Home Blog Page 285

Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी पास 

Anganwadi Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग, रत्नागिरी (Anganwadi Bharti 2023) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 22 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी
मिळणारे वेतन – Rs. 5,500/- दरमहा
असा करा अर्ज – (Anganwadi Bharti 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2023 आहे.
5. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा पोष्टामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे किमान 75 गुण (१२ वी पदवीधर पदव्युत्तर, डी. एड., बी. एड., एम्. एस्. सी. आय. टी. यांचे एकत्रित कमाल ७५ गुण) व अतिरीक्त २५ गुण (विधवा / अनाथ – १० गुण)
2. अनुसुचित जाती / जमाती – १० गुण, इतर मागासप्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग -०५ गुण अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्ष अनुभव असल्यास ०५ गुण
निवड प्रक्रिया –
1. प्रतीक्षा यादी अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून १५ दिवसात कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. (Anganwadi Bharti 2023)
2. यादीतील कोणत्याही उमेदवारांच प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालायात / नोटीस बोर्डवर, प्रसिध्द झाल्यापासून पुढील १० दिवसांत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करता येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
3. जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या (Anganwadi Bharti 2023) दिनांकापासून ३० दिवसांपर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतिक्षा यादी जाहीर झाल्यापासुन एक वर्षांपर्यंत वैध राहील.

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPCB Recruitment 2023 : राज्याच्या प्रदूषण महामंडळात ‘या’ पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट

MPCB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे (MPCB Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), सीनियर रिसर्च फेलो (SRF) आणि रिसर्च असोसिएट्स या पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
2. सीनियर रिसर्च फेलो (SRF)
3. रिसर्च असोसिएट्स
पद संख्या – 56 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPCB Recruitment 2023)
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. वरिष्ठ संशोधन फेलो (SRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. रिसर्च असोसिएट्स (RA): उमेदवारांनी Ph. D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (MPCB Recruitment 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mpcb.gov.in/mr/about-us/offices/mumbai
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : पानपट्टीवाल्याच्या पोरानं कमालच केली… मनावर घेतलं अन् असा झाला PSI

MPSC Success Story Ajinkya Pawar PSI

करिअरनामा ऑनलाईन । अजिंक्य अनिल पवार हा सर्वसामान्य (MPSC Success Story) कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याने त्याच्या वडिलांना पानपट्टीवर मदत करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक पदावर आपली मोहोर उमटवली आहे. वडीलांना मदत करत असताना तो नियमितपणे दररोज दोन तास व्यायाम आणि आठ तास अभ्यास करायचा. त्याचा जीवन प्रवास नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल…

अजिंक्यचे वडील पानपट्टी चालवतात तर त्याची आई गृहिणी आहे. दहिवडी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अजिंक्यने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर विक्रीकर निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षांकडे आपला मोर्चा वळवला.
संपूर्ण राज्यात 258 वी रॅंक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 2020 साली त्याने अर्ज केला. सप्टेंबर 2021 मध्ये पूर्व परिक्षेत तर ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य परिक्षेत त्याने यश संपादन केले. कोरोनामुळे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी वाट पहावी लागली. मार्च 2023 मध्ये शारीरिक (MPSC Success Story) चाचणी व मुलाखत पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. 650 जागांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग सोडून 583 जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 258 वा क्रमांक मिळवून अजिंक्यने पोलिस उपनिरीक्षक पद पटकावले आहे.

वडिलांना मदत, 2 तास व्यायाम अन् 8 तास अभ्यास (MPSC Success Story)
विशेष म्हणजे अजिंक्यने महाविद्यालयीन शिक्षण तसेच पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास दहिवडी कॉलेजमध्येच केला आहे. दहिवडी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करून त्याने हे यश प्राप्त केले आहे. अजिंक्य अभ्यासासोबत वडिलांना दुकानकामात मदत करायचा; पण त्याचबरोबर तो दिवसातील 2 तास व्यायाम आणि 8 तास अभ्यास करायचा. त्याच्या या यशाबद्दल रयतचे मॅनेजिंग (MPSC Success Story) कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल दडस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. बजरंग मोरे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

‘हे यश आई-वडिलांचं’
“अजिंक्यने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणतो, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, चंद्रकांत पवार सर यांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मिळालेल्या (MPSC Success Story) प्रशिक्षणामुळे मी हे यश मिळवू शकलो.”
दहिवडी कॉलेजचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे दुष्काळी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जावून महागडे कोचिंग क्लास लावणे परवडत नाही. पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर असे विद्यार्थी गावाकडे राहून अभ्यास करुन यश मिळवू शकतात; हे अजिंक्यने सिध्द करुन दाखवले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; महिना 75,000 पगार; इथे पाठवा अर्ज

Job Notification (63)

करिअरनामा ऑनलाईन । परभणी शहर महानगरपालिकेच्या (Job Notification) आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – परभणी शहर महानगरपालिका, परभणी
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 5 पदे (Job Notification)
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – 1 पद
3. एपिडेमिओलॉजिस्ट – 1 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – परभणी शहर महानगरपालिका, परभणी.
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – MBBS
3. एपिडेमिओलॉजिस्ट – Any Medical Graduate
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
2. मायक्रोबायोलॉजिस्ट 75,000/- रुपये दरमहा (Job Notification)
3. एपिडेमिओलॉजिस्ट 35,000/- रुपये दरमहा

भरतीचा तपशील –

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcparbhani.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Guidelines 2023 : सहाय्यक प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट!! UGC ची नवीन गाईडलाईन जारी; आता PHDची सक्ती नाही

UGC Guidelines 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Guidelines 2023) सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी PHD अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. नेट (NET), सेट (SET) आणि एसएलईटी (SLET) यासारख्या परीक्षा या पदावर थेट भरतीसाठी किमान निकष असतील, असे UGCने स्पष्ट केले आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी Ph.D. ही आता पर्यायी पात्रता असणार आहे. यासंबंधी नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. याबाबत यूजीसीने अधिसूचना जारी केली आहे.

असे आहेत पात्रतेचे निकष (UGC Guidelines 2023)
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET), राज्य पात्रता परीक्षा (SET) आणि राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SLET) हे सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट भरतीसाठी किमान निकष असतील, असे UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी सांगितले. 2018 मध्ये UGC ने विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश-स्तरीय पदांसाठी भरतीसाठी निकष निश्चित केले होते. यानुसार, उमेदवारांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून भरतीचे निकष लागू करण्यास सांगितले. 2021 मध्ये यूजीसीने पीएचडीच्या अर्जाची तारीख किमान म्हणून वाढवली. जुलै 2021 ते जुलै 2023 या कालावधीत विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी पात्रता निकष ठरवण्यात आले.

नियम बदलण्याचे कारण काय?
कोविड महासाथीच्या आजारामुळे अनेकांना आपली PHD पूर्ण करता आली नाही. कोरोना काळात शैक्षणिक संस्था दीर्घकाळ बंद राहिल्याने PHD विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य ठप्प झाले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 मध्ये असेही म्हटले होते की विद्यापीठांमध्ये सहाय्यक (UGC Guidelines 2023) प्राध्यापक पदासाठी PHD पदवी अनिवार्य करणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पीएचडी आवश्यक नाही; असे आमचे मत असल्याचे त्यांनी म्हटले. चांगले गुणवंत विद्यार्थी अध्यापन क्षेत्राकडे आणायची असतील तर ही अट ठेवता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAI CA Exam 2023 : CA परीक्षेची तारीख जाहीर; पहा कधी होणार परीक्षा?

ICAI CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2023) ऑफ इंडिया तर्फे CAच्या पुढील सेशनची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ICAI तर्फे नुकताच इंटर आणि फायनल  परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. आता CA November सेशनच्या परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन शेड्युलही जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.

सीए फाऊंडेशन, इंटर आणि फायनल नोव्हेंबर सेशनच्या परीक्षेसाठी 2 ऑगस्ट 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख (ICAI CA Exam 2023) असेल. तर पात्र उमेदवार 30 ऑगस्ट 2023 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करु शकतात. तर दुरुस्तीसाठी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
असा करा अर्ज – (ICAI CA Exam 2023)
1. ICAI तर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, CA फाऊंडेशन, इंटर आणि फायनल (2023) परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाई  घेतली जाणार आहे.
2. उमेदवारांना icai.org या अधिकृत साईटवर जाऊन नोंदणी अथवा रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
3. ही रजिस्ट्रेशन लिंक 2 ऑगस्टपासून ऑफशिअल वेबसाईटवर ॲक्टिव्ह होईल. दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा/ परीक्षेचा कालावधी –
1.
ICAI CA फाउंडेशन नोव्हेंबर 2023 परीक्षा 24, 26, 28 आणि 30 डिसेंबर रोजी आयोजित केल्या जातील. ICAI CA फाउंडेशन पेपर 1 आणि 2 ची परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या तीन तासांच्या तर पेपर 3 आणि 4 ची परीक्षा दुपारी 2 ते 4 या दोन तासांच्या कालावधीत (ICAI CA Exam 2023) घेण्यात येणार आहे.
2. सीए इंटरमिजिएट नोव्हेंबर 2023 च्या परीक्षेतील ग्रुप 1 चे पेपर 2, 4, 6 आणि 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तर ग्रुप 2 साठी ची परीक्षा 10, 13, 15 आणि 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. इंटरमिजिएट पेपरच्या परीक्षेचा कालावधी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत असा तीन तासांचा असेल.
3. CA फायनल ग्रुप 1 ची परीक्षा 1, 3, 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी आणि ग्रुप 2 ची परीक्षा 9, 11, 14 आणि 16 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. पेपर 1 ते 5 आणि 7 व 8 हे पेपर दुपारी 2 ते 5 या तीन तासांच्या कालवधीत होतील. तर पेपर 6 हा 2 ते 6 या चार तासांच्या कालावधीत होईल. ICAI च्या वतीने ट्विट करून संपूर्ण डेटशीट जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Professor Jobs 2023 : प्राध्यापकांसाठी महत्वाची अपडेट!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये थेट मुलाखतीने होणार निवड

Professor Jobs 2023

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय कला आणि विज्ञान (Professor Jobs 2023) महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या मध्यमातून अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली  दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 आहे.

संस्था – शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
भरली जाणारी पदे – (Professor Jobs 2023)
1. अधिव्याख्याता
2. सहायक प्राध्यापक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता – शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, छत्रपती संभाजी नगर 431004.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. अधिव्याख्याता –
B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ पदवीसह संबंधित विषयातील PG पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. सहायक प्राध्यापक – नेट/सेटसह संबंधित विषयातील पीजी पदवी, पीएच.डी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Professor Jobs 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gasca.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DLSA Recruitment 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ‘येथे’ भरती सुरु; 350 पदे रिक्त

DLSA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे (DLSA Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या ‘विधी स्वयंसेवक’ सुधारित योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतचा तपशिल पुढे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 350 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.

संस्था – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद – विधी स्वयंसेवक
पद संख्या – 350 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (DLSA Recruitment 2023)
1. गोंदिया व गोरेगाव तालुकाकरीता – मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया. पिन क. ४४१६०१.
2. आमगाव व सालेकसा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, आमगाव.
3. तिरोडा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तिरोडा
4. देवरी तालूकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, देवरी.
5. सडक अर्जुनी तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडक अर्जुनी. (DLSA Recruitment 2023)
6. अर्जुनी मोरगाव तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, अर्जुनी मोरगाव

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह )
2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक
3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक
4. अंगणवाडी सेविका (DLSA Recruitment 2023)
5. डॉक्टर / चिकित्सक
6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले)
7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य.
8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित / असुरक्षित गटांसह इतर स्वयं सेवी बचत गट महिला सदस्य.

निवड प्रक्रिया –
1. सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. आलेल्या अर्जाची छानणी केल्यानंतर उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल.
3. दाखल अर्जाच्या संख्येनुसार अर्जदारांना मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या मा. जिल्हा न्यायालय, नांदेडच्या
4. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (DLSA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2023 : शिक्षण फक्त 10 वी; महापारेषण अंतर्गत होणार नवीन भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (MahaTransco Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, नाशिक येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नाशिक
भरले जाणारे पद – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा वीजतंत्री (Electrician) हा कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे. (MahaTransco Recruitment 2023)
वय मर्यादा – 18 वर्षे ते 30 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
(MahaTransco Recruitment 2023)
Mahatransco Recruitment
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2023 : बँकेत मिळवा नोकरी; बँक ऑफ बड़ौदामध्ये ‘ही’ पदे रिक्त; आजच ऑनलाईन करा अर्ज 

BOB Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बड़ौदा येथे रिक्त पदांच्या (BOB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन या पदांच्या 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ बड़ौदा
भरले जाणारे पद – प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन
पद संख्या – 03 पदे (BOB Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. उमेदवारांनी Graduation (in any discipline) + Chartered Accountant by Qualification पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – 
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (BOB Recruitment 2023)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com