Professor Jobs 2023 : प्राध्यापकांसाठी महत्वाची अपडेट!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय कला आणि विज्ञान (Professor Jobs 2023) महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या मध्यमातून अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली  दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 आहे.

संस्था – शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
भरली जाणारी पदे – (Professor Jobs 2023)
1. अधिव्याख्याता
2. सहायक प्राध्यापक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता – शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, छत्रपती संभाजी नगर 431004.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. अधिव्याख्याता –
B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ पदवीसह संबंधित विषयातील PG पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. सहायक प्राध्यापक – नेट/सेटसह संबंधित विषयातील पीजी पदवी, पीएच.डी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Professor Jobs 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gasca.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com