MPCB Recruitment 2023 : राज्याच्या प्रदूषण महामंडळात ‘या’ पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे (MPCB Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), सीनियर रिसर्च फेलो (SRF) आणि रिसर्च असोसिएट्स या पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
2. सीनियर रिसर्च फेलो (SRF)
3. रिसर्च असोसिएट्स
पद संख्या – 56 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPCB Recruitment 2023)
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. वरिष्ठ संशोधन फेलो (SRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. रिसर्च असोसिएट्स (RA): उमेदवारांनी Ph. D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (MPCB Recruitment 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mpcb.gov.in/mr/about-us/offices/mumbai
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com