Home Blog Page 282

B Pharmacy Admission : B. Pharmacy प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन; इथे पहा वेळापत्रक

B Pharmacy Admission

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता बारावीनंतर औषध निर्माण शास्‍त्र (B Pharmacy Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बी. फार्मसीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत दि. 20 जुलै पर्यंत दिलेली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरुवात होईल.

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली असताना बी. फार्मसीच्‍या प्रवेशाची प्रक्रिया बारगळली होती. एमएचटी-सीईटी या प्रमुख प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर (B Pharmacy Admission) होऊन अनेक दिवस उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसल्‍याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 20 जुलै 2023 पर्यंत नोंदणी करता येईल. इ-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीद्वारे कागदपत्रे पडताळणीसाठी दि. 21 जुलै 2023 पर्यंत मुदत असणार आहे. दि. 23 जुलै 2023 ला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
हरकती नोंदविण्यासाठी दि. 24 ते दि. 26 जुलै 2023 पर्यंत मुदत असेल. दि. 28 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, त्‍याआधारे पुढील प्रवेश दिले जातील. प्रवेशाच्‍या एकूण तीन फेऱ्या घेण्याचे नियोजित आहे.

असे आहे कॅप राउंडचे वेळापत्रक – (B Pharmacy Admission)
1. पहिल्‍या कॅप राउंडसाठी नोंदणी – दि. 29 ते 31 जुलै
2. या फेरीसाठी वाटप यादी प्रसिद्धी – दि. 2 ऑगस्‍ट
3. प्रवेश घेण्यासाठीची मुदत – दि. 3 ते 5 ऑगस्‍ट
4. दुसऱ्या कॅप राउंडसाठी नोंदणी – दि. 7 ते 9 ऑगस्‍ट
5. या फेरीसाठी वाटप यादीची प्रसिद्धी – दि. 11 ऑगस्‍ट
6. प्रवेश घेण्यासाठी मुदत – दि. 12 ते 1 ऑगस्‍ट
औषधनिर्माणशास्‍त्र पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्‍या नोंदणी सध्या सुरु आहेत. या क्षेत्रात संशोधनाला वाव असून, करिअरचे चांगले पर्याय उपलब्‍ध आहेत. विद्यार्थ्यांनी (B Pharmacy Admission) मुदतवाढीचा निर्णय न घेता, तातडीने आपली नांव नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा; असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ मेडिकल कॉलेजमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

Job Notification (66)

करिअरनामा ऑनलाईन । कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड (जिल्हा – सातारा) अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड (जिल्हा – सातारा)
भरली जाणारी पदे –
1. सहयोगी प्राध्यापक – 6 पदे
2. सहायक प्राध्यापक – 8 पदे
पद संख्या – 14 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहयोगी प्राध्यापक – Educational Qualification & Experience should be as per UGC norms.
2. सहायक प्राध्यापक – Educational Qualification & Experience should be as per UGC norms.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

भरतीचा तपशील – (Job Notification)

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.kvv.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank Of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 416 पदे रिक्त; पहा भरतीविषयी संपूर्ण माहिती

Bank Of Maharashtra Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत (Bank Of Maharashtra Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदाच्या तब्बल 416 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे
भरली जाणारी पदे – (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
1. अधिकारी (स्केल II ) 300 पदे
2. अधिकारी (स्केल III) 100 पदे
3. एजीएम 02 पदे
4. मुख्य व्यवस्थापक 03 पदे
5. अर्थशास्त्रज्ञ 02 पदे
6. मेल प्रशासक 01 पदे
7. उत्पादन समर्थन प्रशासक 06 पदे
8. मुख्य डिजिटल अधिकारी 01 पदे
9. मुख्य जोखीम अधिकारी 01 पदे
पद संख्या – 416 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
नोकरी कण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा –
1. अधिकारी (स्केल II आणि III) – 25 – 35 वर्षे
2. एजीएम – 45 वर्षे
3. मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
4. अर्थशास्त्रज्ञ – 25 – 38 वर्षे
5. मेल प्रशासक – 25 – 35 वर्षे (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
6. उत्पादन समर्थन प्रशासक – 25 – 35 वर्षे
7. मुख्य डिजिटल अधिकारी – 35 – 55 वर्षे
8. मुख्य जोखीम अधिकारी – 40 – 60 वर्षे

अर्ज फी –
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अधिकारी (स्केल II ) – Bachelor Degree in any discipline
2. अधिकारी (स्केल III) – Bachelor Degree in any discipline
3. एजीएम – Professional qualification of CS from the Institute of Company Secretaries of India (ICSI). Preference will be given for additional qualification/s like CA / CFA / CMA /Risk Management / Finance from a University / Institution / Board recognized by Govt. of India.
4. मुख्य व्यवस्थापक –
Master’s / Bachelor’s Engineer Degree in IT / Computer Science with minimum 50% in aggregate of all semesters / years. Preference will be given to those who have additional qualification/s in data science / data analytics & MBA/ Diploma /Certificate(s) of established institutions in the sector.
The candidate must be M.A. Economics from a recognized University. M.Phil. / Ph.D. (Economics) is preferable. Due weightage/preference shall be given to the candidates whose articles are published in ‘peer reviewed or referred’ Journals/ Newspapers of national and international repute.
B. Tech / B.E. in Computer Science / IT / MCA / MCS / M.Sc. (Electronics /Computer Science) with minimum 55% marks in aggregate of all semesters/years and Mandatory Certifications in CISA, CISSP OR DISA. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
5. अर्थशास्त्रज्ञ – The candidate must be holding a Master Degree in Economics with minimum 60% marks in aggregate of all semesters / years from a University /Institute recognized by Government of India or its Regulatory Bodies
6. मेल प्रशासक – B. Tech / B.E. in any discipline
7. उत्पादन समर्थन प्रशासक – B. Tech / B.E. in any discipline
8. मुख्य डिजिटल अधिकारी – First Class Engineering Graduate / MCA in Computer Science / Information Technology and MBA or its equivalent qualification from a recognized University / Institution.
9. मुख्य जोखीम अधिकारी – First Class Engineering Graduate / MCA in Computer Science / Information Technology and MBA or its equivalent qualification from a recognized University / Institution.

असा करा अर्ज – (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
3. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. उमेदवारांनी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2
PDF जाहिरात 3
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MPSC Update (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांचा यामध्ये (MPSC Update) समावेश आहे. असे असताना आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित जशा होतात तशाच असतील; असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : बँक आणि SSC परीक्षेत विचारले जातात ‘हे’ महत्वपूर्ण प्रश्न; एकदा उत्तरे पहाच

GK Updates 12 Jul

करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच इस्रायली सैन्याने 70 वर्षे जुन्या (GK Updates) निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला. हा हल्ला का करण्यात आला आणि या निर्वासित छावणीची स्थापना केव्हा आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आली. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. या प्रकारचे प्रश्न प्राथमिक परीक्षेत विचारले जाऊ शकतात. हा प्रश्न फक्त UPSC मध्येच नाही तर बँक परीक्षा, SSC म्हणजेच Staff Selection Comission या आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही विचारला जाऊ शकतो.

इस्रायली लष्कराने नुकताच जेनिन निर्वासित छावणीवर मोठा हल्ला केला. हल्ला हवाई आणि जमिनीवर होता. अनेक वर्षांनंतर इस्रायली लष्कराने असा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे 70 वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा कॅम्प चर्चेत आला आहे. यापूर्वी इस्रायलने 2000-2005 दरम्यान असाच प्राणघातक हल्ला केला होता.

शिबिराची स्थापना का व केव्हा झाली? (GK Updates)
शिबिर उत्तर वेस्ट बँक जेनिन मध्ये स्थित आहे. या शिबिराची स्थापना 1953 साली झाली. 1948 च्या अरब-इस्रायल युद्धात विस्थापित पॅलेस्टिनी येथे स्थायिक झाले. ज्याला आता विनाश म्हणून ओळखले जाते. येथे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असून ते सतत इस्रायलविरुद्ध लढत आहेत.
या ताज्या हल्ल्यापूर्वी 2000 साली सुरु झालेल्या पॅलेस्टिनी उठावाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा इस्रायली लष्कराने हवाई आणि जमिनीवर हल्ला केला. कॅम्प पॅलेस्टिनी बंडखोरांचा गड बनला होता. हा कॅम्प सध्या इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

कॅम्पमध्ये साठवलेली शस्त्रे नष्ट करणे आणि दहशतवादी गटांना लक्ष्य करणे हा इस्रायली लष्कराच्या कारवाईचा उद्देश होता. या मोहिमेत दोन हजार सैनिकांसह ड्रोन (GK Updates) आणि जमिनीवर हल्ले करण्यात आले. मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. काही नष्टही झाले.
हे ठेवा ध्यानात –
1. अल-अक्सा मशीद –
मुसलमान याला हरम अल-शरीफ म्हणजेच पूजास्थान म्हणून पाहतात, तर यहुदी तेमाल पर्वत म्हणून ओळखतात. हे ठिकाण जेरुसलेमच्या प्राचीन शहराचा एक भाग आहे.
2. शेख जर्राह – हे पूर्व जेरुसलेममधील उत्तरेकडील शेजारचे क्षेत्र आहे. इस्रायलच्या स्थापनेच्या वेळी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींना त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आले. त्यांच्याकडून येथे फक्त 28 कुटुंबे स्थायिक झाली.
3. वेस्ट बँक – 1948 च्या अरब-इस्त्रायली युद्धानंतर, वेस्ट बँक जॉर्डनच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धानंतर इस्रायलने ते परत घेतले. हे इस्रायल आणि जॉर्डन यांच्यामध्ये वसलेले शहर आहे.

4. गाझा पट्टी – हा इस्त्राईल आणि इजिप्तच्या (GK Updates) दरम्यान वसलेला आहे. इस्रायलने 1967 मध्ये ते ताब्यात घेतले परंतु ओस्लो शांतता प्रक्रियेदरम्यान गाझा शहरातील बहुतांश भूभागावरील प्रशासकीय नियंत्रण काढून टाकले. 2005 मध्ये इस्रायलने ज्यूंच्या वसाहती जबरदस्तीने हटवल्या.
5. गोलान हाइट्स : हा एक पठारी प्रदेश आहे, जो इस्रायलने 1967 मध्ये सीरियाकडून हिसकावून घेतला होता. 2017 मध्ये, अमेरिकेने जेरुसलेम आणि गोलान हाइट्सला इस्रायलचा भाग म्हणून मान्यता दिली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IITM Recruitment 2023 : पुण्यात नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी मध्ये 44 पदावर भरती

IITM Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्णकटिबंधीय (IITM Recruitment 2023) हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II या पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – 05 पदे
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – 11 पदे
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – 14 पदे
4. प्रोजेक्ट असोसिएट-I – 09 पदे
5. प्रोजेक्ट असोसिएट-II – 05 पदे
पद संख्या – 44 पदे (IITM Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (IITM Recruitment 2023)
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – 45 वर्ष
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – 40 वर्ष
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – 35 वर्ष
4. प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्ष
5. प्रोजेक्ट असोसिएट-II – 35 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II Doctoral Degree in Relevant field from a recognized University or equivalent.
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
4. प्रोजेक्ट असोसिएट-II
M. Sc. (Physics/Meteorology) or BE in Relevant field from a recognized University or equivalent.
Master’s degree in Relevant field from a recognized University or equivalent.
5. प्रोजेक्ट असोसिएट-I M.Sc in IT/Mathematics/Physics/Chemistry from a recognized University or equivalent.

मिळणारे वेतन –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट -III ₹78,000/- + HRA
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट -II ₹ 67,000/- + HRA
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट -I ₹ 56,000/- + HRA
4. प्रोजेक्ट असोसिएट-I ₹ 31,000/- + HRA *
₹ 25,000/- + HRA (IITM Recruitment 2023)
5. प्रोजेक्ट असोसिएट-II ₹ 35,000/- + HRA*
₹ 28,000/- + HRA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.
5. अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. निवड समितीसमोर मुलाखतीसाठी (IITM Recruitment 2023) निवडलेल्या किंवा स्क्रिन-इन केलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. संप्रेषण फक्त स्क्रीन-इन/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पाठवले जाईल.
4. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (IITM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EPFO Exam : EPFO SSA स्टेनोग्राफर्स परीक्षा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

EPFO Exam

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO Exam) सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी EPFO लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते EPFOच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाईल, तर एसएसए परीक्षा 18, 21 आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी होईल.

या भरती परीक्षांद्वारे एकूण 2859 एसएसए आणि स्टेनोग्राफर पदे (EPFO Exam) भरली जाणार आहेत. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा (फेज-I) आणि कॉम्प्युटर टायपिंग टेस्टच्या (फेज-II) निकालांचा उपयोग अर्जदार पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी केला जाईल. EPFO SSA पूर्व परीक्षेत एकूण 600 गुणांसाठी, ऑनलाईन पद्धतीनं 150 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी 2 तास 30 मिनिटांचा कालवधी दिला जाईल.

असं  डाउनलोड करा वेळापत्रक –
1. ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर भरतीच्या वेळापत्रकासाठी ईपीएफओच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
2. परीक्षेच्या वेळापत्रकाची लिंक शोधण्यासाठी ‘नोटिफिकेशन टॅब’ निवडा.
3. ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर शेड्युल लिंकवर क्लिक करा.
4. स्क्रीनवर PDF स्वरूपात परीक्षेचं वेळापत्रक दिसेल. (EPFO Exam)
5. परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी PDF वाचा.

थोडक्यात महत्वाचे – (EPFO Exam)
स्टेनोग्राफर पोस्टच्या माहिती पत्रिका 22 जुलै रोजी दिल्या जातील. अॅडमिशन कार्ड्स परीक्षेच्या नियोजित तारखेच्या दोन ते तीन दिवस आधी उपलब्ध करून दिली जातील. एसएसएच्या माहिती पत्रिका ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्या जातील. ईपीएफओ एसएसएची अॅडमिशन कार्ड्स 15 किंवा 16 ऑगस्ट 2023 रोजी उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, एसएसएचा पेपर 18 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. स्टेनोची अॅडमिशन कार्ड्स 29 ते 30 जुलैदरम्यान कधीही उपलब्ध करून दिली जाऊ शकतात.
परीक्षेसंबंधी लेटेस्ट आणि अधिकृत (EPFO Exam) माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी एनटीए वेबसाइटला वारंवार भेट दिली पाहिजे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या प्रक्रियेतही उमेदवारांना पास व्हावं लागेल त्यानंतर संबंधित पदावर नोकरी करण्याची संधी त्यांना मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BPCL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी!! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात

BPCL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्लोमा शिकाऊ उमेदवार, पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद –
1. डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – 77 पदे
2. पदवीधर शिकाऊ उमेदवार – 61 पदे
पद संख्या – 138 पदे (BPCL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
काही महत्वाच्या तारखा – (BPCL Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर शिकाऊ उमेदवार First-class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with 6.3 ccPA from a recognized Indian University/institute (relaxed to 5.3 cGpA for SC/ST/PWD candidates and relaxation applicable for reserved posts only).
2. डिप्लोमा शिकाऊ उमेदवार First class Diploma in Engineering (full-time course) in the respective discipline with 60% marks from State Board of Technical Education/recognized Indian University (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only). (BPCL Recruitment 2023)
मिळणारे वेतन –
1. पदवीधर शिकाऊ उमेदवार – Rs. 25,000/- दरमहा
2. डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – Rs. 18,000/- दरमहा
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (BPCL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Teacher Recruitment : जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात; नवीन शिक्षकांना संधी कधी मिळणार?

ZP Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या (ZP Teacher Recruitment) आहेत मात्र जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी GR काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारच्या या निर्णायामुळे निवृत्त असणारे 70 वर्षांचे ज्येष्ठ शिक्षक का घेतले जात आहेत? नवीन तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या शिक्षकांना संधी का मिळत नाही ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत ही कंत्राटी नियुक्ती असेल; असं GRमध्ये म्हटलं आहे.

सरकारकडून दि. 7 जुलै रोजी याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद शाळांत पुढील 15 दिवसांमध्ये कंत्राटीपद्धतीने भरती करण्यात यावी; असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या शिक्षकांना दर महिना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी (ZP Teacher Recruitment) कमाल वय मर्यादा 70 वर्ष ठेवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देणार आहेत. शिक्षकांची नियुक्तीची सर्व प्रक्रिया आयुक्तांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. कंत्राटी शिक्षकांना नियुक्त करताना शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करावा लागणार आहे.

नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या शाळांतील आणि खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकामधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे-
1. सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष (ZP Teacher Recruitment)
2. मानधन 20 हजार रुपये प्रतिमहिना (कोणत्याही इतर लाभांशिवाय)
3. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करावा
4. प्रत्येक जिल्ह्याांसाठी संबधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदारांकडून अर्ज मागवून नियुक्ती आदेश द्यावेत.
5. संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.
6. नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत ही कंत्राटी नियुक्ती असेल.
7. या नियुक्त्या 15 दिवसात पूर्ण कराव्यात
8. सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी मोठी अपडेट!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी

Anganwadi Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2023) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव दक्षिण
मिळणारे वेतन – रुपये 5,500/- दरमहा
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
किमान – 18 वर्षे
कमाल – 35 वर्षे
विधवा महिला असल्यास कमाल – 40 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रं.3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. वरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (Anganwadi Bharti 2023)
5. उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे स्विकारण्यात येतील. (विलंबाने पोहचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com