Home Blog Page 284

UPSC Success Story : 7वीत असताना पाहिलं स्वप्न; जिद्दीने क्रॅक केली UPSC; कनिकाने भारतात मिळवली 9वी रॅंक

UPSC Success Story of Kanika Goyal

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 7वी मध्ये असताना कनिका (UPSC Success Story) गोयलने UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि दहा वर्षांनंतर तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि हरियाणातील कैथल येथील मॉडेल टाउनच्या कनिका गोयलने संपूर्ण भारतातून 9 वा क्रमांक मिळवला आहे. कनिका तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

7 वीत असताना पाहिले स्वप्न
कनिकाने सांगितले की, “जेव्हा मी 7वीत होते तेव्हा IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. 12वीनंतर मी माझे ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. परीक्षेच्या (UPSC Success Story) दुसऱ्याच प्रयत्नात मी संपूर्ण भारतात टॉप केले आहे. मी एकुलती एक मुलगी असल्याने माझ्या आई-वडिलांनी माझ्याकडूनच सर्व अपेक्षा होत्या आणि त्या मी पूर्ण केल्यामुळे मी आणि माझे कुटुंब खूप आनंदी आहे.”
हे यश अपेक्षित नव्हतं
कनिका सांगते; “UPSCच्या टॉप 10 यादीमध्ये स्वतःचे नाव पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या यादीत माझे नाव येईल याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. जेव्हा निकाल आला तेव्हा मी तो दोन ते तीन वेळा तपासला. या यादीत माझे नाव 9 व्या क्रमांकावर आले आहे. तब्बल दहा वर्षांच्या तयारीनंतर मी माझे ध्येय गाठले आहे.”

आई-वडिलांना यशाचे श्रेय (UPSC Success Story)
इयत्ता 7वी मध्ये शिकत असताना कनिकाने UPSC ची तयारी करुन परीक्षा क्रॅक करण्याचा निर्णय घेतला. तिचे ध्येय पूर्ण करण्यसाठी तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमीच पाठिंबा दिल्याचे ती सांगते. तिने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या आई-वडिलांना दिले आहे.
आव्हानांना सामोरे जावे लागले
कनिका पहिल्या परीक्षेत पास होवू शकली नाही आणि हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. पण, तिने तिची तयारी कायम ठेवली आणि दुसऱ्या प्रयत्नात ती नुसती पास झाली नाही; तर ती या परिक्षेत टॉपर ठरली. कनिका म्हणते, “मला अपयश आल्यानंतर मी खचून न जाता ताकदीने अपयशाचा सामना केला. माझा स्वतःवर विश्वास होता त्यामुळे अपयशाचा माझ्यावर परिणाम झाला नाही आणि मी पुन्हा एकदा तयारी सुरु केली.”

अशी केली तयारी
कनिका म्हणते, “मी माझ्या वेळेचे योग्य नियोजन केले. अभ्यास आणि विश्रांतीमध्ये संतुलन ठेवले. जर तुम्ही सातत्यपूर्ण आणि हुशारीने काम केले तर तुम्ही कोणत्याही (UPSC Success Story) परीक्षेत यश मिळवू शकता. सतत अभ्यास करत असताना जेवण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ काढणं देखील महत्वाचं आहे.”
तरुण उमेदवारांना सल्ला 
“कष्ट करत राहा, कौशल्याने काम करा. तुमच्यात उत्साह असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर अपयश आले तरी न थांबता पुढे जा. पुढच्या वेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल; असं कनिका म्हणते.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : पृथ्वीवरुन फक्त 5 मिनिटासाठी ऑक्सिजन गायब झाला तर काय होईल? पहा भन्नाट प्रश्न आणि त्याची उत्तरे

GK Updates 9 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : जगातील असा कोणता प्राणी आहे ज्याला 3 डोळे आहेत ?
उत्तर : तुतारा (Tuatara) हा एक प्राणी आहे ज्याला 3 डोळे आहेत. हा प्राणी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळतो. तुताराच्या डोक्यावर तिसरा डोळा असतो ज्याला पॅरिएटल डोळा (Parietal eye) म्हणतात.
प्रश्न 2 : एखाद्या अल्पवयीन मुलाने खून केला तर त्याला काय शिक्षा मिळेल ? (GK Updates)
उत्तर : नवीन कायद्यानुसार, अल्पवयीन गुन्हेगारांचे वय 18 वरून 16 करण्यात आलं आहे. कलम 82 नुसार, 7 वर्षाखालील आणि 12 वर्षांपेक्षा कमी (GK Updates) वयाच्या मुलाने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा ठरत नाही. अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास किमान 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
प्रश्न 3 : पृथ्वीवरुन फक्त 5 मिनिटासाठी ऑक्सिजन गायब झाला तर काय होईल ?
उत्तर : पायाखालची जमीन सरकून 10 ते 15 कि.मी पर्यंत खाली जाईल. धातूंचे टोक वेल्डिंगशिवाय आपोआप जोडले जातील. पृथ्वी खूप थंड होईल. प्रत्येक जीवित कोशिका फुलून फुटून जाईल. त्यामुळे जीवजंतूही मरतील.

प्रश्न 4 : INDIA चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : INDIA – Indepenedt National Democratic Intelligence Area.
प्रश्न 5. :
Blood Test करताना नेहमी Ring Finger नेच Blood का घेतलं जातं?
उत्तर : डाव्या हाताच्या Ring Finger ची नस थेट हृदयाशी जोडलेली असते. या कारणास्तव Ring Finger नेच काढलेले रक्त तपासणीसाठी वापरलं जातं.
प्रश्न 6 : (GK Updates) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

प्रश्न 7 : राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र
प्रश्न 8 : तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणतं अन् त्या तीन राजधान्यांची नावे कोणती?
उत्तर : राज्य – आंध्रप्रदेश
1. विशाखापट्टणम – कार्यकारी राजधानी
2. अमरावती – विधानसभेची राजधानी
3. कुर्नूल – न्यायिक राजधानी
प्रश्न 9 : जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला ?
उत्तर : चीनमध्ये (दि. 17 नोव्हेंबर 2019 )

प्रश्न 10 : (GK Updates) आरआयपी (RIP) चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : Rest in Peace म्हणजेच आत्म्याला शांती मिळो; असा अर्थ होतो.
प्रश्न 11 : जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?
उत्तर : ख्रिश्चन धर्म (240 कोटी)
प्रश्न 12 : असं पाच अक्षरी कोणतं नाव आहे जे उलटं आणि सरळ वाचलं तरी सारखंच येतं?
उत्तर : नवजीवन
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tiger Reserve Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘ही’ पदे रिक्त

Tiger Reserve Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve Recruitment 2023) संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जलद बचाव गट सदस्य पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.

संस्था – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर
भरले जाणारे पद – जलद बचाव गट सदस्य
पद संख्या – 6 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मूळ रोड चंद्रपूर

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
वय मर्यादा – 20 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असणे आवश्यक
मिळणारे वेतन – रुपये 15,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Tiger Reserve Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे.
3. आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

निवड प्रक्रिया – मुलाखत 
1. उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. अर्जाच्या प्राथमिक छणनीनंतर उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश / पत्र/ ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
3. वैयक्तिक मुलाखतीसाठी (Tiger Reserve Recruitment 2023) केवळ प्राथमिक निवड (Short listing) झालेल्या उमेदवारांनाच बोलाविण्यात येईल.
4. मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
5. मुलाखतीची तारीख व वेळ Short listing झालेल्या उमेदवारांना कळविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Tiger Reserve Recruitment 2023)
अधिक माहिसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mytadoba.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर नवीन भरतीची जाहिरात; तुम्ही पात्र आहात का?

ZP Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Satara Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विधितज्ञ पदांच्या रिक्त जागांवर नवीन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – विधितज्ञ
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Satara Recruitment 2023)
1. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी असावी.
2. उमेदवाराकडे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

आवश्यक कागदपत्रे –
1. शैक्षणीक अर्हतेसंदर्भात सर्व कागदपत्रे, विधी शाखेचे प्रमाणपत्र, बार कौन्सिलचे प्रमाणपत्र, (या कागदपत्रांची अर्जासोबत साक्षांकित प्रत सादर करावी)
2. वयाच्या पुराव्याकरीता माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा इतर समकक्ष पुरावा.
3. न्यायालयामध्ये दावे चालविण्याचा विहीत अनुभव असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्या प्रमाणपत्र सादर करावे.
4. उमेदवारांनी त्यांचे अनुभवाबाबतचे स्व-साक्षांकनाचे घोषणापत्र सादर करावे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (ZP Satara Recruitment 2023)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

निवड प्रक्रिया – मुलाखत 
1. उमेदवारांची निवड ही मुलाखतीव्दारे करण्यात येईल.
2. प्राप्त अर्जाची छाननी करुन मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची मुलाखतीची यादी सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या पुढील वेबसाईटवर www.zpsatara.gov.in प्रसिध्द केली जाईल. तसेच अर्जदारांना त्यांच्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल. (ZP Satara Recruitment 2023)
3. मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल.
4. मुलाखतीस जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत, अशा अर्जदारांचा पुनः मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
5. मुलाखतीस येताना मुळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
6. अर्जदार यांना मुलाखतीस येताना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (ZP Satara Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : वकिलांसाठी मोठी संधी!! राज्याच्या ‘या’ महापालिकेत होणार नवीन भरती

Job Alert (39)

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वकील पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे.

संस्था – नाशिक महानगरपालिका, नाशिक
भरले जाणारे पद – वकील
पद संख्या – 3 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. उमेदवाराने विधी शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी.
2. उमेदवार विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल.एल.एम. (LLM) पदवी धारक असावा.
वय मर्यादा –
किमान – 35 वर्षे
कमाल – 50 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (Job Alert)
नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक – 422002.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधीकृत वेबसाईट – www.nmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! महावितरणने काढली भरतीची नवीन जाहिरात

Mahavitaran Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Mahavitaran Recruitment 2023) कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, महाव्यवस्थापक, जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड
भरली जाणारी पदे – (Mahavitaran Recruitment 2023)
1.मुख्य अभियंता – 04 पदे
2. अधीक्षक अभियंता – 12 पदे
3. महाव्यवस्थापक – 02 पदे
4. जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी -01 पद
5. उपमहाव्यवस्थापक – 02 पदे
6. सहाय्यक महाव्यवस्थापक – 05 पदे
पद संख्या – 26 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – 51

वय मर्यादा –
1. मुख्य अभियंता (जि.)- 50 वर्षे
2. महाव्यवस्थापक (F & A)- 48 वर्षे
3. अधीक्षक अभियंता (जिल्हा.) / Jt. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी / उपमहाव्यवस्थापक (एचआर) / सहाय्यक. महाव्यवस्थापक (एचआर) / सहाय्यक. महाव्यवस्थापक (F&A) – 45 वर्षे
अर्ज फी –
1. खुली श्रेणी/ खुल्या प्रवर्गाविरुद्ध अर्ज: रु. 708/- (CGST आणि SGST सह).
2. आरक्षित श्रेणी अंतर्गत लागू: रु. 354/- (CGST आणि SGST सह).
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य अभियंता – Bachelors Degree in Electrical Engineering/Technology.
2. अधीक्षक अभियंता – Bachelors Degree in Electrical Engineering/Technology.
3. महाव्यवस्थापक – CA/ICWA Final Passed (Mahavitaran Recruitment 2023)
4. जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी – Degree or Diploma
5. उपमहाव्यवस्थापक – Degree or Diploma
6. सहाय्यक महाव्यवस्थापक – Degree of a recognized university

मिळणारे वेतन –
1. मुख्य अभियंता – Rs. 118195-5025-228745
2. अधीक्षक अभियंता – Rs. 92380-3980-112280-4405-204785
3. महाव्यवस्थापक – Rs. 105035-4610-215675
4. जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी – Rs. 92380-3980-112280-4405-204785
5. उपमहाव्यवस्थापक – Rs. 92380-3980-112280-4405-204785
6. सहाय्यक महाव्यवस्थापक – Rs. 86460-3570-104310-3980-191870
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह स्पीड/ नोंदणीकृत पोस्टाने / कुरिअरद्वारे पाठवावेत.
3. अर्जासोबत आवश्यक (Mahavitaran Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
निवड प्रक्रिया –
1. पात्रता, अनुभव, वय, नोकरीची जबाबदारी इत्यादी विचारात घेऊन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
2. निवड प्रक्रियेसाठी निवडलेल्या अर्जदारांना केवळ E-Mailद्वारे सूचित केले जाईल.
3. शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना (Mahavitaran Recruitment 2023) त्यांच्या स्वखर्चाने वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. प्रवास खर्चाची परतफेड केली जाणार नाही.
4. कोणत्याही कारणास्तव निवड प्रक्रिया आयोजित करणे शक्य नसल्यास, भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2023 : पात्रता फक्त 12वी पास; मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु

BMC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निम्न वैद्यकीय कार्यकर्ता पदांच्या एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरली जाणारी पदे – निम्न वैद्यकीय कार्यकर्ता (Lower Medical Worker)
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 18,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume (BMC Recruitment 2023)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भिती निर्माण होते त्याला काय म्हणतात? मुलाखत फेरीत विचारतात असे किचकट प्रश्न

GK Updates 8 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : जगातील असा कोणता प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे ?
उत्तर : आर्माडिलो (Armadillo) हा असा प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे. हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतो.
प्रश्न 2 : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते, त्याला काय म्हटलं जातं ?
उत्तर : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते त्याला ट्रायपॅनोफोबिया (Trypanophobia) म्हणतात.
प्रश्न 3 : डास किती उंचीपर्यंत उडू शकतो ?
उत्तर : डास सुमारे 50 फूट उंचीपर्यंत उडू शकतो.

प्रश्न 4 : असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे तर झोपण्यासाठी वापरतो ?
उत्तर : वटवाघुळ (Bats) हा असा प्राणी आहे, जो आपले पाय झोपण्यासाठी वापरतो.
प्रश्न 5 : कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? (GK Updates)
उत्तर : कॅमेऱ्याला हिंदीत ‘प्रतिबिंब पेटी’ म्हणतात.
प्रश्न 6 : मानवी मेंदू कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही ?
उत्तर : मानवी मेंदू अन्न आणि धोक्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नाही.

प्रश्न 7 : जगातील सर्वाधिक कार कोणत्या शहरात आहेत.
उत्तर : जगातील सर्वाधिक कार ‘दिल्ली’ शहरात आहेत.
प्रश्न 8 : भारतावर सगळ्यात पाहिलं आक्रमण कोणी केलं ?
उत्तर : भारतावर आक्रमण करणारा पहिला (अरबी) मुस्लिम शासकः मुहम्मद बिन कासिम होता. (ई. स 712).
प्रश्न 9 : प्लाझ्मा हे नेमकं काय आहे, ते शरीरात कसं कार्य करतं? (GK Updates)
उत्तर : प्लाझ्मा हा रक्ताचा एक द्रव भाग आहे, ज्यामध्ये स्वतःचा महत्त्वपूर्ण घटक असतो. त्याचे बाह्यतः रक्तातील द्रव्यमान 50% पेक्षा जास्त असतं. प्लाझ्मा (Plasma) हा थोडासा पिवळसर रंग असलेला एक गढूळ द्रव आहे, हे द्रव एखाद्या व्यक्तीला देण्यासाठी ते कृत्रिमरित्या तयार केलं जातं. प्लाझ्मा प्रोटीन अनेक महत्वाची कार्ये करतात, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पोषक रक्त पेशींमध्ये प्रोटीन कॅप्चर करणे आणि विशेष एन्झाईम्सच्या मदतीने त्यांचे विभाजन करणे, ज्यामुळे त्यांचे आत्म-संरक्षण सुलभ होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : वडील IPS…भाऊ IAS…आई मंत्रालयात अन् आता मुलगा झाला IAS; सलग 3 वेळा क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Anirudhda Yadav

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्याअनिरुद्ध यादवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतात 8 वा क्रमांक मिळवला आहे. अनिरुद्धचे  संपूर्ण कुटुंब नागरी सेवेत कार्यरत आहे. त्याचे वडील IPS मनोज यादव हे हरियाणाचे माजी DGP राहिले आहेत. तर त्याचा मोठा भाऊ आदित्य विक्रम हा देखील IAS अधिकारी असून तो आसाममध्ये सेवा बजावत आहे तर अनिरुध्दच्या आईने वाणिज्य मंत्रालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

एकामागोमाग एक क्रॅक केल्या परीक्षा
अनिरुद्ध यादवने IIT दिल्लीतून M.Tech पूर्ण केले आहे. UPSC देत असताना पहिल्याच प्रयत्नात त्याने ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर त्याला IRPS म्हणजेच भारतीय रेल्वे कार्मिक (UPSC Success Story) सेवा मिळाली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने भारतीय माहिती सेवा म्हणजेच IIS पद मिळवले. तर चौथ्या प्रयत्नात त्याने संपूर्ण भारतातून 8 वी रँक मिळवून IAS पद मिळवले आहे.

दररोज 16 ते 17 तास अभ्यास
अनिरुद्धच्या आवडत्या खेळांमध्ये फुटबॉल आणि स्क्वॅश यांचा समावेश आहे. खेळाची आवड जोपासत असताना UPSC पास करण्यासाठी अनिरुद्धने विशेष तयारी केली आहे. तो दिवसातून 16 ते 17 तास अभ्यास करायचा. UPSC CSE क्रॅक करण्याच्या टिप्स शेअर करताना, अनिरुद्ध म्हणाला की, “प्रत्येक (UPSC Success Story) उमेदवाराने स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे; कारण तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा पास  होण्यासाठी कठोर मेहनत आणि दीर्घ अभ्यासक्रमाची आवश्यकता असते.”

IAS च व्हायचं होतं (UPSC Success Story)
अनिरुद्धला 10वीमध्ये 90.6%आणि 12वीत 94.2% मार्क मिळाले होते. 27 वर्षीय अनिरुद्धचा UPSC चा हा चौथा प्रयत्न होता. त्याने सांगितले की 2019 मध्ये त्याने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. मात्र, नंतर त्याला IRPS (इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस) मिळाली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी भारतीय माहिती सेवा म्हणजेच IISची नोकरी मिळाली; तरी त्याचे समाधान होत नव्हते. त्याने पुन्हा परीक्षा देवून अखेर IAS पद मिळवलेच.

यशाचे श्रेय कुटुंबाला
अनिरुद्धने त्याच्या यशाचे श्रेय संपूर्ण कुटुंबाला दिले आहे. त्याचे वडील सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात महासंचालक (तपास) म्हणून कार्यरत आहेत; मोठा भाऊ IAS अधिकारी असून तो (UPSC Success Story) आसाममध्ये तैनात आहे तर त्याची आई वाणिज्य मंत्रालयातून सेवा निवृत्त झाली आहे. संपूर्ण कुटुंबच नागरी सेवेत कार्यरत असल्यामुळे सर्वांच्या ज्ञानाचा फायदा अनिरुद्धला झाला. “हे यश माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने मिळाले नसून कुटुंबाने केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे मी यशस्वी झालो आहे;” असे अनिरुद्ध सांगतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NExT Exam : National Exit Test पुढच्या वर्षी होणार; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा

NExT Exam

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी (NExT Exam) दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेऐवजी NExT म्हणजेच National Exit Test परीक्षा घेतली जाणार आहे. NExT परीक्षेतील गुणांच्या आधारे MD, MS करिता प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय MBBS अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते भारतात Medical Practice करू शकणार नाहीत. यासोबतच, परदेशातून (NExT Exam) वैद्यकीय पदवी घेतलेल्या MBBS उमेदवारांनाही भारतात Medical Practice करण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिटीने अगोदर जाहीर केलेल्या निर्णयानुसार, नेक्स्टची परीक्षा 2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या MBBSच्या विद्यार्थ्यांपासून सुरु करण्यात येणार होती. मात्र दि. 6 जुलै 2023 ला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 2019 च्या MBBS साठी नॅशनल एक्झिट टेस्ट NExT घेता येणार नाही. त्यामुळे, ती परीक्षा पुढील बॅचसाठी म्हणजेच 2020 च्या MBBSच्या विद्यार्थ्यांपासून सुरु होणार आहे. म्हणजेच 2020 ची MBBS विद्यार्थ्यांची नेक्स्ट परीक्षा देणारी पहिली बॅच ठरणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), रायपूर येथील क्रिटिकल केअर युनिटची पायाभरणी केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा (NExT Exam) किंवा त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारा कोणताही निर्णय केंद्र आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2019 च्या बॅचला NExT अंतर्गत न येता 2020 च्या बॅचपासून NExTची परीक्षा सुरु होणार आहे.

म्हणून घेतली जाते नेक्स्ट परीक्षा (NExT Exam)
NMCच्या मते नॅशनल एक्झिट टेस्ट ही सामान्य पात्रता परीक्षा असेल. MBBSसाठी, आधुनिक वैद्यकशास्त्राचा सराव करण्यासाठी परवानाधारक परीक्षा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक असेल. त्याचवेळी इतर देशांमधून MBBS पदवी घेतलेल्या उमेदवारांना भारतात सराव करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com