HSC Exam 2023 : शिक्षकांचा मोठा निर्णय!! 12 वी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे; विद्यार्थ्यांची काळजी मिटली

करिअरनामा ऑनलाईन । बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला (HSC Exam 2023) बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागे घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे विविध विभागातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होते. यावेळी झालेल्या बैठकीत 13 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. पहिल्या (HSC Exam 2023) दिवसापासून नियामकांच्या बैठकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नपत्रिका, नमूना उत्तरपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे ढिग शिक्षण मंडळ, परिरक्षक केंद्रात लागले आहेत.

उत्तरपत्रिका तपासणी रखडल्यामुळे विधीमंडळात हा प्रश्न चर्चेला गेला. त्यानंतर गुरुवारी शिक्षणमंत्री यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सरकारने प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी दोन वेळा प्राथमिक स्तरावर बैठकी झाल्या होत्या. परंतु हा प्रश्न निकाली निघाला नव्हता.

गुरुवारी (आज) शिक्षणमंत्री यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा (HSC Exam 2023) झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारपासून नियामकांच्या बैठका व शुक्रवारपासून उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारने ‘हे’ दिले आश्वासन (HSC Exam 2023)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत. यामध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत शासनाने ठरविलेल्या धोरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल, आश्वासित योजनेबाबत सुधारित प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.वाढीव पदांना रुजू दिनांकापासून (HSC Exam 2023) मंजुरी, आयटी विषय अनुदानित करणे याबाबत बैठक आयोजित करणे, अनुदानाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.

शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा झाली. महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी (HSC Exam 2023) महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघाने बहिष्कार आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com