Home Blog Page 354

HSC Exam 2023 : बोर्डाचं नक्की चाललंय काय? मराठीच्या मुलांना दिला इंग्रजीचा पेपर; प्रश्न भाषांतर करुन लिहण्याची विद्यार्थ्यांवर नामुष्की

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी च्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या (HSC Exam 2023) आहेत. अजूनही या परीक्षेत गोंधळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. यानंतर आता बीडमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील प्रश्न पत्रिका देण्यात आल्यामुळे शेवटी इंग्रजी भाषेतील प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहावी लागली. या प्रकारामुळे बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला (HSC Exam 2023) मिळत आहे. कधी प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका छापून आल्या. तर बीड जिल्ह्यामध्ये कम्प्युटर टेक्निकलचा पेपर मराठीमध्ये देणाऱ्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्यात आली.

मराठी भाषेमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका पाहून एकच गोंधळ उडाला. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या मुलांच्या हाती इंग्रजीतील प्रश्नपत्रिका पत्रिका पडल्यामुळे विद्यार्थी चांगलेच बुचकुळ्यात पडले.

इंग्रजीचे प्रश्न मराठीत भाषांतर करुन देण्याची केंद्र चालकांवर वेळ (HSC Exam 2023)

काही वेळानंतर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना ही चूक लक्षात आल्यानंतर इंग्रजी प्रश्नांचे भाषांतर मराठीत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही वाया गेला. हा गोंधळ पाहून विद्यार्थी चक्रावून गेले. इंग्रजी प्रश्नांचे रूपांतर मराठी प्रश्नांमध्ये केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला.

बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर

यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यापासूनच बोर्डाचा या ना त्या कारणाने पेपर मधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मराठीत परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना चक्क (HSC Exam 2023) इंग्रजीमध्ये पेपर आल्याने तसेच इंग्रजीमध्ये आलेला पेपर मराठीत भाषांतर करून देण्याची वेळ तेथील शिक्षकांवर आल्याने बोर्डाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परीक्षा विभाग गाफील

अनेक वेळा बोर्डाच्या पेपर मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. असं असलं तरी परीक्षा विभाग मात्र पूर्णपणे डोळे झाक करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जेव्हा अशा त्रुटी आढळून येत आहेत. त्यावेळी ह्या त्रुटी सुधारणा गरजेचे असतं. मात्र, या त्रुटी सुधारणा होत (HSC Exam 2023) नसल्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या चुका बोर्डांच्या पेपरमध्ये होताना दिसत आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल देखील पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत एकूणच चांगली परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी बोर्डाकडून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे; असं मत व्यक्त केले जात आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2023 : देशाच्या सीमा सुरक्षा दलात बंपर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

BSF Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (BSF Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. Border Security Forceने बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

भरली जाणारी पदे – 

1. कॉन्स्टेबल (कॉब्लर)
2. कॉन्स्टेबल (टेलर)

3. कॉन्स्टेबल (कुक)
4. कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
5. कॉन्स्टेबल (वॉशर मन)
6. कॉन्स्टेबल (बार्बर)
7. कॉन्स्टेबल (स्वीपर)
8. कॉन्स्टेबल (वेटर)

पद संख्या – 1284 पदे

पुरुष -1220 पदे

महिला – 64 पदे

अर्ज करण्याची पद्धत – (BSF Recruitment 2023) ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

18 ते 25 वर्षे (BSF Recruitment 2023)

[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी 100/- (SC/ST/ESM/महिलांना फी नाही)

मिळणारे वेतन – 21,700/- ते 69,100/- (Level-3) दरमहा

निवड प्रक्रिया –

  1. निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत.
  2. शारीरिक मानक चाचणी (PST)
  3. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. व्यापार चाचणी (BSF Recruitment 2023)
  6. लेखी चाचणी
  7. वैद्यकीय तपासणी

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (BSF Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – rectt.bsf.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BDO India : मंदीच्या संकटात गुड न्यूज!! देशाच्या ‘या’ कंपनीत तब्बल 25 हजार लोकांना मिळणार जॉब; पहा कुठे?

BDO India

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात सध्या आर्थिक मंदीचं वारं वाहत (BDO India) आहे. फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र वेगळच चित्र पहायला मिळत आहे. नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

एका भारतीय कंपनीने जवळपास 25 हजार लोकांना जॉब देणार (BDO India) असल्याचं सांगितलं आहे. अकाउंटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या बीडीओ इंडिया (BDO India) या भारतीय कंपनीने येत्या 5 वर्षांत 25 हजार लोकांना कंपनीत काम करण्याची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार दरवर्षी जवळपास 5 हजार लोकांना जॉब मिळू शकतो.

अशी झाली कंपनीची सुरुवात (BDO India)

BDO India या कंपनीमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील आठवड्यात 5 हजारांच्या वर गेली आहे. कंपनीचे इंडिया मॅनेजिंग पार्टनर मिलिंद कोठारी यांनी सांगितलं की, बीडीओने 2013 मध्ये केवळ 230 कर्मचारी आणि 2 ऑफिसद्वारे काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता कंपनीत 5 हजाराच्या वर कर्मचारी आहेत. कंपनी 2028 च्या अखेरीस, भारतातील ऑपरेशनमध्ये सुमारे 17 हजार तर ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये 8 हजार लोकांची भरती करेल.

BDO कंपनीने 10 वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक सेवा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रावर अर्न्स्ट अँड यंग (EY), डेलॉइट, PwC आणि KPMG सारख्या (BDO India) मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. BDO च्या सरासरी वार्षिक वाढीपैकी 40 टक्के ही ऑडिट विभागातून येते. कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी 40 ते 45 टक्के दराने वाढत आहे.

कंपनी या क्षेत्रात देते सेवा

मिलिंद कोठारी म्हणतात की, BDO ही देशातील सहावी सर्वात मोठी ऑडिट फर्म आहे. कंपनीने मध्य-मार्केट ग्राहकांना सेवा देण्यापासून सुरुवात केली. आता ही कंपनी बड्या उद्योग (BDO India) समूहांसह अनेक महापालिकांच्या लेखापरीक्षणाचे कामही करते. भारतातील 6 मोठ्या ऑडिट कंपन्या येत्या काही वर्षांत खूप वाढतील असं कंपनीचं म्हणणं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत विना परीक्षा थेट भरती; 10+2 देवू शकतात मुलाखत

Job Notification (29)

करिअरनामा ऑनलाईन । मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये रिक्त पदे (Job Notification) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 09 मार्च 2023 रोजी होईल.

संस्था – मिरा भाईंदर महानगरपालिका

भरले जाणारे पद – (Job Notification)

  1. क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker – 01 पद
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician – 01 पद

पद संख्या – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker –

पदवीधारक विज्ञान किंवा १० + २ विज्ञान MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुदपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम किंवा क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यांच्या मान्यताप्राप्तअभ्यासक्रम उत्तीर्ण आणि संगणक चालविण्याचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने)

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician

१० + २ उत्तीर्ण आणि डिप्लोमा किंवा प्रमाणीत केलेला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम प्राप्त

वय मर्यादा – 09 मार्च 2023 रोजी 65 वर्षे (Job Notification)

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

  1. क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता- Rs. 15,500/- दरमहा
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs. 17,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

मुलाखतीची तारीख – 09 मार्च 2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.mbmc.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAIL India Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी गेल इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

GAIL India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त (GAIL India Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – गेल इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद – कार्यकारी प्रशिक्षणार्थी

भरतीचा तपशील –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – 20 पदे
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 11 पदे
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) – 8 पदे
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) – 8 पदे

पद संख्या – 47 पदे

वय मर्यादा – 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

काही महत्वाच्या तारखा – (GAIL India Recruitment 2023)

GAIL India Bharti 2023

भरतीचा तपशील –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – 20 पदे
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – 11 पदे
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) – 8 पदे
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) – 8 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) –

Bachelor’s Degree in Engineering/Technology in Chemical/Petrochemical /Chemical Technology / Petrochemical Technology /Chemical Technology & Polymer Science/ Chemical Technology & Plastic Technology with a minimum of 65% marks.

2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) –

Bachelor’s Degree in Engineering/Technology in Civil with minimum 65% marks.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) Bachelor’s Degree in Engineering in Electronics / Electronics & Communication /Electronics & Telecommunication / Telecommunication / Electrical & Electronics / Electrical & Telecommunication with minimum 65% marks. (GAIL India Recruitment 2023)

3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी –

(BIS) Bachelor Degree in Engineering in Computer Science / Information Technology with minimum 65% marks OR Bachelor Degree with minimum 60% marks and 03 years Master’s Degree in Computer Application (MCA) with minimum 65 % marks
Salary Details For GAIL India Jobs 2023

मिळणारे वेतन –

  1. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल) – Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा (GAIL India Recruitment 2023)
  3. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAILTELTC/TM) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा
  4. कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) Rs.60,000 – 1,80,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (GAIL India Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – gailonline.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agnipath Yojana : ‘अग्निपथ योजना योग्यच’; दिल्ली हायकोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

Agnipath Yojana (4)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान (Agnipath Yojana) देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाला आपल्या निर्णयात अग्निपथ योजना योग्य वाटली असल्यामुळे केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर अग्निपथ योजनेवर सुनावणी झाली. न्यायालयाने गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आता या निर्णयाची प्रतीक्षा होती.

सशस्त्र दलात तरुणांची भरती करण्यासाठी गेल्या वर्षी 14 जून रोजी अग्निपथ योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक राज्यांत त्याबाबत निदर्शने झाली. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्याचवेळी ही योजना रद्द करण्यासाठी अनेकांनी (Agnipath Yojana) न्यायालयात धाव घेतली. अग्निपथ योजनेच्या नियमांनुसार, 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील लोक सैन्य दलात भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर नियुक्ती झालेल्या 25 टक्के लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील.

सरकारने असा केला युक्तिवाद (Agnipath Yojana)

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात अग्निपथ योजनेचे समर्थन केले होते. याचिका फेटाळण्याची मागणी करत केंद्राने न्यायालयाला सांगितले होते की, बाह्य आणि अंतर्गत धोक्यांचा सामना करत असलेल्या भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी चपळ, तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम सशस्त्र दलांची आवश्यकता आहे.

सरकारने पुढे असा युक्तिवाद केला होता की, या योजनेचे (Agnipath Yojana) उद्दिष्ट एक तरुण लढाऊ शक्ती तयार करणे आहे, ज्यांना तज्ञांकडून प्रशिक्षित केले जाईल जे नवीन आव्हानांना तोंड देण्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असतील. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केंद्र सरकारची अग्निपथ योजना योग्य आहे की नाही हे ठरवायचे होते.

कोर्टाने असा दिला निर्णय

याचिका फेटाळून लावताना हायकोर्टाने या योजनेत हस्तक्षेप करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. “अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत;” असे न्यायालयाने म्हटले आहे.” ही योजना राष्ट्रीय हितासाठी आणि सशस्त्र दल अधिक सुसज्ज असल्याची (Agnipath Yojana) खात्री करण्यासाठी करण्यात आली आहे. न्यायालयाने संरक्षण सेवांमध्ये पूर्वीच्या भरती योजनेनुसार पुनर्स्थापना आणि नामनिर्देशन याचिका फेटाळून लावल्या, कारण याचिकाकर्त्यांना भरती मिळविण्याचा मूळ अधिकार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : नोकरी करतच केली तयारी; सेल्फ स्टडीच्या जोरावर UPSC क्रॅक; कशी होती IAS सर्जना यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. परंतु यामध्ये केवळ 1% उमेदवारांनाच यश मिळते. यामधील अनेक विद्यार्थी कोचिंगवर लाखो रुपये खर्च करतात. मात्र यानंतरही त्यांना यश मिळेलच असं नाही. या परीक्षेचा अभ्यास करताना नक्की कोणती स्ट्रॅटेजी वापरावी हे माहित नसणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

 

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

UPSC परीक्षा उत्तीर्ण कशी करायची याविषयी जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्या IAS अधिकाऱ्याकडून त्याच्या तयारीच्या पद्धती जाणून घेणे. इथे आम्ही तुम्हाला (UPSC Success Story) एका IAS अधिकाऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत; जी ने कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय सेल्फ स्टडीवर भर देवून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दिल्ली येथील IAS अधिकारी सर्जना यादव यांनी कोणतेही प्रशिक्षण न घेता UPSC परीक्षेची तयारी केली आणि 2019 मध्ये तिसर्‍याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षेत 126 वा क्रमांक मिळवून ती IAS अधिकारी बनली.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

कोचिंग क्लासशिवाय केली तयारी (UPSC Success Story)

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी महागड्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात. यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर दुसरीकडे या परीक्षेबाबत सर्जना यादव यांचे मत पूर्ण वेगळे आहे.

एका मुलाखतीत सर्जना म्हणाली की, उमेदवाराच्या इच्छेवर त्याने कोचिंगची मदत घ्यावी की नाही हे अवलंबून आहे. जर तुमच्याकडे संपूर्ण अभ्यास साहित्य असेल आणि तुमची रणनीती चांगली असेल तर तुम्ही स्व अभ्यासावर अवलंबून राहूनही परिक्षेत यश मिळवू शकता.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो क्लासमधील वातावरणात अधिक चांगली कामगिरी करू शकेल, तर त्याने कोचिंग क्लासमध्ये सामील व्हावे. जर तुम्ही शिस्तबद्ध आणि तुमच्या अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल, तर सेल्फ स्टडी करणं कधीही उत्तम .

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

नोकरी करताना केली परीक्षेची तयारी केली

सर्जना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पदवीनंतर ती ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून नोकरी करू लागली. पूर्णवेळ नोकरीसोबतच, सर्जनाने UPSC परीक्षेची तयारी केली, पण पहिल्या दोन प्रयत्नांत तिला यश आले नाही. तिने हार मानली (UPSC Success Story) नाही आणि तर चुकांमधून ती बरेच काही शिकली .

परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी सर्जनाने 2018 मध्ये नोकरी सोडली होती. नोकरीसह केलेल्या प्रयत्नांमध्ये तिला पूर्ण लक्ष देता आले नाही, असे तिचे म्हणणे आहे. पण 2018 मध्ये तिने नोकरीचा राजीनामा दिल्यावर तिने अभ्यासाची पूर्णवेळ तयारी सुरू केली. तिने कोचिंग क्लासचा आधार न घेता सेल्फ स्टडीवर भर दिला. सर्जनाने सेल्फ स्टडीच्या माध्यमातून 2019 मध्ये संपूर्ण भारतात 126 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

कमी साहित्यात करा तयारी

सर्जना म्हणते की, “यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे आणि प्रत्येक विषयाची 2-3 पुस्तके वाचल्याने तुम्हाला अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करणे (UPSC Success Story) कठीण जाईल. यासाठी प्रत्येक विषयासाठी एक चांगले पुस्तक निवडून ते नीट लक्षपूर्वक वाचा. पुस्तकात एक किंवा दोन विषय समाविष्ट नसले तरीही, तुम्ही तो विषय गुगल वर सर्च करू शकता किंवा दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ घेण्याऐवजी सहज उपलब्ध संसाधने शोधू शकता.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CUET UG 2023 : CUET UG परीक्षेचा अर्ज भरताना ‘हे’ करा; थेट NTA च्या हेल्प सेंटरवर जाऊन मोफत करु शकता अर्ज

CUET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG 2023) साठी देशभरात 24 मदत केंद्रे स्थापन केल्याची घोषणा केली आहे. प्रवेश परीक्षेत उमेदवारांचा अधिक सहभाग निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे CUET UG परीक्षेसाठी अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी येत असतील तर ते जवळच्या NTA च्या मदत केंद्रांवर जाऊन मोफत अर्ज भरू शकतात. nta.ac.in आणि cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाईट्सवर मदत केंद्रांची माहिती उपलब्ध आहे.

मदत केंद्रांवर मिळणार मोफत सेवा

NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, संपूर्ण भारतातील उमेदवारांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी CUET (UG) – 2023 परीक्षा मदत केंद्र उघडण्याचा (CUET UG 2023) निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत होईल. यामुळे, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल. उमेदवारांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल, यासाठी कोणत्याही उमेदवाराकडून एक रुपयाही शुल्क आकरले जाणार नाही.

हे आहेत हेल्पलाइन क्रमांक

NTA च्या माहितीनुसार, CUET UG च्या इच्छुकांना कोणत्याही अडचणीविना परीक्षेसाठी अर्ज करता यावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे हा या सुविधेमागचा मुख्य हेतू आहे. यामुळे उमेदवारांना कोणत्याही सायबर कॅफेमध्ये तासनतास बसून राहण्याची गरज नाही. प्रत्येक मदत (CUET UG 2023) केंद्रात एक संबंधित गोष्टीतील अनुभवी व्यक्ती असेल जो उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास मदत करेल. उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या जवळच्या मदत केंद्राला भेट देऊन फॉर्म भरू शकतात.

तसेच ज्या उमेदवारांना CUET UG 2023 साठी अर्ज करताना कोणत्याही (CUET UG 2023) समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते NTA हेल्पलाइन क्रमांक 011-40759000/011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] वर E-Mail करू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता? जाणून घ्या हटके प्रश्न आणि उत्तरे

GK Updates (21)

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया…

1. चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता?

उत्तर – (GK Updates) 1971 मध्ये 6 फेब्रुवारी रोजी अपोलो -14 ने चंद्राच्या पृष्ठ भागाला स्पर्श केला होता. या मिशनवर गेलेले अंतराळवीर एलन शेफर्ड गोल्फ खेळाडू होते. ते या मिशनवर आपल्यासोबत गोल्फ स्टिक आणि गोल्फचे चेंडूदेखील घेऊन गेले होते. त्यामुळे चंद्रावर पहिल्यांदा गोल्फ हा खेळ खेळला गेला आहे.

2. गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव काय आहे?

उत्तर – गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव पटेला आहे.

3. असे कोणते फूल आहे ज्याचे वजन 10 किलोपर्यंत आहे?

उत्तर – रेफ्लेसिया. (रेफ्लेशिया फुल मुख्यत्त्वे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळते)

4. पकोडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

उत्तर – पकोडाला इंग्रजीमध्ये Fritters म्हणतात. हा शब्द सर्व प्रकारच्या पकोडासाठी वापरला जातो, फक्त त्यापुढे आपल्याला बटाटा किंवा कांदा यासारखे इंग्रजी नाव लिहावे लागेल जसे की Potato Fritters Or Onion Fritters

5. भारतात असे कोणत्या प्रकारचे भोजन आहे, जे कोळशावर शिजवले जाते?

उत्तर – तंदूरी खाद्य पदार्थ कोळशावर शिजवले जातात.

6. झोपेतच स्वप्ने का पडतात? (GK Updates)

उत्तर – वैज्ञानिक संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती झोपेमध्ये किमान दोन ते तीन वेळा स्वप्न पाहते. त्या व्यक्तीला काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्नांचा विसर पडतो. झोपेवेळी व्यक्तीची जी मानसिक स्थिति असते, त्याचसंबंधी त्या व्यक्तीला स्वप्ने दिसतात.

7. कोणती नदी आपला रंग बदलते?

उत्तर – या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स असून ही नदी कोलंबियामध्ये वाहते. या नदीचे वैशिष्ट्य असे की ही नदी प्रत्येक हंगामामध्ये आपला रंग बदलते.

8. टीपू सुलतान कोणत्या युद्धात शहीद झाले?

उत्तर – टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीत तीन मोठी युद्धे झाली आणि तिसऱ्या युद्धात त्यांना शहीदत्व मिळाले.

9. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे?

उत्तर – चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय असून 17 एप्रिल 2013 रोजी ‘भारताचे राष्ट्रीय पेय’ म्हणून चहाची घोषणा करण्यात आली.

10.  सौरमंडलचा जनक कोणाला म्हटले जाते? (GK Updates)

उत्तर – सूर्याला सौरमंडलचा जनक म्हटले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत लवकरच ‘या’ पदांवर होणार मेगाभरती; इथे पाठवा अर्ज

BMC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक (BMC Recruitment 2023) आरोग्य खात्या अंतर्गत परिचारिका पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 652 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद – परिचारिका

पद संख्या – 652 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 08 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (BMC Recruitment 2023)

वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011

मिळणारे वेतन –

परिचारिका Rs. 35,400 – 1,12,400/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. (BMC Recruitment 2023)
  3. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह दि. 28/02/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com