्ज 

युरोपियन युनियकडून ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपसाठी युरोपियन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ज करता येतो. MSCA Postdoctoral Fellowship असं सर्च केल्यानंतर तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. या वेबसाईटवर फेलोशिप संदर्भात अनेक बुकलेट दिले जातात. ते तुम्ही वाचू शकता. यूरोपियन कमिशनची जी माणसं ही फेलोशिप देतात, त्यांनी Youtube वरती यासंदर्भात अनेक वेबिनार अपलोड केले आहेत; इथून संपूर्ण माहिती मिळते.

निवड प्रक्रियेत या गोष्टी महत्वाच्या

फेलोशिपमध्ये निवड कशी होते या प्रक्रियेविषयी महेश सांगतात; “या फेलोशिपसाठी मे 2022 मध्ये माझा युरोपियन कमिशनसोबत संवाद सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्याचवेळी मी अर्ज केला.

“दुसऱ्या पीढीचे शास्त्रज्ञ तयार करणं हाच युरोपियन (Success Story) युनियनचा मुख्य उद्देश आहे. त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन समाजोपयोगी रिसर्च करिअरसाठी त्यांना पाठवणं हा यामगचा हेतू आहे. त्यामुळे तुमचा रिसर्च टॉपिक हा लोकांच्या कल्याणाशी संबंधित असेल असाच निवडा;” असा सल्ला महेश विद्यार्थ्यांना देतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : NHM अंतर्गत मुंबईत ‘या’ पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

NHM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत रिक्त (NHM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स पदाच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई

भरले जाणारे पद – स्टाफ नर्स / Staff Nurse

पद संख्या – 16 पदे (NHM Recruitment 2023)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – GNM

परीक्षा फी – (NHM Recruitment 2023)

  1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये
  2. प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/-  रुपये (डिमांड ड्रॉफ जोडणे आवश्यक)

मिळणारे वेतन – 20,000/- रुपये.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 400001.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.camahospital.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment 2023 : Indian Air Forceमध्ये ‘या’ तारखेपासून होणार अग्निविरांची भरती

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायु दलात भरती होवू इच्छिणाऱ्या (Agniveer Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  भारतीय वायुसेनेद्वारा ‘अग्निवीर वायू भरती’ची अधिसुचना काढण्यात आली आहे. या अधिसुचनेनुसार ही निवड प्रक्रिया 20 मे 2023 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज स्वीकारण्यास 17 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अग्निपथ (Agniveer Recruitment 2023) योजनेअंतर्गत वायू दलातील ही भरती 4 वर्षांच्या काँट्रॅक्टवर होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांपैकी 25 टक्के उमेदवारांना 4 वर्षानंतर कायम स्वरुपी नियुक्त केले जाईल.

भारतीय वायुदलात अग्निवायु म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी IAF अग्निवीर वायूच्या अधिकृत वेबसाइटवर agnipathvayu.cdac.in अर्ज भरायचा आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रियेअंतर्गत प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Agniveer Recruitment 2023)

1. कोणत्याती मान्यताप्राप्त बोर्डातून विझान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) आणि इंग्रजीत किमान ५० टक्के गुणांसहित 12 वी पास असणे आवश्यक आहे.

2. कमीत कमी 50 टक्क्यांनी इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा (Agniveer Recruitment 2023) व्यावसायिक विषयातील किमान 2 वर्षांचा अनुभव असणारेही अर्ज करू शकतात.

आवश्यक वय मर्यादा –

  1. दिनांक 26 डिसेंबर 2002 ते 26 डिसेंबर 2006 दरम्यान (Agniveer Recruitment 2023) जन्म झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
  2. यापेक्षा मोठे किंवा लहान इच्छुक उमेदवारांना शारीरिक मापदंड पूर्ण करावे लागतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मुलाखतीत विचारले जाणारे 7 Tricky प्रश्न, एकदा उत्तरे वाचाच…

GK Updates 1 March

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSC तसेच MPSC ची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया…

1. असे काय आहे ज्यात वर्ष आणि शनिवारमध्ये एकदाच येते?

उत्तर – ‘व’ हे अक्षर

2. शरीराच्या कोणत्या भागात घाम येत नाही?

उत्तर – ओठ

3. एक माणूस आठ दिवस न झोपता कसा राहू शकेल?

उत्तर – (GK Updates) माणूस दिवसा झोपला नाही तरी रात्री झोपतोच

4. एका टेबलावर एका ताटलीत दोन सफरचंदे आहेत. खाणारे लोक तीन आहेत. ते सफरचंदे कशी खातील?

उत्तर – एक टेबलावर आणि दोन ताटल्यांमध्ये सफरचंदे (GK Updates) आहेत म्हणजे एकूण तीन सफरचंदे आहेत. प्रत्येक व्यक्ती एक सफरचंद खाऊ शकते.

5. अशी कोणती गोष्ट आहे जी फक्त बोलण्याने तुटते?

उत्तर – शांतता

6. असा कोणता शब्द आहे ज्यात फळ, फूल आणि मिठाई अशा तिन्ही गोष्टी आहेत?

उत्तर – गुलाबजामुन

7. (GK Updates) जर मी तुमच्या बहिणीसोबत पळून गेलो तर काय कराल?

उत्तर – माझ्या बहिणीला आपल्यापेक्षा चांगला जोडीदार मिळणारच नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Exam 2023 : उद्यापासून 10वी ची परीक्षा; बाहेर पडण्यापुर्वी ‘हे’ नियम वाचाच 

SSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Exam 2023) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार दि. 02 मार्चपासून सुरु होणार आहे. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं काटकोरपणे विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे.

इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होतील आणि कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून त्या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. अधिक तपशील आणि अद्यतनांसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट देऊ शकतात.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना – (SSC Exam 2023)

  1. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रात कोणतीही चूक नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. प्रवेश पत्राशिवाय कोणालाही परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही.
  2. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अनिवार्य COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रवेशपत्रासोबत स्वतःचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
  3. उमेदवारांना परीक्षा वेळेच्या 30 मिनिटे (SSC Exam 2023) आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  4. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आत घेवून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  5. परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक (SSC Exam 2023) गॅझेटचा समावेश आहे.
  6. प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  7. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Result : MPSC राज्यसेवेत प्रमोद चौगुलेचा डंका; सलग दुसऱ्यांदा मिळवला पहिला क्रमांक 

MPSC Result

करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल (MPSC Result) लागला आहे. या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि आता पुन्हा त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.

या निकालानंतर बोलताना प्रमोद चौगुले म्हणाले, “मागच्या वर्षी माझा पहिला क्रमांक आला होता. पण हवी ती पोस्ट न मिळाल्यामुळे मी पुन्हा परीक्षा दिली. खरंतर अभ्यास थांबला नव्हताच. कारण (MPSC Result) मला पोस्ट वेगळी हवी होती. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवलं आणि आज हे यश मला मिळालं.”

अखेर मनासारखं यश मिळालं (MPSC Result)

प्रमोद चौगुले यांना मुलाखत फेरीत 70 मार्क पडले आहेत. आता ते पोलीस उपअधीक्षक या पदावर रुजू होणार आहेत. सध्या त्यांचं नागपुरात उपसंचालक (उद्योग) या पदाचं प्रशिक्षण सुरू आहे. 2015 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यशा अपयशाच्या खेळानंतर यावर्षी त्यांना मनासारखं यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. त्यानंतर 2020 आणि 2021 च्या परीक्षेत ते राज्यातून पहिले आले.

कोरोना आणि पुराच्या संकटावर केली मात

हा प्रवास प्रमोद यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. 2020 रोजी कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे (MPSC Result) अभ्यास करत होते. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं. 2021 च्या परीक्षेत घरची परिस्थिति सुरळीत झाली असली तरी अनेक चढ उतार आलेच. तरीही कुटुंबियांच्या साथीने त्यांनी हे यश मिळवलं.

प्रमोद यांची भावूक प्रतिक्रिया

“कधीकधी सगळं सोडून द्यावंसं वाटायचं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. स्वत:पेक्षा घरच्यांचा जास्त पाठिंबा मिळाला. घरच्यांनीही माझ्या निराशेच्या सुरात सूर मिसळले असते तर (MPSC Result) आज हा दिवस पहायल मिळाला नसता. मी खूप अपयश पाहिलं आहे. आता मात्र छान वाटतंय. परीक्षेचा प्रवास इथेच संपला असला तरी पुढचा प्रवास आता सुरू झाला आहे;” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुलींमधून सोनाली मात्रे प्रथम

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून सोनाली मात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असून विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे सादर करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो असं आयोगाने म्हटलं आहे. उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक (MPSC Result) आणि तहसीलदार यांच्यासह 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. 2023 च्या राज्यसेवेची जाहिरात आली असून त्यासाठी 28 मार्च ही शेवटची तारीख आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Rules 2023 : आता सैन्यात भरती होण्यासाठी वर्षातून एकदाच मिळणार संधी; भरतीच्या नियमांत ‘हे’ मोठे बदल

Indian Army Rules 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आता (Indian Army Rules 2023) दरवर्षी एकदाच संधी मिळणार आहे. याचबरोबर शारीरिक चाचणीबरोबर मैदानी आणि मेडिकल चाचणीचेही नियम बदलणार आहेत. यामुळे जर तुम्ही सैन्यात भरती होण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

काय आहे नवी नियमावली – (Indian Army Rules 2023)

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. यात पास झालेल्या उमेदवारांनाच मैदानी आणि मेडिकल चाचणीला बोलावले जाणार आहे.

राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी (Indian Army Rules 2023) अर्ज करू शकतात. शारीरिक चाचणीपूर्वी सीईटी घेतली जाणार आहे. चौहान यांच्या हवाल्याने पीटीआयने ही बातमी दिली आहे.

आतापर्यंत मैदानी चाचणी आधी आणि नंतर उमेदवारांची परीक्षा घेतली जात होती. नवीन नियमाप्रमाणे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 फेब्रुवारी ते 15 मार्च एवढीच (Indian Army Rules 2023) मुदत असणार आहे. नवीन भरती प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात भरती अधिसूचना, ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र, ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा, निकाल आणि कॉल-अप यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रवेशपत्र, बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जारी केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment : 10 वी पाससाठी थेट नोकरी; Indian Navy अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Indian Navy Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात लवकरच काही जागांसाठी (Indian Navy Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)

भरले जाणारे पद – ट्रेड्समन

पद संख्या – 248 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)

उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

सामान्य प्रवर्गासाठी – 205/- रुपये

अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी नाही.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Indian Navy Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://indiannavy.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com