MUCBF Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क पदावर बंपर भरती; ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या (MUCBF Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MUCBF Recruitment 2023)
1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक तसेच उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य ज्ञान असणे आवश्यक.
2. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमधील (लिपिक पदाचा) कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वय मर्यादा – 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी – 944/- रुपये
निवड प्रक्रिया – ऑफलाईन परीक्षा
1. ट्रेनी क्लार्क पदांकरिता 100 गुणांची बहूपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल.
2. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये (MUCBF Recruitment 2023) गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. यानंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mucbf.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com