Success Story : मजूर आईच्या मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप; बीडच्या तरुणानं हे कसं शक्य केलं

करिअरनामा ऑनलाईन । बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे (Success Story) तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते. महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून महेश पुढील  2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या आजारासंदर्भात संशोधन करणार आहेत. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत महेश यांनी ही फेलोशिप कशी मिळवली याबद्दल…

पतीच्या निधनानंतर आईनं मुलांना वाढवलं

महेश 11 महिन्यांचे असताना त्यांच्या शेतकरी वडिलांचं निधन झालं. त्यानंतर महेश आणि त्यांच्या मोठ्या भावाची जबाबदारी त्यांची आई गयाबाई नागरगोजे यांच्याकडे आली. गयाबाई यांनी त्यांच्याकडील शेतीत कष्ट करून प्रसंगी मजुरी करून मुलांना शिकवायचं (Success Story) ठरवलं. गयाबाई गेल्या 15 वर्षांपासून जास्त काळ गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारात भात शिजवायचं काम करत आहेत. महेशसुद्धा त्यांच्या यशाचे सर्व श्रेय आई गयाबाई यांना देतात. गयाबाई यांचा मोठा मुलगा बीड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे आणि महेश यांना फेलोशिप मिळाली आहे.

गयाबाई सांगतात, “मालक वारले तेव्हा मुलं लहान होते. ते शाळेतही नव्हते जात तेव्हापासून मी शेळ्या पाळणं, मजुरी करणं, याशिवाय शाळेत भात शिजवणं ही काम केली. 16 वर्षांपासून मी हे काम करत आहे.”

कुठे घेतलं शिक्षण (Success Story)

महेश यांचं गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. पुढे 11वी आणि 12 वीचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच पाटोदा इथं झालं. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर आयआयटी गुवाहाटीमधून पीएचडी पूर्ण केली.

त्यावेळी त्यांच्या शोधनिबंधाचा विषय ‘Modelling of blood flow in human body’ हा होता. त्रिवेंद्रम इथल्या श्रीचित्रा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं न्यूरोसर्जरी विभागात रिसर्च असोसिएट म्हणून त्यांनी एक वर्षं नोकरी केली.

‘डॉ. मेरी क्युरी’ जगातील प्रतिष्ठित फेलोशिप

डॉ. मेरी क्युरी ही जगातील प्रतिष्ठित फेलोशिपपैकी एक आहे. महेश यांना पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी ही फेलोशिप जाहीर झाली आहे. त्यांना 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे

इथे मिळाली माहिती

या फेलोशिपविषयी माहिती कुठून मिळाली, याविषयी (Success Story) महेश सांगतात, “आयआयटी गुवाहाटीतील माझ्या काही सीनिरयर्सना ही फेलोशिप मिळाली होती. ही फेलोशिप प्रतिष्ठित असल्यामुळे आपणही मिळवायची हे मी ठरवलं होतं. दुसरं कारण म्हणजे ही फेलोशिप खूप जास्त सॅलरी देते हे माहित होतं. मला 1 कोटी 70 लाखांचं फंडिंग पुढच्या दोन वर्षांकरता दिलं आहे.”

‘…यासाठी मी काम करणार आहे.’

महेश पुढे सांगतात, “माझ्या संशोधनाचा विषय हा ब्रेन स्ट्रोकबद्दल आहे. ब्रेन स्ट्रोक हा आजार आजकाल खूप कॉमन होत चालला आहे. या स्ट्रोकमध्ये तुमच्या ब्रेनच्या आर्टरीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आणि यामुळे अनेक समस्या (Success Story) निर्माण होतात. कुणाला पॅरालिसिस जडतो तर कुणाचा मृत्यूही होतो. जे यातून वाचतात त्यांना ही पूर्ण आयुष्यभर पॅरालिसिस सोबत घेऊन जगावं लागतं. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतरही लोकांना समस्या जाणवत आहेत, हे एक कटू सत्य आहे. या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी मी काम करणार आहे.”

फेलोशिपसाठी असा करा अर्ज 

युरोपियन युनियकडून ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपसाठी युरोपियन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ज करता येतो. MSCA Postdoctoral Fellowship असं सर्च केल्यानंतर तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. या वेबसाईटवर फेलोशिप संदर्भात अनेक बुकलेट दिले जातात. ते तुम्ही वाचू शकता. यूरोपियन कमिशनची जी माणसं ही फेलोशिप देतात, त्यांनी Youtube वरती यासंदर्भात अनेक वेबिनार अपलोड केले आहेत; इथून संपूर्ण माहिती मिळते.

निवड प्रक्रियेत या गोष्टी महत्वाच्या

फेलोशिपमध्ये निवड कशी होते या प्रक्रियेविषयी महेश सांगतात; “या फेलोशिपसाठी मे 2022 मध्ये माझा युरोपियन कमिशनसोबत संवाद सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्याचवेळी मी अर्ज केला.

“दुसऱ्या पीढीचे शास्त्रज्ञ तयार करणं हाच युरोपियन (Success Story) युनियनचा मुख्य उद्देश आहे. त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन समाजोपयोगी रिसर्च करिअरसाठी त्यांना पाठवणं हा यामगचा हेतू आहे. त्यामुळे तुमचा रिसर्च टॉपिक हा लोकांच्या कल्याणाशी संबंधित असेल असाच निवडा;” असा सल्ला महेश विद्यार्थ्यांना देतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com