Agnipath Yojana : महिलांनी ‘ही’ कसोटी पार केली की तुम्ही अग्निवीर भरती झालाच म्हणून समजा; असे आहेत पात्रतेचे निकष

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) मुलांबरोबर मुलीही भरती होवू शकतात.  भारतीय सैन्याने महिला अग्निवीर भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. महिला अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया देखील 1 मार्चपासून सुरु झाली आहे. लष्करात अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे. पण भरती होण्यापूर्वी लष्कराने कोणते निकष लागू केले आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत पात्रतेचे निकष –

1. वय मर्यादा – (Agnipath Yojana)

  1. महिला अग्निवीर होण्यासाठी वय किमान 17.5 वर्षे आणि कमाल 21 वर्षे असावे.
  2. संरक्षण कर्मचार्‍यांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. किमान 45% गुणांसह महिला अग्निवीर जनरल ड्युटी (लष्करी पोलीस) साठी 10वी पास असणे आवश्यक आहे.
  2. यासोबतच, जर तुमच्याकडे हलक्या मोटार वाहनासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर तुम्हाला ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य मिळेल.

शारीरिक निकष –

  1. ऊंची – 162 से. मी. (भारतीय गोरखा उमेदवारांना 4 सें.मी.ची सूट मिळेल.)
  2. वजन – सैन्याच्या वैद्यकीय मानकांनुसार (Agnipath Yojana)
  3. छाती – छातीचा विस्तार किमान पाच सें.मी.

मैदानी चचणीचे निकष –

  1. धावणे – 7 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी धावावे लागेल.
  2. 10 फूट लांब उडी आणि 3 फूट उंच उडी मारावी लागेल.

पुरुषांप्रमाणेच महिला अग्निवीरांचीही चार वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), तांत्रिक (एव्हिएशन / अॅम्युनिशन एक्झामिनर), लिपिक/स्टोअर कीपर (Agnipath Yojana) टेक्निकल, ट्रेडसमन 10वी पास आणि 8वी पास या पदांसाठी महिलांची सैन्यात भरती केली जाऊ शकते. भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com