ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर नवीन भरतीची जाहिरात; तुम्ही पात्र आहात का?

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Satara Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विधितज्ञ पदांच्या रिक्त जागांवर नवीन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – विधितज्ञ
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Satara Recruitment 2023)
1. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी असावी.
2. उमेदवाराकडे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

आवश्यक कागदपत्रे –
1. शैक्षणीक अर्हतेसंदर्भात सर्व कागदपत्रे, विधी शाखेचे प्रमाणपत्र, बार कौन्सिलचे प्रमाणपत्र, (या कागदपत्रांची अर्जासोबत साक्षांकित प्रत सादर करावी)
2. वयाच्या पुराव्याकरीता माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा इतर समकक्ष पुरावा.
3. न्यायालयामध्ये दावे चालविण्याचा विहीत अनुभव असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्या प्रमाणपत्र सादर करावे.
4. उमेदवारांनी त्यांचे अनुभवाबाबतचे स्व-साक्षांकनाचे घोषणापत्र सादर करावे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (ZP Satara Recruitment 2023)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

निवड प्रक्रिया – मुलाखत 
1. उमेदवारांची निवड ही मुलाखतीव्दारे करण्यात येईल.
2. प्राप्त अर्जाची छाननी करुन मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची मुलाखतीची यादी सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या पुढील वेबसाईटवर www.zpsatara.gov.in प्रसिध्द केली जाईल. तसेच अर्जदारांना त्यांच्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल. (ZP Satara Recruitment 2023)
3. मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल.
4. मुलाखतीस जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत, अशा अर्जदारांचा पुनः मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
5. मुलाखतीस येताना मुळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
6. अर्जदार यांना मुलाखतीस येताना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (ZP Satara Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com