Indian Army Rules 2023 : आता सैन्यात भरती होण्यासाठी वर्षातून एकदाच मिळणार संधी; भरतीच्या नियमांत ‘हे’ मोठे बदल

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आता (Indian Army Rules 2023) दरवर्षी एकदाच संधी मिळणार आहे. याचबरोबर शारीरिक चाचणीबरोबर मैदानी आणि मेडिकल चाचणीचेही नियम बदलणार आहेत. यामुळे जर तुम्ही सैन्यात भरती होण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

काय आहे नवी नियमावली – (Indian Army Rules 2023)

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. यात पास झालेल्या उमेदवारांनाच मैदानी आणि मेडिकल चाचणीला बोलावले जाणार आहे.

राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी (Indian Army Rules 2023) अर्ज करू शकतात. शारीरिक चाचणीपूर्वी सीईटी घेतली जाणार आहे. चौहान यांच्या हवाल्याने पीटीआयने ही बातमी दिली आहे.

आतापर्यंत मैदानी चाचणी आधी आणि नंतर उमेदवारांची परीक्षा घेतली जात होती. नवीन नियमाप्रमाणे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 फेब्रुवारी ते 15 मार्च एवढीच (Indian Army Rules 2023) मुदत असणार आहे. नवीन भरती प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात भरती अधिसूचना, ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र, ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा, निकाल आणि कॉल-अप यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रवेशपत्र, बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जारी केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com