Home Blog Page 283

UPSC Success Story : विना कोचिंग केवळ सेल्फ स्टडी; रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा अंशुमन झाला IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यामध्ये असणारी जिद्द कोणत्याही (UPSC Success Story) वाईट परिस्थितीत तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. आज आपण अशाच एका जिद्दी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कोणतेही कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आहे.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास
IAS अधिकारी अंशुमन राज हे बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहायचे. गावातील नवोदय विद्यालयातून त्यांनी 10 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे रॉकेलच्या (UPSC Success Story) दिव्याखाली बसून त्यांनी दहावीपर्यंतचा अभ्यास केला आहे. यानंतर त्यांना बारावीच्या अभ्यासासाठी JNV रांची येथे जावे लागले.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

सामान्य कुटुंबात जन्माला आले अंशुमन (UPSC Success Story)
अंशुमन राज याने अतिशय साध्या कुटुंबात जन्म घेतला आहे. ते ज्या ठिकाणी राहायचे तेथे कायमच सोयी सुविधांचा अभाव होता. UPSC परीक्षेची तयारी त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने पास केली आहे.

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

दोनवेळा क्रॅक केली UPSC
विशेष म्हणजे अंशुमनने कोणतेही कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत मिळवलेल्या  रँकनुसार त्याला IRS पद देण्यात आले होते. या पदावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने (UPSC Success Story) पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला. अंशुमनला IAS अधिकारी बनायचं होतं. पहिली परीक्षा पास झाल्यानंतर त्याने सलग दोनदा UPSCची परीक्षा दिली, पण या दोन्ही प्रयत्नात त्याला अपयश आले. मात्र खचून न जाता त्याने तयारी सुरुच ठेवली. 2019 मध्ये त्याने पुन्हा एकदा चौथ्या प्रयत्नात कुठलेही कोचिंग क्लासेस न लावता उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 7वी  रँक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agriculture Degree Admission : कृषी पदवीच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी; पहा वेळापत्रक

Agriculture Degree Admission

करिअरनामा ऑनलाईन । कृषी शाखेतील विविध पदवी (Agriculture Degree Admission) अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीसाठी रविवार दि. 9 जुलै पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर पहिली वाटप यादी दि. 29 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.
विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी किंवा, जेईई, नीट या प्रवेश परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या या परीक्षांतील कामगिरीच्‍या आधारे कृषी (Agriculture Degree Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्‍ध आहे.

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठातर्फे डिप्‍लोमा अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक असे आहे – (Agriculture Degree Admission)
1. नोंदणीसाठी वाढीव मुदत – दि. 16 जुलै
2. अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी – दि. 20 जुलै
3. ऑनलाईन तक्रार नोंदणी – दि. 21 ते 23 जुलै
4. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी – दि. 27 जुलै
5. पहिल्‍या फेरीची वाटप यादी – दि. 29 जुलै
6. प्रवेश निश्‍चितीची मुदत – दि. 30 जुलै ते 1 ऑगस्‍ट
7. दुसऱ्या फेरीची वाटप यादी – दि. 3 ऑगस्‍ट
8. प्रवेश निश्‍चितीची मुदत – दि. 4 ते 6 ऑगस्‍ट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात शिक्षक भरती; विना परीक्षा थेट द्या मुलाखत!!

Job Notification (65)

करिअरनामा ऑनलाईन । गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 96 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
मुलाखतीची तारीख – 14 जुलै 2023 (Job Notification)
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 वाजता
मुलाखतीचा पत्ता – प्राचार्य, एम.आर.देसाई वाचनालय, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
4. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.gkgcollege.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Rajbhasha Officer : बँकेत राजभाषा अधिकारी कसं व्हायचं? इथे मिळेल पात्रतेपासून निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती

How to Become Rajbhasha Officer

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशातील प्रतिष्ठित (How to Become Rajbhasha Officer) नोकऱ्यांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची गणना केली जाते. जरी तुम्ही बँकेत रुजू होण्यासाठी अवघड परीक्षा उत्तीर्ण केल्या नसल्या तरीही तुम्ही बँकेत राजभाषा अधिकारी म्हणून काम करु शकता. विविध बँकांसाठी राजभाषा अधिकारी पदासाठी वेळोवेळी भरती जाहीर केली जाते. बँकिंग कामात हिंदीचा प्रसार करण्याचे काम राजभाषा अधिकाऱ्याकडून केले जाते. याशिवाय बँकेच्या विविध कामकाजात ते भाषांतरकार म्हणूनही काम करतात. त्यासाठी ते बँकांसाठी हिंदी भाषेतील नोटीस वगैरेही तयार करतात.

अधिकृत भाषा अधिकारी होण्यासाठी ही पात्रता आहे आवश्यक –
राजभाषा अधिकारी होण्यासाठी, उमेदवारांनी हिंदी विषयासह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी किंवा हिंदी किंवा इंग्रजी विषय म्हणून पदवी आणि संस्कृत (How to Become Rajbhasha Officer) विषय म्हणून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. यासह, अधिकृत भाषा अधिकारी होण्यासाठी, तुमचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित केले आहे. भरती नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अशी होते निवड –
राजभाषा अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.
परीक्षेचे स्वरुप –
प्राथमिक परीक्षेत उमेदवारांना 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील ज्यासाठी तुम्हाला 120 मिनिटे दिली जातील. बँकिंग उद्योगाच्या विशेष संदर्भासह इंग्रजी भाषा, तर्कशक्ती, सामान्य जागरूकता यामधून प्रश्न विचारले जातील. ज्या उमेदवारांना पूर्व परीक्षेत किमान कटऑफ गुण मिळतील (How to Become Rajbhasha Officer) ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत, तुम्हाला वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रोफेशनल नॉलेज आणि अॅप्टिट्यूडशी संबंधित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल.

मुलाखत फेरी (How to Become Rajbhasha Officer)
जे उमेदवार मुख्य परीक्षेत कटऑफ गुण मिळवतील त्यांना मुलाखत प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या वेळी, उमेदवारांना विनंती केलेली सर्व कागदपत्रे अनिवार्यपणे प्रदान करावी लागतील. या प्रक्रियेत कोणताही उमेदवार अपयशी ठरल्यास तो भरती प्रक्रियेतून बाहेर जाईल. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : तीनवेळा फेल होवूनही चौथ्या वेळेस मारली बाजी; क्रिकेटर राहुलने UPSC मध्ये केलं टॉप 

UPSC Success Story of Rahul Shrivastava

करिअरनामा ऑनलाईन । बिहारच्या राहुल श्रीवास्तवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉप 10 यादीत राहुलचे नाव आल्यानंतर पटनाच्या चिटकोहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुल इथला रहिवासी आहे. त्याची ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या शेजारच्या लोकांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्व परिक्षेत 3 वेळा अपयश आल्यानंतर चौथ्या वेळेस त्याला यश मिळवता आलं आहे.

अभ्यास करताना क्रिकेट सोडलं नाही (UPSC Success Story)
राहुलच्या घरचे आणि शेजारचे त्याला ‘हनी’ या टोपण नावाने हाक मारतात. राहुलच्या शेजाऱ्यांनी सांगितले, “हनी सुरुवातीपासून अभ्यासात चांगला होता. त्याच्याबद्दल ऐकून खूप आनंद झाला. त्याचा स्वभाव खूप शांत आहे आणि अभ्यासाचे वेड असूनही तो क्रिकेट खेळण्यासाठी वेळ काढत असे.”
बिहारची माती लढायला शिकवते
राहुलच्या म्हणण्यानुसार, “बिहारची माती लढायला शिकवते. कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा इथूनच मिळते. तुमचे ध्येय स्पष्ट असेल, तर तुम्ही ते साध्य करू शकता. ध्येयाप्रती समर्पण सर्वात महत्वाचे आहे. आणि यासाठी सुरुवातीपासूनच कठोर परिश्रम करावे लागतील.”

कुटुंबाच्या सहकार्याने ध्येय गाठणं सोप्पं आहे
राहुलच्या यशात त्याच्या कुटुंबाने त्याला मोठा पाठिंबा दिला. घरात अभ्यासाचे वातावरण असल्याने त्याला मोठे पाठबळ मिळत होते. पालकांच्या सहकार्यामुळे त्याला निश्चित (UPSC Success Story) ध्येय गाठता आल्याचं तो म्हणतो. राहुलने 2009 मध्ये पटना येथील सेंट केरेन्स स्कूलमधून 10वीची परीक्षा दिली आणि त्यानंतर 2011 मध्ये डीएव्ही बोर्ड कॉलनीतून 12वीची परीक्षा दिली. यानंतर त्याने एनआयटी त्रिची येथून इन्स्ट्रुमेंटेशनचे शिक्षण घेतले.
शेजाऱ्यांना वाटतो अभिमान
त्याच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, राहुलला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. तो एक डावखुरा गोलंदाज आहे आणि तो खूप चांगले क्रिकेट खेळतो. पाटणा येथील राहुलच्या (UPSC Success Story) घराजवळ राहणारे लोक सांगतात की त्यांना राहुलने मिळवलेल्या यशामुळे खूप अभिमान वाटत आहे. राहुल हा खूप चांगला आणि सभ्य मुलगा आहे आणि तो आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBA Admission 2023 : MBA प्रवेशासाठी मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

MBA Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या (MBA Admission 2023) प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे 37 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करण्यास दि. 14 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापन असणाऱ्या संस्था, विद्यापीठांमधील विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था यांसह विविध शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये MBA या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 37 हजार 59 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर 12 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत.

MBA अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश फेऱ्यांचा तपशील लवकरच जाहीर करणार (MBA Admission 2023) असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक –
ऑनलाइन नोंदणी, प्रवेशास आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : दि. 14 जुलै 2023
कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन अर्ज निश्चित करणे – दि. 15 जुलै 2023
विद्यार्थी-पालकांसाठी सूचना – (MBA Admission 2023)
1. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘ई-स्क्रुटनी’ची सोय उपलब्ध
2. प्रत्यक्ष जाऊन पडताळणीसाठी पडताळणी केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया शनिवारी आणि रविवारी देखील खुली असेल.
अधिक माहितीसाठी वेबसाईट – www.mahacet.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC MTS Recruitment 2023 : केंद्र सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! 10 वी पास उमेदवारांसाठी SSC अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती सुरु

SSC MTS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोगाने एसएससी (SSC MTS Recruitment 2023) एमटीएस, हवालदार भरती परीक्षा 2023 अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या एकूण 1558+ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

आयोग – कर्मचारी निवड आयोग, भारत सरकार
भरले जाणारे पद –
1. मल्टी टास्किंग स्टाफ
2. हवालदार
पद संख्या – 1558+ पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वय मर्यादा – (SSC MTS Recruitment 2023)
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त – 25 वर्षे
मिळणारे वेतन –
1. मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1.
2. हवालदार – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1
अर्ज फी – 100/- रुपये
(महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PwD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM) यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.)

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
6. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा.
7. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या E-Mail खात्यावर E-Mail केला जाईल.
8. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, आता ‘अर्ज करा’ या बटणावर क्लिक करा.
9. अर्जावर तुमची वैयक्तिक माहिती अपलोड करा. (SSC MTS Recruitment 2023)
10. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

निवड प्रक्रिया –
1. संगणक आधारित परीक्षा (CBT) दोन सत्रांमध्ये घेतली जाईल.
2. सत्र-I आणि सत्र-II आणि दोन्ही सत्रांचा प्रयत्न करणे उमेदवारासाठी अनिवार्य असेल.
3. संगणक आधारित परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. आसामी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू.
4. CBT लेखी परीक्षा (SSC MTS Recruitment 2023)
5. शारीरिक चाचणी (PET/ PST)- फक्त हवालदार पदांसाठी
6. दस्तऐवज पडताळणी (DV)
7. वैद्यकीय तपासणी
SSC Havaldar PET
1. For Male Candidate – 1600 meters walking in 15 minutes.
2. For Female Candidate – 1 Km walking in 20 minutes.
SSC Havaldar PST Details
The minimum physical standards (PST) for the post of Havaldar in CBIC and CBN are as follows:-
Test Male Female

Test Male Female
Height 157.5 cms 152 cms
Chest 81-86 cms NA
Weight NA 48 kg

 

आवश्यक कागदपत्रे –1. Matriculation/ Secondary Certificate.
2. Order/ letter in respect of equivalent Educational Qualifications, indicating the Authority (with number and date) under which it has been so treated, in respect of equivalent clause in Essential
Qualifications, if a candidate is claiming a particular qualification as equivalent qualification.
3. Caste/ Category Certificate, if belongs to reserved categories.
4. Persons with Disabilities Certificate in the required format, if applicable
5. Relevant Certificate if seeking any age relaxation.(SSC MTS Recruitment 2023)
6. No Objection Certificate, in case already employed in Government/ Government undertakings
Any other document specified in the Admission Certificate for DV

काही महत्वाच्या तारखा –
SSC MTS Havaldar Bharti 2023 -ssc.nic.in

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC MTS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
रिक्त पदांचा तपशील – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUCBF Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क पदावर बंपर भरती; ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी

MUCBF Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या (MUCBF Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MUCBF Recruitment 2023)
1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक तसेच उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य ज्ञान असणे आवश्यक.
2. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमधील (लिपिक पदाचा) कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वय मर्यादा – 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी – 944/- रुपये
निवड प्रक्रिया – ऑफलाईन परीक्षा
1. ट्रेनी क्लार्क पदांकरिता 100 गुणांची बहूपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल.
2. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये (MUCBF Recruitment 2023) गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. यानंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mucbf.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी निघाली जाहिरात; तुमचा अर्ज करा E-Mail 

Job Notification (64)

करिअरनामा ऑनलाईन । सिद्धिविनायक कॉलेज (Job Notification) ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहाय्यक लेखापाल, प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 04 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 04 पदे
3. सहायक प्राध्यापक – 05 पदे
4. व्याख्याता – 05 पदे (Job Notification)
5. सहायक लेखापाल – 01 पद
6. प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ – 03 पदे
7. डेटा एंट्री ऑपरेटर – 01 पद
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
EMail ID– [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – वरोरा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. प्राध्यापक –
Ph.D Pharmaceutics
Ph.D Pharmaceutical Chemistry
Ph.D Pharmacology
Ph.D Pharmacognosy
2. सहयोगी प्राध्यापक –
M.Pharm Pharmaceutics
M.Pharm Pharmaceutical Chemistry
M.Pharm Pharmacology (Job Notification)
M.Pharm Pharmacognosy
3. सहाय्यक प्राध्यापक
M.Pharm Pharmaceutics
M.Pharm Pharmaceutical Chemistry
M.Pharm Pharmacology
M.Pharm Pharmacognosy

4. व्याख्याता –
B.Pharm/ M.Pharm
5. सहायक लेखापाल –
B.Com/ M.Com & Tally ERP or latest version
6. प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ –
12th, BSC
7. डेटा एंट्री ऑपरेटर – (Job Notification)
Any Degree with Typing and Computer Knowledge

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज [email protected] या Mail ID वर पाठवायचा आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://svcpwarora.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CS Exam 2023 : CS परीक्षा ‘या’ तारखेला होणार; 10 जुलै पर्यंत करा अर्ज

CS Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स (CS Exam 2023) टेस्ट आता दि. ३० जुलै रोजी होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या दि. ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, यापूर्वी अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे, हे उमेदवार आता सोमवार दि. 10 पर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने त्यांच्या अधिसूचनेत म्हटले आहे की; शनिवारी दि. 8 जुलै रोजी होणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली (CS Exam 2023) आहे. रिमोट प्रोक्टोरिंग अंतर्गत ही चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सर्व पात्र उमेदवारांना परीक्षेच्या तीन दिवस आधी लॉग-इन क्रेडेन्शियल पाठवले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com