HSC Exam 2023 : बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडूनच झाल्या चुका, विद्यार्थ्यांना वाढवून मिळणार ‘इतके’ गुण

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (HSC Exam 2023) महत्वाची बातमी आहे. बारावी परिक्षेत इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या ही बाब बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे.

बोर्डाकडून चुका मान्य

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी 6 गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.

तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

बोर्डाकडून निर्णय देदेताना असं सांगण्यात आलं आहे; की बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी (HSC Exam 2023) पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डाने मान्य केलं आहे.

चुकीच्या प्रश्नासाठी 6 गुण मिळणार (HSC Exam 2023)

बोर्डाने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपरमधील चुकीचे तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत.

‘या’ परिस्थितीमध्येच विद्यार्थ्यांना गुण मिळणार

1. उत्तरपत्रिकेमध्ये Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास

2. विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर

3. त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास

वरील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे विद्यार्थ्यांनी (HSC Exam 2023) उत्तरपत्रिकेत लिहिले असल्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे विद्यार्थ्याला एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com